आपलं शहर

CoronaEfect : काय आहे मुंबई लोकलची खबरदारी; दरदिवशी आहेत 70 लाख प्रवाशी

चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इस्राईल सोबतच भारतामध्ये प्रवेश केला आहे. आजपर्यंत भारतात कोरोना रुग्णांचा आकडा 120 आहे. (हा आकडा वाढत चालला आहे) या कोरोना व्हायरसचा सगळ्यात जास्त फटका दिल्ली, केरळ आणि कर्नाटक सोबतच महाराष्ट्रालाही काही प्रमाणात बसला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ज्या ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होते; असे मॉल, चित्रपटगृह, जिम, काही शाळा, मंदिरे बंद करण्यात आली आहेत, तर मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. हे जरी करण्यास सरकार यशस्वी ठरलं असलं तरी मात्र आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि अशा अनेक शहरांमध्ये अशांवर बंदी घालताना अडचण येऊ शकते.
देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर म्हणून दिल्लीनंतर मुंबईचा नंबर लागतो. मुंबईमध्ये साल 2011च्या जनगणनेनुसार 1 कोटी 84 लाखांहून अधिक लोक राहतात. म्हणजेच 29000 हजार प्रतिचौरस किलोमीटर अशी इथली घनता आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी कोरोना व्हायरसच सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे मुंबई लोकलसमोर. मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावरून दरदिवशी 70 लाखाहून अधिक प्रवाशी प्रवास करत असतात. मग अशा दाटीवाटीमध्ये एक कोरोनाग्रस्त प्रवासी शिरला तर विचार करा काय होऊ शकतं?
india corona new 1584271991
 
मुंबई लोकलने काय उपाय केले आहेत, हेही आपण जाणून घेऊ…
 
रेल्वे मंत्रालयाच्या संपर्क अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी पुढीलप्रमाणे माहिती दिली…

आम्ही ट्रेनमध्ये आणि स्टेशनवर जनजागृती करत आहोत. कोरोना व्हायरस पसरण्या विषयी आणि तो कसा रोखता येऊ शकतो याविषयी प्रवाशांना माहिती देत आहोत. तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागेल? कोरोना रुग्णाची लक्षणे काय आहेत? हेही आम्ही प्रवाशांना सांगत आहोत. त्याप्रकारचे पोस्टरही तुम्हाला ठिकठिकाणी पाहायला मिळतील. आरोग्य मंत्रालयाकडून आलेले फोटो, व्हिडीओदेखील अनेक स्थानकांवर दाखवत आहोत. रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांमध्येही याची जागरूकता करत आहे आणि रेल्वेच्या रुग्णालयामध्येही आयसोलेशन वार्ड उभारण्यात आले आहेत.

pic
 
यावरच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जरी कोरोनाग्रास्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी घाबरून जाऊ नका, शासनाला आणि आरोग्य विभागाला मदत करा. स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन केले आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांनीदेखील शक्य तितका रेल्वेचा प्रवास टाळा, जिथे आपण न जाता काम होऊ शकते, तीथे जाण्यासाठी टाळा. बाहेर पडताना मास्कचा वापर करा, तुमच्या निदर्शनास कोरोनाग्रस्त आजाराचा संशयित रुग्ण आढळल्यास तूर्तास लोहमार्ग पोलीस तथा आरोग्य विभागाला कळवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे वंटासच्या वाचकांनो तुम्ही तुमची काळजी घ्या; करण ‘Healthy Mumbai Vantas Mumbai

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments