आपलं शहर

मी बातमी करत होतो आणि कॉल आला; तुम्ही कुठेय? तुमचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेत…

20 तारखेला मुंबईतल्या पत्रकारांचे कोरोना संदर्भातील रिपोर्ट आले आणि वातावरण गंभीर झाले. गेल्या काही दिवसांपुर्वी एका प्रिंटमधल्या पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी खुद्द याच पत्रकारांनी दिली होती आणि आज त्यांच्याच चॅनलने 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली. एकुण 167 पत्रकारांची मुंबईतील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि मुंबई महापालिकेतर्फे कोरोनाची संदर्भातील तपासणी झाली होती, त्यापैकी 53 जणांची चाचणी पॉजिटीव्ह आली मात्र एवढ्या पत्रकारांच्या चाचणीची संख्या खूप कमी आहे, अजून काही पत्रकारांच्या चाचण्या होणे गरजेचे आहे, असे मत द वायर या वेब पोर्टलने मांडले आहे.
16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईतल्या पत्रकारांची चाचणी झाली आणि त्याचे रिपोर्ट्स रविवार, सोमवारी येऊ लागले. ज्यांचे रिपोर्ट्स असिंप्टोमॅटिक पॉजिटीव्ह आले त्यांना कोरोना सायलंट कॅरिअर म्हणून घोषित केले आणि त्यांना गोरेगाव येथील फर्न हॉटेलमध्ये कॉरंटाईन केले गेले. मुंबईतील जितक्या पत्रकारांच्या चाचण्या झाल्यात त्याच्या तिप्पट पत्रकार मुंबईत काम करत असतात, काहीजण लॉकडाऊनमुळे येऊ शकले नाहीत, तर काही बातम्यांमुळे तिथे येऊ शकले नाहीत, त्यामुळे अशांच्या चाचण्या अजून झाल्याच नाहीत. असं तिथे चाचणी करुन घेतलेल्या निगेटिव्ह आलेल्या पत्रकाराने माहिती दिली.
फिल्डवर असलेल्या आणि पॉजिटीव्ह आलेल्या एका पत्रकाराने माहिती दिली…
मी शु्क्रवारी (17 तारिख) कोरोना संदर्भात चाचणी करून घेतली, त्यावेळेस माझ्यासोबत माझ्या मित्रांनीही सोशल डिस्टंसिंग ठेवून रांग लावली होती आणि चाचणी करून घेतली. आज त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. मी चाचणी करुन घेताना किंवा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतरची ठणठणीत आहे, मला कोणताही त्रास होत नाहीये. याचं कारण मी डॉक्टरांना विचारलं तर त्यांनी सांगितल की मी कोरोना सायलेंट कॅरिअर म्हणून काम करत आहे, त्याचा त्रास मला नाही, पण याची लागण माझ्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांना म्हणजे माझ्या लहान मुलांना, आईला, जमल्यास वडिल आणि पत्नीला होऊ शकते. आज मला त्याचीच भिती आहे की मी ठिक आहे पण माझ्या घरच्यांचं काय?
फिल्डवर असलेल्या आणि पॉजिटीव्ह आलेल्या एका कॅमेरामनने माहिती दिली…
आम्ही त्यादिवशी फिल्डवर होतो. पण गडबडीत चाचणीसाठी गेलो आणि चाचणी करून घेतली. मी आताही ठिक आहे, मात्र मनात एक भिती आहे. अनेक रिपोर्टर बाईट घेताना, 121 करताना अनेकांच्या संपर्कात येतात, सोबतच आम्हीही त्यांच्या जवळच असतो. मी अजूनपर्यंत प्रत्येकवेळी काळजी घेतलेय, गाडीतून बाहेर पडल्यानंतर मी मास्क कंपल्सरी वापरलाय, पण मला समजत नाही की पॉजिटीव्ह आलेल्या कोणाच्या मी संपर्कात आलेलो? घरच्यांनी माझ्या काम करण्याला पुर्ण विरोध केलाय, मात्र हातून काम जाण्याची भिती माझ्या मनात कायम आहे. कारण एकवेळ अनेक रिपोर्टर घरात बसून बातम्या देऊ शकतात, मोबाईलवरून लाईव्ह देऊ शकतात, पण आम्ही काय करू?
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या पत्रकारांना याबद्दल काय वाटतं…
आमच्या संस्थेने काही दिवसांपुर्वीच नियोजन करून आम्हाला वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिल्यात. तरीही आम्हाला संधी होती म्हणून आम्ही त्यादिवशी तपासणी करुण घेतली. आमची चाचणी निगेटिव्ह आली आहे, हे आमच्यासाठी आणि आमच्या घरच्यांसाठी खूप मोठी बातमी आहे, मात्र काही दिवसांपुर्वी बातम्यांसाठी एकत्र येणारे, जेवन करण्यासाठी, चहा पिण्यासाठी आणि एकमेकांच्या सुखदु:खात एकत्र येणारे असे माझे अनेक मित्र आज पॉजिटिव्ह आलेत. मला समजत नाही की त्यांच्या संदर्भात बातमी देऊ की त्यांना कॉल करून ते कुठे आहेत, कुठल्या परिस्थितीत आहेत याची विचारपुस करू.

 

ज्या पत्रकारांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेत, त्यातील अनेक जण मोठ्या संस्थेत काम करत आहेत, तर काहीजण कमी भांडवल असलेल्या संस्थेत काम करतात, मोठ्या वृत्तवाहिनीतील पत्रकारांना काम जाण्याची कोणतीच भिती नाही, मात्र कमी बजेट असलेल्या, नव्याने सुरू झालेल्या वृत्तसंस्था, वृत्तवाहिनीतील पत्रकारांना, कॅमेरामनला काम जाण्याची भिती आहे, त्यासाठी त्यांचा रखवालदार कोण असा प्रश्न कायम आहेच!

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments