फेमस

मुंबईचा रेड लाईट एरिया आणि कोरोना! जाणून घ्या सेक्स वर्करची कहाणी

मुंबईतल्या अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो. मुंबईतल्या अनेक महिलांचा हा मजबुरीचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. काही महिला इथे कोणाच्या तरी जबरदस्तीने येतात आणि काही महिला पैसे कमवण्यासाठी कुठला मार्ग मिळत नाही म्हणून येतात. आता हा विषय महत्वाचा नाही. महत्वाचं हे आहे की कोरोनाच्या सगळ्या धावपळीत मुंबईच्या अशा रेड लाईटमध्ये काय परिस्थिती आहे.
वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर तस रोजच संकट असतं मात्र सगळ्यांप्रमाणे या कोरोनानेही त्यांच्यात भर घातली. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित केला. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 23 मार्चपासून 31 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन केला; नंतर तो वाढलाच, हेही खरं आहे. यामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला खरा, मात्र अनेक छोट्या नोकरदारांवर, व्यवसाईकांवर आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते.

सेक्स वर्कर म्हणुन असणाऱ्या एका महिलेशी आमच्या वंटास टीमने बातचित केली. त्यांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला काही प्रमाणात माहिती दिली. त्यांच्या मते सरकारने लॉकडाऊन करण्याआधीच आम्ही आमचा व्यवसाय काही दिवस बंद कऱण्याचा निर्णय घेतला होता. अनेक लोक आमच्या संपर्कात येतात, त्यामुळे त्यांच्याकडून आमच्याकडे आणि आमच्याकडून अनेक लोकांकडे याचं संक्रमण होऊ नये, यासाठी आम्ही हा निर्यण घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांच्या आणि आमच्या आरोग्याच्यादृष्टीने जरी हा आमचा निर्णय योग्य असला तरी आमच्या अनेक मैत्रीणींवर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे. गरजेपुरता वापर करणारे अनेक लोकदेखील आता आमच्या मदतीला येत नाहीत. काही दिवसांपुर्वी अन्नधान्याचा करुन ठेवलेला साठा संपत आलाय. अनेक भाजी मार्केट, रेशन दुकान समोर खुले आहेत, मात्र त्यांना द्यावा लागणाऱ्या पैशांचं काय? हा सवाल तसाच आहे.

जीवावर उदार होऊन आम्ही जरी व्यवसाय सुरू केला तरी अनेक लोक इथे येण्यासाठी घाबरत आहेत. जे लोक मोटर सायकलवरून येत आहेत, त्यांनादेखील पोलीस धुडकावून लावत आहेत. आमच्यात काही महिलांना वातावरणानुसार ताप-सर्दी सारखे आजार झाले आहेत, मात्र संशयामुळे इथल्याच महिला त्यांना दूर लोटत आहेत.

इथल्या कामाठीपुरा येथे मागील 25 वर्षांपासून देहविक्री करणाऱ्या महिला सेक्स वर्कने सोनीने सांगितलं की “पूरा जिंदगी इधर निकाला, इतना बम फटा, अटैक हुआ, कितना बीमारी आया लेकिन ऐसा हालत कभी नहीं था।” लॉक डाऊनच्या दिवसांमध्ये एकही गिर्हाइक इथं आलं नाही. तस्करीमुळे या ठिकाणी पश्चिम बंगाल, बांगलादेश, नेपाळ इथून अनेक तरुणी इथे आल्या. रोज धंदा होत असे त्यामुळे कुठलीच खंत त्यांना वाटत नसे, मात्र आजच्या परिस्थितीमुळे घरी पैशे पाठवण्याचे लांबच इथे दोन वेळेचं जेवन खाणेदेखील अवघड झालं आहे, असं सोनी म्हणतात.
आणखी वाचा…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments