घटना
लॉकडाऊननंतर मुंबईतला कोरोना संपेल, असं तुम्हाला वाटतय; तर ‘ही’ माहिती तुमच्यासाठी

22 मार्चला देश बंद झाला, तिथूनपुढे महाराष्ट्र राज्य बंदच आहे, गेल्या 14 तारखेला कोरोनावर सलामी मारून राज्य कोरोनामुक्त होईल असं तज्ञ सोडले तर अनेक नागरिकांना वाटत होतं, मात्र तस झालं नाही, उलट तज्ञांच्या सल्ल्यानुसार अजून 21 दिवस तो लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यानंतर लॉकडाऊन संपलेला दिवस काही उजाडला नाही. अनेकांना लॉकडाऊन संपवून लवकरात लवकर कामावर जायचय कारण सगळ्यांना पैशांची चणचण आहे.
काही दिवसांपूर्वी कमावणारे दोन आणि खाणारे सहा अशी परिस्थिती होती, आता त्याच घरात खाणारे तेवढेच मात्र कमवणारा कोणीच नाहीये, त्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपलेय. जितका लॉकडाऊन वाढवला जाईल तितका देशाच्या अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम होईल, असे मत काही अर्थतज्ज्ञ मांडत आहेत.
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही एक मत मांडल होत की लॉकडाऊन म्हणजे एका व्हिडिओला पॉज करण्यासारखं आहे. तुम्ही प्ले केलात की व्हिडीओ पुन्हा सुरू होणार, म्हणजेच लॉकडाऊन हा कोरोनाला आहे तिथेच थांबवत आहे, मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरू होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
【वाचावं लागतंय – वेळीच कोरोना थांबला नाही तर सगळ्यात मोठं नुकसान धारावीचं होऊ शकतं…】
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील असाच काहीसा सल्ला राज्य आणि केंद्र शासनाला दिला आहे, त्यांच्या मते लॉकडाऊन वाढवणे म्हणजे आर्थिक संकटाला पाचारण करणे होय, त्यामुळे फक्त लॉकडाऊन वाढवुन गोष्टी भागणार नाहीत, तर राज्यातल्या चाचण्या करण्याच प्रमाण वाढवलं पाहिजे.
मुंबईतला लॉकडाऊन आणि कोरोनाची स्थिती
22 मार्चपासून बंद पुकारल्यानंतर मुंबई हळू हळू बंद होऊ लागली आणि आज ती पूर्णच बंद आहे. अनेकांना वाटलं होतं की 14 एप्रिलला संपूर्ण मुंबई पुन्हा धावेल, मात्र अस काहीच होताना दिसलं नाही. मुंबईत सगळीकडे शांतता असली तरी कोरोना कुठून ना कुठून तरी पसरत आहे. बड्या वस्तीत आलेला कोरोना हळू हळू झोपडपट्टीत आला आणि मोठ्याप्रमाणात प्रसार होण्यास सुरुवात झाली. आजघडीला मुंबईत 100 हुन अधिक ठिकाणांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केलय, तर 300 हुन अधिक ठिकाणे सील केल्यात. त्यातच रुग्णांच्या आकड्याने 2000 ची संख्या पार केलीये, तर मृत्यू 100 च्या पार. (हे आकडे रोज वाढत असल्याने स्थिर आकडा सांगणे मुश्किल आहे) आता या सगळ्या परिस्थितीवरून सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की लॉकडाऊन असूनदेखील, सगळे लोक घरात असूनदेखील
मुंबईतला आकडा एवढा का?
【हेही वाचा – मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचं एकच कारण आहे…!】
मुंबईत अजूनपर्यंत 50 हजारहुन अधिक डोअर टू डोअर चेकिंग झाल्याची माहिती महानगरपालिकेकडून दिली जातेय. मुंबईत सध्या 7 कोरोना केअर सेंटर आहेत, काही कोरोना हेल्थ सेंटरची तयारी सुरू आहे आणि हॉस्पिटल्सतर सज्ज आहेतच. या सगळ्यात जर संशयित वाटत असेल तरच संबंधित व्यक्तिची तपासणी होणार आहे. अशी माहितीदेखील प्रशासन सांगायला विसरले नाही.
असा निर्णय कशासाठी?
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सगळ्यात मोठे आर्थिक व्यवहार याच शहरातुन होत असतात, मोठ्या बँका, उद्योगधंदे याच शहरातून कंट्रोल केले जातात, त्यामुळे हे शहर बंद ठेवणे प्रशासनाला मोठं महागात पडत आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली थांबल्या आहेत. त्याचाच परिणाम देशाच्या बजेटवर पडण्याची शक्यता आहे, या सगळ्याचा विचार करून मुंबईतील लॉकडाऊन संपवण्याचा प्रयत्न मुंबई प्रशासनाकडून केला जात आहे.
जर अशाने लॉकडाऊन संपवला तर काय होईल?
लॉकडाऊन असूनही रुग्णांची संख्या समोर येत आहे. म्हणजेच काही प्रमाणात ती संख्या कमी आहे, याचाच अर्थ मुंबईतला प्रसार आटोक्यात येतोय, मात्र लॉकडाऊन संपला आणि संपूर्ण मुंबईकर पुन्हा कामावर रुजू झाले तर संक्रमानाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सध्याजरी तुम्ही घरात राहात असला तरी आसपास किंवा तुम्हाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घ्या.