घटना

चार दिवसांपूर्वी आपल्या आईला गमावून आज ते आपल्या आईकडे निघून गेले…

IMG astu7b

“तुम मेरी दुनिया छीनोगे, मैं तुम्‍हारी दुनिया में घुस जाऊंगा” हा मदारी चित्रपटातील इरफान खान यांचा डायलॉग.
बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान बनवलेला अभिनेता इरफान खान यांचा एक वेगळा चाहता वर्ग होता. बोलणाऱ्या डोळ्यांतून अभिनय आणि संवाद कौशल्याच्या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. चाहत्यांच्या मनात घर केलेल्या या अभिनेत्याने आज ह्या रंगीन सृष्टीला अलविदा केले. 
आपल्या आईला गमावून काही दिवसातच आईकडे परतले
नुकत्याच चार दिवस आधी (26 एप्रिल) त्यांची आई सायदा बेगम यांचे वृद्धपकाळाने निधन झाले होते. जयपूरच्या बेनीवाल कांता कृष्णा कॉलनीतील रहिवासी असलेल्या सायदा या 95 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून त्या असव्यस्त असल्याचे सांगितले जाते. यातूनच त्यांचे निधन झाले. देशात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे आईच्या शेवटच्या संस्कारांसाठी राजस्थानला जाऊ शकले नाही, इरफान खानने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंत्यसंस्काराला उपस्थिती दर्शविली होती. कुटुंबातील अगदी मोजक्या जणांनाच अखेरच्या वेळी त्यांच्या सोबत राहायला मिळाले. 
अभिनेता इरफान खानला अलविदा
“डेथ और शिट, किसी को, कहीं भी, कभी भी, आ सकती है” हा पिकू चित्रपटातील त्यांचा डायलॉग आज मनाला भुरळ पाडून गेला. त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी त्यांचे न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर या आजाराने निधन झाले. अभिनेता इरफान खान यांनी लंडनमध्ये आजरावर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 
पान सिंह तोमर, हैदरी, लाईफ ऑफ पाय, हिंदी मिडीयम, तलवार, द लंच बॉक्स या चित्रपटातील त्यांचा अभिनय नेहमीच लक्षात राहण्यासारखा आहे. सिनेसृष्टीतील एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. बॉलीवूडच नव्हे तर त्यांनी अनेक हॉलीवूडचे चित्रपट करून आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला होता. मराठीमधील सैराट सारख्या चित्रपटाच्या प्रेमात पडणार इरफान हा त्याच्या अभिनयातून अनेकांचा प्रेरणास्त्रोत बनला होता. हिरो बनण्याची कोणतीही ठाम कला नसताना इरफान यांनी अनेक “वन मॅन शो” चित्रपट गाजवले. असा आर्टिस्ट ह्या बॉलीवूडमध्ये पुन्हा होणे नाही. अशा सप्तरंगी आर्टिस्टला वंटास मुंबईचा सलाम. इरफान खान चाहत्यांच्या मनात हजारो वर्षे जिवंत असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments