भुक्कड

LockdownEffect 200 करोडचे 1500 टन मासे दिले समुद्रात फेकून; कारण फक्त एकच

पावसाळा संपला रे संपला की मुंबईत असलेल्या कोळीबांधवांची लगबग सुरू होते, पोटाला दोन घास मिळतील आणि आपला संसारही सुखाने नांदू लागेल यासाठी अनेक मच्छीमार 12-12 तास दर्यात मासेमारी करण्यासाठी जात असतात. काहीजण हा व्यवसाय म्हणून करतात तर काहीजण आपलं रोजच पोट भरण्यासाठी.
ही जीवनसाखळी सुरू असताना मध्येच लॉकडाऊन जाहीर झाला आणि होत्याच नव्हतं झालं. ऑगस्टपासून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत अनेक मच्छीमारांनी मच्छीची साठवणूक केली होती. मध्येच लॉकडाऊन लागू झाल्याने सगळे पकडलेले मासे बर्फांच्या पेट्यात भरून ठेवले, मात्र शेवटी बर्फच आहे तो, वितळनारच.
दिवसेंदिवस ऊष्णता वाढत असताना बर्फानेदेखील वीतळण्याचे काम सुरू केले आणि मच्छीमारांना सगळ्यात मोठं नुकसान भोगावं लागलं. मुंबईला लागून असलेल्या अनेक किनारपट्टीसह पालघर, रायगडपर्यंत ही मच्छीमारी चालत असते. मात्र हा सगळा पट्टा सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे अजूनपर्यंत पकडलेले अंदाजे 200 करोडचे 1500 टन मासे समुद्रात फेकून दिल्याची माहिती या किनारपट्टीवर मासे पकडणाऱ्या मच्छीमारांनी दिली.
यंदा आलेलं मासेमारीचं सिझन हे मच्छीमारांसाठी चांगलं नव्हतं. मच्छीमारीचा पहिला टप्पा हा ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात असतो, मात्र यावेळीस समुद्रात सायक्लॉन वारं घोंगावत होतं, त्यामुळे आम्हाला मच्छीमारी करता येत नव्हती. मध्ये पडलेला गॅप भरून काढण्यासाठी मिळालेला वेळ आम्ही न थांबता मासेमारी करण्यात घालवला. काहींच्या घरात मासे विकणारे कोण नव्हते, ते थेट मोठ्या विक्रेत्याला आपले मासे विकत असतं आणि आपलं रोजचं काम सुरू ठेवत. हे सगळं नियोजनबध्द सुरू होतं मात्र आता लॉकडाऊनमुळे त्यावरही परिणाम झाला. अशी माहिती कारंजा फिशींग येथील गणेश नाखवा यांनी एका वृत्तपत्राला दिली.
लॉकडाऊन घोषित केल्यामुळे समुद्रातून होत असलेली मासेमारी पुर्णरित्या बंद करण्याची वेळ आली, त्यातच आधीच साठलेले आणि विकले न गेलेले मासे बर्फामध्ये टाकून ठेवले होते. मात्र त्यालाही खूप दिवस झाल्याने बर्फही आता वितळू लागला आहे. त्यामुळे आधी जमवलेले मासे काही जणांनी एकदम कमी दरात जशी संधी मिळेल तसे विकून टाकले आणि काही जणांनी आपल्या घरात असलेला सगळा माल समुद्रामध्ये फेकून दिला. तब्बल 1500 टन माल समुद्रात फेकून दिला असल्याची माहिती इथल्या कोळी बांधवांनी दिली आहे. त्यामुळे दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कोळीबांधवांना लॉकडाऊनचा किती मोठा फटका बसलाय, याची शक्यता न वर्तवलेलीच बरी.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments