कारण

मुंबईकर म्हणतात, डासांमुळे कोरोना होतो; जाणून घ्या सत्य

जसंजसं कोरोनाने मुंबईमध्ये प्रवेश केला आहे, तसंतसं व्हॉट्स अॅप युनिव्हरसिटीमध्ये अनेक अफवांनी प्रवेश केला आहे. आता त्यातल्या किती खऱ्या आणि किती खोट्या हे तुम्ही सुशिक्षीत असाल तर समजून घ्या; नाय तर सोडून द्या. फक्त घरात बसून राहा म्हणजे झालं. पण आमचं कर्तव्य म्हणून आम्ही सर्वात मोठ्या अफवेबद्दल तुम्हाला तज्ञांच्या मतानुसार माहिती देणार आहोत.

 
आज सकाळी बातमी वाचताना अशीच एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे अनेकांचं असं मत आहे की गरम पाणी, गरम चाहा पिल्यावर किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्यावर कोरोनाची लागण होत नाही, त्यातच गोमुत्र पिल्याने कोरोना मरून जातो असंदेखील काही महाशयांचं मत आहे, आता ते तुमचं तुमचं मत आहे, त्यावर आपली वंटास टीम काहीच करू शकत नाही.
आता हा जो प्रश्न आहे की डासांमुळे कोरोना होतो, त्यावर आमची वंटास टीम महाराष्ट्र राज्याचे वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांना भेटली. त्यांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी एकच उत्तर दिलं. ते म्हणजे व्हॉट्स अॅप युनिव्हरसिटी
यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की कोरोनाबाबत व्हॉट्स अॅप युनिव्हरसिटीवर जे काही पसरत चाललं आहे, ते भयानक आहे. अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत, त्यातलच एक प्रकरण म्हणजे डासांचं.
आता डासांबाबत बोलायचं झाल्यास डास ज्यावेळी शरिराला चावतो, त्यावेळेस तो शरिरातलं रक्त खेचून घेतो. ही प्रक्रिया सुरू असताना डासाला शरिरामध्ये कोणताच स्राव सोडता येत नाही. त्यामुळे तो फक्त घेतो, देत नाही आणि म्हणून डासांमुळे कोरोनाचा प्रसार होत नाही. मात्र असं नाही की तुमच्या शरिरावर डास बसला तर काहीच होत नाही, तर डास अवतीभोवती निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करा, नायतर करायला गेलं एक आणि झालं भलतच; असं व्हायला नको.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments