फेमस

फोटोमध्ये रस्त्यावर पडलेलं प्रेत आहे; मुंबई या परिस्थितीपासून किती लांब आहे?

कोरोना व्हायरसने जगभरात मृतांच्या तांडव सुरू केला आहे. आपला भारत देश त्यापासून थोडाफार वंचित आहे, असं म्हणता येईल; पण इतर देशात आर्थिक नुकसानीसह जीवितहानी मोठ्या प्रमाणात अजूनही चालूच आहे. ठोस औषधे न मिळाल्यामुळे हे सगळं कधी संपेल याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाहीये.
अनेक देशात कोरोनाने लाखो बळी घेतले. अर्थव्यवस्थेबरोबर अनेक गंभीर प्रश्न हे जगासमोर उभे आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली तर उपचाराचा प्रश्न निर्माण होतो आणि मृतांचा आकडा पाहिला तर शवविच्छेदनाचा. भारतात महाराष्ट्रात अनेक रुग्ण आहेत असं सांगितलं जातय. त्यात मुंबई आणि पुणे अव्वल.
मुंबईत अनेक रुग्णांना क्लीनचिट देऊन घरी पाठविण्यात येत आहे मात्र रुग्णांच्या आणि मृत्यूंच्या आकडेवारीचा आलेख चढ-उतार करतच आहे. हे सगळं सुरू असताना अमेरिकेच्या परिस्थितीकडेही बघणं थोडं गरजेचं आहे, तिथल्या वाढत्या रुग्णांचा, मृत्यूंचा आकडा पाहिला तर तसं चित्र कोणत्याच देशाच्या नशीबाच येवो नये, असच वाटतं. मात्र तिथलं वास्तविक चित्र पाहिलं तर तिथे माणसांकडून झालेल्या चुकांमुळे तिथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिच परिस्थिती जर मुंबईकरांच्या चुकांमुळे निर्माण झाली तर?
वंटास टीम आज अशीच काहीशी खबर घेऊन आलीये, पाहुयात नेमकं काय ते…
अमेरिकेतील ग्वाईस, मृतांचे शहर
साऊथ अमेरिकेच्या इक्वाडोरचा ग्वाईस प्रदेश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक जीवितहानी झालेला प्रदेश म्हणून समोर येत आहे.  सरकारी नोंदींमध्ये कोरोना साथीच्या रोगात ठार झालेल्या लोकांची संख्या तपासली जात असताना लोकांना कठोर वास्तव्याचा सामना करावा लागला.
ग्वाइसमध्ये एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यांत कोरोना विषाणूमुळे 6700 लोकांचा मृत्यू झाला आहे. ग्वाइसमधील मृत्यूच्या सरासरी संख्येनुसार ही आकडेवारी 5000 पेक्षा जास्त होती. यामुळे ग्वाइस केवळ इक्वाडोरमध्येच नाही तर संपूर्ण लॅटिन अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र बनले आहे.
इथे मृत्यूचे प्रमाण इतके आहे की, कोरोनामृत शरीराची विल्हेवाट लावायचा मोठा पश्न इकडे उपस्थित होतो. इक्वाडोरचे सर्वात मोठे शहर आणि ग्वाईस प्रदेशाची राजधानी असलेल्या ग्वायाकिलच्या शवगृहात काम करणारे कॅटी मेजिया म्हणतात, “आम्ही कारमधील, रुग्णवाहिकांमध्ये, घरात, रस्त्यावर लोकांचे मृतदेह पाहिले आहेत. त्यामागील एक कारण म्हणजे रुग्णालयात बेड नव्हते, म्हणून त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. जर ते एखाद्या खासगी क्लिनिकमध्ये गेले असते तर त्यांना पैसे द्यावे लागले असते आणि प्रत्येकाला हे जमणारं नव्हतं.”
इथे परिस्थिती इतकी गंभीर आहे की रुग्णांवर उपचार करण्याबरोबर त्यांच्या सरकारपुढे मृत प्रेतांचे काय करावे, कशी विल्हेवाट लावावी हा मोठा प्रश्न आहे. मृत लोकांना दफन करण्यासाठी ताबूत कमी पडत आहेत, अगदी लोक कार्डबोर्डवरून शवपेटी तयार करीत आहेत. स्थानिक तुरूंगातील कैद्यांना लाकडी शवपेटी तयार करण्यासाठी कामावर ठेवले आहे.
अमेरिकेतील ग्वाईससारखी आहे का मुंबईची स्थिती?
अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात कोरोनामुळे अशी दुर्दशा होत असेल तर, बाकी छोट्या मोठ्या देशांचे काय होत असेल. मुंबईचा विचार केला तर खरंच पुढील दिवसात मुंबईची परिस्थिती अशी होऊ शकते का?
आता मुंबई सध्या अस्थिर स्थितीत आहे, दिवसेंदिवस रुग्णांच्या आकडेवारीत कमीजास्त प्रमाणात वाढ होत आहे. महत्वाचं म्हणजे मुंबईत कोरोनाला घेऊन टेस्टची संख्या वाढत आहे. त्यामुळे आकडेवारीदेखील वाढतेय. वास्तवाला झुगारून चालणार नाही, लोकांनी योग्यरित्या लॉकडाऊनचे पालन केले पाहिजे आणि स्वच्छता ठेवली तर परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. मृतांचा आकडा कमी असल्यामुळे आपली स्थिती ग्वाईस शहरासारखी नाही होणार; पण ती होऊ नये म्हणून आपणदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments