कारण

मुंबईत अजून लॉकडाऊन वाढणार का?

रविवार दिनांक 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु लागू झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवर आले. त्यांनी घोषणा केली की 31 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू असेल. शहाणपणाचा पाय महाराष्ट्र सरकारने उचलल्यानंतर लगेचच म्हणजे मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह आले आणि संपूर्ण देश 23 तारखेच्या 00.00 वाजल्यापासून लॉकडाऊन असेल अशी घोषणा केली.

हा लॉकडाऊन तब्बल 21 दिवसांचा असेल. हे सांगायलाही मोदी विसरले नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने दिलेली 31 मार्चची मुदत आपोआप 21 दिवस पुढे ढकलली. त्यामुळे सरसकट संपुर्ण देशाला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागला. आता या सगळ्या विश्लेषणानंतर जनता कर्फ्युपासून आजचा सातवा दिवस, महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या संचारबंदीनुसार आजचा सहावा दिवस आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या संचारबंदीनुसार आजचा चौथा दिवस. ही बंदी येत्या 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यातच अजून एक अफवा पसरवली जात आहे, ती म्हणजे हीच बंदी 14 जूनपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची. तर याच उत्तर आहे… नाही!

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात मी डॉक्टर बोलत आहे म्हणत एक व्यक्ती कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव सांगते. कोरोनाची दाहकता समजावून सांगताना 14 एप्रिल नाही तर 15 जून पर्यंत भारतातील परिस्थिती सुधारु शकत नाही, अस मत ती व्यक्ती व्यक्त करत आहे आणि हीच गोष्ट अनेक ठिकाणी व्हायरल होत आहे.

तर वंटास वाचकांनो एक गोष्ट लक्षात घ्या; हा आकडा त्या ठिकाणी वाढत आहे, ज्या ठिकाणी लोक घराबाहेर पडले आहेत. ना त्यांना संचारबंदीची भीती ना कलम 144 ची. संचारबंदी लागू केली असताना रुग्णांचा आकडा वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याठिकाणच्या माणसांची वृत्ती. दिवसेंदिवस जो आकडा वाढत चालला आहे त्यात मुंबई शहर एक नंबरला आहे. कारण संचारबंदी, जमावबंदी, जनता कर्फ्यु हे सगळे नियम धाब्यावर ठेऊन लोक मुंबईत फिरत आहेत. अशी परिस्थिती चालूच राहिली तर मुंबईसारख्या शहरात 14 एप्रिलपर्यंतची मुदत खूप कमी आहे. कदाचित या एका शहरामुळे संपूर्ण महाराष्ट्राला महासंकटातुन जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे विचार करा, काळजी घ्या, घरी राहा.

मुंबई सध्या आर्थिक, महामारी, बेरोजगारी, उपासमारी अशा अनेक संकटातुन जात आहे. हे लवकर थांबवायचं असेल तर मुंबईकरांनी घरातून बाहेर पडणे थांबवले पाहिजे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments