आपलं शहर

कोरोनाचे एव्हरेस्ट; पण मुंबईचे सफाई कामगार इज बेस्ट

मुंबई म्हटलं की सगळ्यात महत्वाचं समोर येतं  ते म्हणजे आपली मुंबई स्वच्छ मुंबई. तब्बल 2 कोटीच्या घरात इथली लोकसंख्या आहे, त्यामुळे तुम्ही विचार करा की या लोकांकडून निर्माण होणारा कचरा किती प्रमाणात असू शकतो? आज कोरोना सगळीकडे फैलावला आहे, त्यातच मुंबई समोर सगळ्यात मोठं संकट अनेकवेळा उभे राहाते ते म्हणजे कचऱ्याचे, तरीही इथले हजारो कचरा साफ करणारे बीएमसी कर्मचारी त्या संकटाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. आज अशाच कर्मचाऱ्यांशी वंटास टीमने बातचित केली आणि ठरवल की वंटास मुंबईचे खरे शिलेदार हे मुंबईचे स्वच्छता दूत आहेत आणि त्यांना त्याचा मान मिळणे गरजेचे आहे.

आम्ही काही मुंबईतल्या स्वच्छता कामगारांना भेटलो. त्यांच्याशी बोललो त्यावेळेस आम्हाला समजलं की त्यांच्या वेदना काय आहेत आणि त्यांना किती संकटांशी सामना करावा लगतो. मुंबईत दरदिवशी हजारो घनमीटर कचरा निर्माण होतो. त्यात त्याचे ओला कचरा आणि सुका कचरा असे विलगिकरणदेखील केले जाते. मात्र आता कोरोनाच्या दुष्काळात अजून एक मोठं संकट आलय ते म्हणजे कोरोनापासून वाचण्यासाठी वापरले जाणारे मास्क, सॅनिटाझरच्या बाटल्या, डेटॉल आणि घरातच बसून असल्याने वाढलेल्या इतर कारभाराचा कचरा.
एक दिवस सफाई कामगरांनी संप पुकारला तर अख्खी मुंबई ब्लॉक होते. त्यात विचार करा कोरोनासारख्या या महाभयंकर रोगाच्या कचाट्यात मुंबईत कचरा साचला तर ते मुंबईकरांसाठी किती महागाचे पडू शकते. विषय कचरा कामगारांच्या पगाराचा किंवा नोकरीचा नाही. तर विषय कचरा कामगार कामावर नाही आले तर? या प्रश्नाचा आहे. त्यामुळे सगळ्या मुंबईकरांनो विचार करा. आपल्याला वंटास राहायचंय, त्यामुळे वंटास मुंबईला मदत करा. सोशल डिस्टंस राखा, घराबाहेर पडू नका आणि घरात बसून काय करायचं आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments