आपलं शहर

मुंबईत कस्तुरबासोबतच ‘या’ 10 हॉस्पिटलमध्ये मिळणार कोरोनावर उपचार

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत असताना भारतासह महाराष्ट्रात त्याचे जास्त पडसाद उमटत आहेत. राज्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण ५२ वर पोहोचलेली आहे. (हा आकडा वाढत चालला आहे) कोरोनावर अजून कोणताही ठोस उपाय सापडला नसल्याचे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
राज्य शासना व महानगरपालिकेकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व रुग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकारकडून कोणतीही कमतरता पडणार नाही, या अनुषंगाने मुंबई महापालिकने दहा खासगी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सरकारी रुग्णालयात कोरोना बाबत तपासणी केली जात होती; मात्र आता काही खाजगी रुग्णालयांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांतच शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात कोरोना संशयितांवर उपचारासाठी वॉर्ड सुरू करण्यात येतील.
12BMCORONASAMARITAN

याबाबत अधिक माहिती देताना, डॉ. दक्षा शहा म्हणाल्या, “सद्य स्थितीला कस्तुरबा रुग्णालयात ७४ संशयित दाखल आहेत. मधुमेहाने ग्रस्त एका रुग्णाची तब्येत गंभीर आहे. खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी राखीव खाटांबाबत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसातच यापैकी काही ठिकाणी वॉर्ड सुरू होतील.”

corona go d

खासगी रुग्णालयांची माहिती पुढीलप्रमाणे

  • जसलोक रुग्णालयात ५ विलगीकरण खाटांची सुविधा
  • हिंदुजा रुग्णालयात २० खाटांची सुविधा एच. एन. हिरानंदानी रुग्णालयात २ खाटांची सुविधा
  • कोकिलाबेन रुग्णालयात १७ खाटांची सुविधा
  • रहेजा रुग्णालयात १२ खाटांची सुविधा
  • जगजीवन राम वेस्टर्न रेल्वे रुग्णालयात १० खाटांची सुविधा
  • गुरूनानक रुग्णालयात २ खाटांची सुविधा
  • सेंन्ट एलिझाबेथ रुग्णालयात २ खाटांची सुविधा
  • बॉम्बे रुग्णालयात २ खाटांची सुविधा
  • लिलावती रुग्णालयात १५ खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
AR 200139883
दक्ष शहा पुढे म्हणाल्या, “मुंबईतील खासगी लॅबसोबत बोलणी सुरू आहेत. यासाठी सरकारची परवानगी लागेल. ही परवानगी मिळाल्यानंतर खासगी लॅबमध्येही कोरोनाची तपासणी सुरू होईल. खासगी लॅबमध्ये तपासणी झाल्यास पैसे आकारायचे की नाही यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.”
कोरोना बाबत खबरदारी घेत राज्य सरकार कडक पाऊले उचलत आहे. आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे लवकरच आपण या संकटावर मात करू शकतो. त्यासाठी तुमचं वंटास काम घरूनच करून प्रशासनाला मदत करा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments