भुक्कड

मुंबईतले हे सात ढाबे, जे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पुरेसे आहेत…

1. प्रताप दी ढाबा या धाब्यात उत्तर भारतीय आणि पंजाबी पध्दतीचे जेवन मिळते. हा ढाबा दुकान क्रमांक 30/31, लिंक प्लाझा, पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेच्या पुढे, ओशिवारा, अंधेरी वेस्ट, मुंबई येथे आहे.
2. गुरू दा ढाबा – हा ढाबा पहिला म्हणजे इथल्या जलद सेवेमुळे आणि इथल्या घरगुली चवीमुळे प्रसिध्द आहे. हा ढाबा लोखंडवाला कॉम्प्लेक्स मार्केट, मेन रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई येथे आहे.
3. पापा पंचो दा ढाबा – आकाराने खूप लहान असलेल्या या धाब्याने भल्या भल्यांचे मन जिंकले आहे, हे मात्र नक्की. हा ढाबा दुकान क्रमांक 12, गॅस्पर एन्क्लेव्ह, पाली नाका, सेंट जॉन स्ट्रीट, डॉक्टर बीआर आंबेडकर रोड, मुंबई येथे आहे.
4. मित्रान दा ढाबा – आपल्या मुंबईत एक गोष्ट छान आहे, ती म्हणजे तुम्ही कमी पैशात जगू शकता. असाच कमी पैशात सर्वोत्तम जेवन देणारा धाबा म्हणजे मित्रान दा ढाबा. हा ढाबा शांग्रिला बस स्टॉप जवळ, लाल बहादूर शास्त्री रोड, भांडुप इंडस्ट्रियल एरिया, भांडुप वेस्ट, मुंबई या ठिकाणी आहे.
5. पंजाबी ढाबा – मुंबईतल्या ज्यादातर खवय्यांना तव्यावर भाजलेले पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे तशा ढाब्यांच्या शोधात असलेल्यांनी या ढाब्याला भेट देणे गरजेचे आहे. हा ढाबा हाकोण गार्डन, सेंट्रल एवेन्यू, पवई प्लाझा जवळ, हिरानंदानी, पवई, मुंबई या ठिकाणी आहे.
6. डाउनटाउन ढाबा- तुम्हाला तुमच्या पैशांपेक्षा जेवन, त्याची चव आणि आहा… तिथली रेसीपी चाखायची असेल तर थेट डाउनटाउन ढाब्याा भेट द्या. हा ढाबा 384, विजय सेल्स जवळ, स्वातंत्र्य वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी आहे.
7. रणजीत दा ढाबा – प्रत्येकवेळी जरी आपण एकटे जेवत असलो, तरी काही वेळ येते की आपल्याला वाटते, आपण आपल्या कुटुंबासोबत जेवन केले पाहिजे. मग आता शांत बसू नका, थेट या ढाब्याकडे या. हा ढाबा चेंबूर कॅम्प, नित्यानंद रोड, एस व्ही पटेल नगर, चेंबूर, मुंबई या ठिकाणी आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments