फेमस

मॅनेजमेंट मुंबईच्या डबेवाल्यांचं : दिवसाचे हजारो डब्बे कुठलीही चुक न होता एकमेकांना कसे मिळतात?

मुंबईचा डबेवाला म्हटले की जर्मनीपासून परभणी आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळेच ओळखतात. “डबेवाला काका नेमकं करतो काय?” हे साध्या भाषेत सांगायचं झाल्यास, “एखाद्याच्या घरातला जेवनाचा डब्बा त्याच्या ऑफिसमध्ये आणून देतो आणि जेवन झालं की परत तोच डब्बा त्याच्या घरी घेऊन जातो.” आता तुम्हाला वाटेल त्यातं इतकं मोठं काय?

तर मित्रांनो सुमारे एका दिवसात २० हजाराहून डबे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम फक्त ५ हजार डबेवाले करतात. एवढ्या मोठ्या शहरात एकही लोकेशन न चुकता हे डबे त्या त्या टेबलपर्यंत पोहोचतात, हे त्या डबेवाल्या काकांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. इतकच काय तर काही लोकांसाठी हा संशोधानाचा मुद्दा आहे.

Tiffin wallah
१८९० साली या व्यवसायाची सुरूवात झाली. त्यावेळी संपूर्ण भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. फक्त मुंबईच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, भारताचा इंग्लडशी सगळे व्यवहार हे बंदरावरून चालायचे. त्यामुळे सगळी मुख्य कार्यालये दक्षिण मुंबईतच असायची. त्यातच त्यांना घरून गरमागरम जेवन मिळावं, यासाठी फक्त घरचा डबा कार्यालयात पोहोचवायचा आणि जेवन झाल्यावर तोच डबा घरी पोहोचवायचा, अशी संकल्पना घेऊन महादू हावजी बच्चे यांनी सन १८९० साली ३५ डबेवाल्यांसह ही सेवा सुरू केली आणि ती आजतागायत अनेक हातापायांनी टिकवून ठेवली.
या सगळ्यात एक नाव आग्रेसर राहिले, ते म्हणजे डबेवाले संघटनेचे नेते मॅनेजमेंन्ट गुरू कै. गंगाराम तळेकर. गंगाराम तळेकर ज्यावेळी संघटनेचे सरचिटनिस होते, त्यावेळी डबेवाला संघटनेने अनेक पुरस्कार मिळवले होते. गिनिजबुकात डबेवाल्यांची नोंद झाली होती. डबेवाला संघटनेला सिक्स सिग्मा मिळाला आहे. त्यांना ISO प्रमाणपत्र देऊन सन्मानितही करण्यात आले आहे. त्याचबरोबर लिमका बूक सारख्या अनेक रेकॉर्डमध्ये आजघडीला डबेवाला संघटनेची नोंद आहे.
Prince Archie
जोपर्यंत ग्राहकाच्या हातात डबा पोहोचत नाही, तो पर्यंत कुठल्याही डबेवाल्याने जेवन करायचं नाही, हा त्यांचा पहिला नियम
जगातल्या सगळ्यात जुण्या आणि प्रामाणिक संघटनेचा आदर्श घेऊन भरपूर फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या उभ्या राहात आहेत, मात्र अजून डबेवाल्यांची विश्वासाहर्ता कायम आहे. चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून विरार, कल्याण आणि पार नवी मुंबईपर्यंत डबेवाल्यांची साखळी पसरली आहे. आजघडीला तब्बल ५००० डबेवाले मुंबईमध्ये काम करत आहेत, तेही कुठलं मिस कम्यूनिकेशन न होता.

असं सुरू होतं काम…

2b423839c38a4d5c43fc010353b82247
एकाच भागातील सगळे डबे पहिला एकत्र केले जातात. त्यानंतर रेल्वेच्या स्टेशननुसार त्यात विभाग बनवले जातात. ठिकाणांनुसार काही डबे जलद लोकल गाड्यांमधूनही नेले जातात. या सगळ्या डबेवाल्यांमध्ये 70 टक्के लोक अशिक्षित तर 30 टक्के लोक शिकलेले आहेत. त्यामुळे तांत्रिकी गोष्टींचा वापर न करता सांकेतिक गोष्टींचा वापर इथे जास्त केला जातो. इथे डबे पोहोचवायचा पत्ता ठिपक्यांच्या स्वरूपात ओळखला जातो. ठिपक्यांच्या रंगानुसार किंवा आता आलेल्या बदलामुळे काही कोडनुसार तो डबा त्या त्या स्टेशनवर उतरवला जातो. तिथूनपुढे पुन्हा ते डबे तिथल्या स्थानिक डबेवाल्यांकडे दाखल केले जातात आणि ते डबेवाले संबंधीत कार्यालयापर्यंत तो डबा पोहोच करतात.

ठरावीक वेळेच्या आत हे डबे पोहोचवणे, हा डबेवाल्यांचा दुसरा नियम

mumbai dabbawalas 1 9 15
संबंधीत व्यक्तीचे जेवन झाले की परत दिलेल्या ठिकाणचे सगळे डबे गोळा करणे, ते स्टेशनवर असेल्या मानसाकडे जमा करणे, तेथील व्यक्ती ते डबे लोकलमध्ये असलेल्या माणसाकडे देतो. लोकलमध्ये असलेला माणूस ते डबे त्या त्या स्टेशनला पोहोच करतो, पुन्हा त्या स्टेशनला असलेला त्यांचा डबेवाला तो डबा आपल्याकडे जमा करतो आणि स्थानिक डबेवाल्यांच्या मार्फत ते घरापर्यंत पोहोच करतात. ही साखळी गेले 129 वर्षे अविरतपणे सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या या वंटास कामाला वंटास मुंबईकडून सलाम.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असे अनेक मुंबईबद्दलचे वंटास किस्से वाचायचे असीतल, तर आम्हाला नक्की फॉलो करा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments