आपलं शहर

मुंबईत गेल्या 24 तासांत 47 पॉजिटीव्ह; पाहा काय आहे कारण?

कोरोना व्हायरसची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात म्हणजे मुंबईसारख्या 2 कोटी आबादी असलेल्या शहरात ही संख्या वाढत चालली आहे. हे खूपच गंभीर आहे. आज (30 मार्च) मुंबईमधल्या रुग्णांचा आकडा 47 वर आहे तर मुंबई परिसरातील आकडेवारी 127 वर जाते. याचा नेमका काय अर्थ समजावा?
 
मुंबई महानगर पालिकेने एक पत्रक सादर केले. त्यात असे म्हटले जात आहे की आम्ही अजूनपर्यंत 1 लाख घरे आणि 3 लाख 87 हजार लोकांची तपासणी केली, तरीही हा आकडा आश्चर्यकारक वाढत चालला आहे. मुंबई सोडली तर महाराष्ट्राच्या इतर शरहारातीतल आकडा आता स्थिर होत आला आहे. याचं एकमेव कारण म्हणावं लागेल की तिथे असलेले कोरोनाबद्दलची  गांभीर्यता.
 
मुंबईतील धारावी झोपडपट्टी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, डोंगरी परिसर, सांताक्रृज, कांदिवली, वरळी कोळीवाड्यासारख्या मोठी गर्दी आजही पाहायला मिळते. अनेक ठिकाणी तर छोट्याशा बोळात माशांचा मोठा बाजार भरत असतो. अशा अजून काही ठिकाणी आजही असंख्य लोक संचारबंदी धाब्यावर ठेवताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाबद्दल असलेली भिती, त्याचे दुष्परिणाम इथल्या कुठल्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही. 
 
तुम्हाला आता एक आकडा सांगितला कर काही वेळात तोच रुग्णांचा आकडा वाढलेला असतो, याचं एकमेव कारण म्हणजे मुंबईत न पाळलं जाणारं सोशल डिस्टंसिंग. आज वरळी कोळीवाड्यासारखा संपूर्ण भाग सिल केला. याचाचं अर्थ तिथे सुरू असलेली मुंबईकरांची बेशिस्त. आता हे तुमच्यासाठी काही नवीन नाही. मात्र आज तुम्ही सोशल डिस्टंसिग ठेवलात तर उद्या कदाचित लॉक डाऊन वाढवण्याची वेळ येणार नाही आणि दुपट्टीने वाढत चाललेली ही संख्या मर्यादित राहिल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments