आपलं शहर

टीव्हीवर दाखवतात तितका कोरोनाचा लोड मुंबईत आहे का?

सगळ्यात आधी आम्ही तुम्हाला Whats App University चा घोळ सांगतो. तर काय झालय;  whats app वापरणाऱ्या काही महान व्यक्तींना बघणे आणि फॉरवर्ड करणे इतकं माहिती असत. त्यामुळे त्यात काय लिहल आहे याचा आणि त्या फॉरवर्ड्या लोकांचा तितकासा काही संबंध येत नाही. जणजागृती करण्यात Whats App University ने जे पाऊल उचललं आहे; ते तितकच महत्वाच आहेअस आम्हाला नाही वाटत. (मुंबईची लोकल बंद करण्यापेक्षा काही दिवस Whats App बंद करणे योग्य ठरू शकते.) 
Whats App मुळे अनेक गरजेचे नसलेले, फेक, भीतीदायक असे मॅसेज आणि मुळात जे घडलेच नाही ती माहिती share केली जात आहे. त्यामुळे वंटास टीम कडून तुम्हाला एक विनंती आहे की whats app मधून कोरोना व्हायरस संदर्भात जे तुमच्याकडे ते सगळंच घेणे गरजेचे नाही.
आता मुंबईतल्या कोरोनाबद्दल…
मुंबईच्या परळ इथे असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात फक्त 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. 2 कोटी लोकसंख्या असलेक्या मुंबईत 9रुग्ण म्हणजे मोठ्याशा आरबी समुद्रात 1 चमचा पाणी फेकण्यासारखं आहे.
हे 9रुग्ण कुठले आहेत?
corona pune 10032020
 
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने स्पेन, इटली, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया या देशात राहणारे महाराष्ट्रातील नागरिक थेट मुंबईत येतात. कोरोना व्हायरस पसरू नये, यासाठी विमानतळावर प्राथमिक स्वरूपाची तपासणी केली जाते. हा व्हायरस वाढण्यासाठी 14 दिवसांचा अवधी लागतो, त्यामुळे काही दिवस आलेल्या अनेक नागरिकांना मुंबईच्या …. रुग्णालयात देखरेखेखाली ठेवले जाते. तिथे ज्या नागरिकांमध्ये बदल दिसून येतो, त्यांच्यावर संशयित या निकषावर कस्तुरबा रुग्णालयात एका दिवसासाठी चाचणी केली जाते आणि सोडून दिले जाते. मुंबईत झालेल्या कोरोना पेशंटच्या मृत्यूबद्दल सांगायचं झाल्यास, ती व्यक्ती 64 वर्षीय होती आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर ती व्यक्ती भारतात आली होती.

 

मुंबईत सध्या 9रुग्ण असले तर परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांना आजाराची लागण झाली आहे का? याची तपासणी करता येईल यासाठी कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयात 200 टेस्टची प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. – दक्षा शाह, मुंबई रुग्णालय प्रवक्त्या

कोरोनाचा आणि मुंबई लोकलचा काय संबंध?
825406 12787 ccxdmwocpy 1482984256
 
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे दिल्ली बंद ठेवली तरी एकवेळेस चालेल, मात्र मुंबई बंद ठेवली तर संपूर्ण देशाला आणि काही प्रमाणात जगाला आर्थिक महामारीशी सामना करावा लागेल. त्यातच हे सगळे आर्थिक व्यवहार चालतात ते म्हणजे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या 70 लाखाहून अधिक प्रवाशांच्या जीवावर. त्यामुळे “लोकल बंद तर मुंबई बंद!” लोकलच्या एका (अंदाजे 100 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद) डब्यात 300 हून अधिक लोक उभे आणि बसलेले असतात. या गर्दीत त्यांनी पायात कोणता बूट घातलाय, हेसुद्धा वाकून बघता येत नाही, त्यामुळे लोकलमध्ये तरी दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवा म्हणणे म्हणजे अजब कारभार असेल. मात्र लोकलमध्ये अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ नयेत, यासाठी लोकल बंद केली तर? असा सवाल प्रशासनातल्या काही व्यक्तींनी मांडला, त्यासाठी तात्काळ कॅबिनेट बैठकही घेण्यात आली, मात्र मुंबईची आर्थिक व्यवस्था, ट्रान्सपोर्ट व्यवस्था, व्यवसाय, नोकरी, महामारी आणि इतर व्यवहार अशा अनेक गोष्टींचा विचार करून लोकल सुरूच ठेवली.
आता या सगळ्यावर विचार करून तुम्हीच सांगा, “टीव्हीवर दाखवतात तितका कोरोनाचा लोड मुंबईत आहे का?” मुंबई अगदी निवांत आहे, शांत आहे, मात्र त्याचा प्रसार होऊ नये आणि आपल्याला मस्तपैकी वंटास राहाता यावं, यासाठी काळजी घेणे गरजेच आहे.
  • तुम्हाला मुंबईतल्या इतर कोणत्या गोष्टीशी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments