आपलं शहर

कोरोनासोबत लढणारे खरे बॅक स्टेज हिरो

प्रत्येक फिल्ममध्ये बॅक स्टेज हिरो असतात, जे पडद्या मागे राहून काम करतात. त्यांची ओळख कधी दाखवली जात नाही; ना त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. आज कोरोना विषाणूने संपूर्ण विश्व हादरून टाकलं. आपणदेखील घरी बसलो आहोत. देवळात देवाची पूजा करणारे लोक आता अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार यांना देव मानू लागले आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्या डोळ्याच्या आड अजून कोणीतरी आहेत, जे २४×७ त्यांची ड्युटी हेच आपले कर्तव्य समजून करतात. ते म्हणजे अँबुलन्स वरती काम करणारे आपले सैनिक मित्र. वंटास मुंबई त्यांचेही आभार मानने स्वतःचे कर्तव्य समजते.

बॅकस्टेज हिरो आपले अँबुलन्स ड्रायव्हर आणि अँबुलन्सचे कामगार
रात्री अपरात्री इमर्जन्सी असेल तर उठून धावत जाणे, पेशन्ट कोणताही असो, त्यांना उचलणे, शिफ्ट करणे अशा अनेक कामांसोबत ते आपल्या जीवाशी खेळत असतात. डॉक्टर यांना पेशन्ट हाताळताना सुरक्षितता असते, त्यापैकी २०% तरी असते का हो ह्यांना? तर नाही!
कोणताही आजाराचा पेशन्ट असो; वा मृतदेह, हे अँबुलन्स वाहक न झिजकता आपले काम करतात. वरती मी अँबुलन्सवरती काम करणारे आपले सैनिक मित्र असा उच्चार केला, त्याचाच अर्थ असा की बॉर्डरवर आपले सैनिक देशाच्या लढाईसाठी सदैव तत्पर असतात. रात्र दिवस एक करून आपला जीव धोक्यात घालून ते लढतात, त्याचप्रकारे आपले हे अँबुलन्सवरचे सैनिक आहेत. जे वेळ काळ न बघता पेशन्टचा जीव वाचविण्यासाठी खंबीर उभे असतात.
हे आपले अँबुलन्सवरचे कामगार बंधू झाले, आता आपण अँबुलन्सचे ड्रायव्हर काका यांच्याकडे वळूया. एक जीव वाचविण्याची जबाबदारी त्यांच्यावरही असते. कमी वेळेत रस्त्यावरून गाडी चालवत सगळ्या नियम, सुरक्षिततेचे भान ठेवत लवकरात लवकर पेशन्टला हॉस्पिटलमध्ये पोहचविणे ही खूप मोठी बाब असते. शरीरातील अनेक भागांचे ट्रान्सप्लांटेशन करताना डॉक्टरांएव्हढेच महत्वाचे काम हे आपले ड्रायव्हर काका करत असतात.
कोरोनाच्या आणीबाणीत काय आहे त्यांची परिस्थिती
आता कोरोना असो की आणखी कोणता आजार, त्यांच काम हे ठरलेलं. आमच्या वंटास टीमने काहींशी बातचीत केल्यावर आम्हाला समजले, संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्यांच्याही मनात भीती निर्माण झाली आहे. हे त्यांना धरून नाही तर त्यांना जर कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांच्या कुटुंबाला देखील होऊ शकतो. ह्या भीतीने ते नैराश्य व्यक्त करतात. अनेकजण असेदेखील आहेत जे घरीच गेलेले नाही. कामाच्या व्यापामुळे आणि संर्सगाच्या भीतीने आपल्या कुटुंबाला देखील ते भेटू शकत नाहीत. काहीतर असे आहेत जे घरी तर जाऊ शकतात, पण लहान मुलांपासून त्यांना दूर राहावे लागते. काहींचे कुटुंब तर कामावर जाऊ नका असे बजावून सांगतात; पण आर्थिक स्थिती पाहिली तर त्यांच्यापुढे नाईलाज असतो.

खरंच, पोलिस, डॉक्टरांसोबत वंटास टीम आपलेही खूप आभार मानते. पडद्यामागच्या ह्या हिरोंना वंटास टीमचा आदराचा एक सलाम

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments