आपलं शहर

कस्तुरबा रुग्णालयात आहेत कोरोनाचे रुग्ण; तरीही कस्तुरबा शेजारील वस्ती बिनधास्त आहे

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. परदेशातून आलेल्या अनेक प्रवाशांची तपासणी केली जात आहे आणि त्यात संशयित आढळलेल्यांना मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जात आहे. अजुनपर्यंत 500 हून अधिक रुग्णांही तपासणी या रुग्णालयात करण्यात आली आहे तर अद्याप 10 पॉझिटिव्ह रुग्णांवर इथे उपचार सुरू आहेत. 

इथपर्यंतची माहिती आपल्याला मीडियातून समजली आहे, आता सगळ्यात रंजक गोष्ट पुढे आहे.

तुम्हीच सांगा; “तुमच्या घराजवळ नाही, चाळीत नाही, गल्लीत कुठला रुग्ण नाही; तरी कोरोनाला तुम्ही किती घाबरता?” मग ज्या ठिकाणी खुद्द कोरोना पॉझिटिव्हच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशा परिसरातील लोकांची काय परिस्थिती असेल?
PRI 145492093
घाबरू नका; परिस्थिती एकदम ठिकठाक आहे, आपण जरा त्यांचे मत ऐकू, जे लोक तिथे राहात आहेत. आमची वंटास टीम तिथल्या काही भागांमध्ये गेली आणि तिथल्या अनेक प्रवाशांशी त्यांनी बातचीत केली.
coronabloga d
तिथले लोक पहिल्यासारखं अगदी सुखाने राहात आहेत. त्यांना कोरोनाचे रुग्ण आपल्या परिसरात आणून ठेवले आहेत, याची काहीच भीती वाटत नाही. उलट हेच लोक आनंदी आहेत. त्यांचं तर म्हणण अस आहे की कस्तुरबामध्ये मोठी प्रयोगशाळा आहे. तिथे अनेक आजारांवर उपचार होतात. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. कोरोनाचे रुग्ण इकडे आणतात म्हणून महापालिकेनेदेखील इकडे चांगले लक्ष दिले आहे. साफसफाई करणे, गाड्यांची वर्दळ होऊ न देणे अशाप्रकारच्या अनेक गोष्टी तिथे होत असतात. इथे वर्दळ होऊ नये म्हणून काही लोकांचं तर इथली दुकाने बंद करण्याची आणि रस्ते ब्लॉक करण्याची मागणी आहे.
इथे येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपासून आम्हाला अजून कसलाच धोका जाणवला नाही, त्यामुळे आम्हाला याबाबत कसलीच भीती नाही, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हीही घाबरू नका, पण तुमच्या जीवाची काळजी घ्या. व्हायरल होणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा. तुम्ही तोंडाला मास्क लावला तर तोंडावाटे किंवा नाकावाटे या व्हायरसचे सिमटम्स आपल्या शरीरात जाण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे काळजी घ्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments