आपलं शहर

आजच्या सारखंच देशात अजून एक लॉकडाऊन होत; जे बाबासाहेबांनी दूर केलं: वाचा सविस्तर!

देशावर कोरोनामुळे महासंकट आलाय, अनेक गोष्टींपासून इथला समाज आता वंचित राहू लागलाय, वाटेल ते करण्यासाठी, वाटेल तसे वागण्यावर आता बंदी आलीये. हे सगळं सुरू असताना अशाच एका भूतकाळातल्या महारोगाची आठवण येऊन जाते. ती म्हणजे अस्पृश्यतेची.

काय फरक आताच्या कोरोनात आणि त्या काळच्या अस्पृश्यतेत
कोरोना आपल्याला स्वच्छता आणि सोशल डिस्टनसिंग शिकवून जातोय. एका आजाराने सगळं काही नाहीस केलं. लोकांना एकमेकांपासून दूर राहाण्यास भाग पाडलं.
एव्हढच नाही तर लागण झाली तर स्वतःला वेगळीकडे डांबून ठेवण्याची वेळ आनलीये. कोरोना विषाणूला जात पात धर्म कळत नाही. तो कुणालाही होऊ शकतो. ऐकेकाळी समाजात काही लोकांच्या मनात असाच जात धर्माला घेऊन विषाणू जागा होता. त्यावेळी देशाच्या व्यवस्थेने दलित समाजाला एक प्रकारे क्वारंटाईन करुन ठेवलं होत. सोशल डिस्टनसिंग नव्हे तर पूर्णतः दलित समाजाला बायकोट करण्यात आलं होतं. अनेक विधी, कार्यक्रमात त्यांना येण्यास बॅन केलं होतं. सामूहिक जेवण असो वा सोहळा त्यांची एक वेगळी पंगत असे.
आज एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर त्याला विलगिकरण क्षेत्रात ठेवले जाते. समाजातून त्याच्याबद्दल द्वेषाची अथवा त्या कोरोना रुग्णामुळे त्याच्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून त्याची ओळख लपवली जाते. पण त्या काळचे काय? जेव्हा अशीच वागणूक दलित समाजाला दिली जात होती? ते माणूस नव्हते का? त्यांना भावना नव्हत्या का? असे प्रश्न पडतात आणि आता सगळं व्यवस्थित आहे तर वाईट देखील वाटते.
जस राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोरोना पासून स्वतःला बचावण्यासाठी देशाला, राज्याला संबोधित करत आहेत, तस त्या काळी एक परखड व्यक्तिमत्त्व असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांसाठी एकटे लढत गेले आणि त्यांना न्याय मिळवून दिला.
 
बाबासाहेबांचा दलित सामाजिक लॉकडाऊनवर विजय
अथांग प्रयत्नानंतर दलित समाजाचे लॉकडाऊन, हजारो वर्षाच्या गुलामगीरी, यातना, सोशल डिस्टन्सिग संपुष्टात आणून त्यांना त्यांचे मानवी मूलभूत हक्क मिळवून दिले, देशाला विषम विचारांतून मुक्त केले. अगदी शिक्षणापासून नोकरीपर्यंत आणि सामूहिक सोहळ्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळं मुक्त केलं. त्यावेळी खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिक देशातील आपले स्वतंत्र अनुभवू लागला.
आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल, कधीकाळी समाजाने त्यांचे सर्व हक्क नाकारले होते त्यांनी आज प्रत्येक मानवाला त्याचे हक्क मिळवून दिले. एव्हढेच नव्हे तर संपूर्ण देशाच्या संविधानात आपले मूलभूत अधिकार दिले.

 

बाबासाहेबांचे हे विचार अजूनही कोरोनामुळे आलेल्या संकटातून बाहेर काढू शकतात

 

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि श्रमिक तसंच मजुरांच्या हातचं काम पहिल्यांदा गेलं. आता आर्थिक संकट पुढे उभं राहिलं, त्यात घरी बसून राहावे लागत असल्यामुळे कामाची शाश्वती राहिली नाही. अर्थव्यवस्था खचली की पहिला बळी जातो तो म्हणजे गरिबांचा. देशावर कोणतही संकट येवो, चक्कीतल्या आट्यासारखा पीसला जातो, तो म्हणजे गरीब वर्ग.
बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्याच आर्थिक विचारांचा केंद्रबिंदू हा कॉमन मॅन म्हणजे गरीब होता. समाजातला सर्वात खालचा आर्थिक वर्गच त्यांच्या नजरेसमोर असे. नियोजनबद्ध आर्थिक विकासात सामान्य माणसाच्या गरजा समाधानकारकपणे पूर्ण करण्याचे नियोजन सरकारने करावे. गरिबांना त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक विकासासाठी आवश्यक सुविधा0 पुरवण्याची मोठी जबाबदारी सरकारने घ्यावी, योग्य नियोजन, तरतुद करावी या मताचे ते होते.
आभाळा एव्हढे व्यक्तिमत्त्व असलेले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वंटास टीम कडून या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments