आपलं शहर

धक्कादायक! त्या एका मॅसेजमुळे जमले बांद्रा स्टेशनच्या बाहेर हजारो बिहारी आणि बंगाली

“एक छुटकी सिंदुर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू” हा डायलॉग सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. एक छुटकीभर कुंकू काय करू शखतो, याचं महत्व सांगणारा हा डायलॉग आहे. अशातच “एक छोटे मॅसेजकी किंमत तुम क्या जानो वंटास बाबू”, असं म्हणायची वेळ आलीय. कारण लफडंही अगदी तसच झालय.
नेमकं झालं काय?
बांद्रा येथील शास्त्री नगर, त्याच्या जवळचच महाराष्ट्र नगर, दर्गा गल्ली, नर्गिस दत्त नगर, राहुल नगर लीलावती, गरीबनगर बांद्रा ईस्ट अशा ठिकाणी मुंबईचे परप्रांतिय म्हणजेच बिहारी, बंगाली आणि युपीचे लोक राहातात. हे सगळे छोटेमोठे उद्योग करत इथेच वास्तव करत असतात, मात्र मुंबई ज्यावेळी बंद पडली त्यावेळेस हे परतीच्या प्रवासाला लागण्यास सुरू झाले आणि याचंच एक उदाहरण म्हणजे बांद्राच्या शास्त्रीनगर येथील गर्दी.

 

मंगळवारी (दि 14 एप्रिल) संध्याकाळी साडे तीनच्या सुमारास बांद्रा येथील शास्त्री नगर परिसरात अचानक मोठी गर्दी जमान्यास सुरुवात झाली. 21 दिवासांच लॉकडाऊन लागू झालं, ते संपलंही; तरी परत लॉकडाऊन जाहिर केला. त्यामुळे आता लॉकडाऊन जरी वाढला तरी आपण अंदोलन करू आणि गावी जाण्यासाठी आमची काही तरी सोय करा, असं प्रशासनाला सांगू अशाप्रकारचा मॅसेज युपी, बिहारी आणि बंगाली लोकांच्या ग्रृपवर व्हायरल होऊ लागले.

 

अशा उद्देशाने आंदोलन केल्यावर आपल्याला घरी जाण्याची कोणती ना कोणती व्यवस्था केली जाईल, या कारणाने आजूबाजूच्या परिसरातील अनेक बिहारी, बंगाली आणि यूपीच्या नागरिकांनी मंगळवारी जमण्यास सुरुवात केली. मुंबईत सगळीकडे लॉकडाऊन असल्याने लोक बाहेर पडू नयेत म्हणून सगळीकडेच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे, त्यामुळे एकेठिकाणी मोठा फौजफाटा ठेवणे मुश्किल असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. सुरुवातीला याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या 4 पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला; मात्र गर्दी वाढत चालल्याने याठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांकडून लोकांची समजूत काढूनही गर्दी क्षमण्याचे कोणते संकेत दिसत नसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करण्याची ऑर्डर आली.
काय सांगतो आंदोलनात सहभागी झालेला तरुण
जिथे अनेक युपी, बिहारी आणि बंगाली जमले होते, त्यात अजून एक तरुण होता, ज्याचं नाव आहे जमील मुल्ला. जामिल मुल्ला हा बांद्राच्या शास्त्रीनगर येथील छोटा व्यापारी आहे. त्याने जी कबुली दिली ती या घटनेच्या सगळ्या प्रसंगांना उत्तर देणारी आहे.

 

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आणि आमच्या राज्यातील लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला. भविष्यातील पोटाची चणचण आणि पैशाची कमी या कारणामुळे परप्रांतिय बुचकळ्यात पडले होते, त्यातच एक मॅसेज ग्रृपवर पडला आणि सगळ्यांना वाटलं की आम्ही आता गावी जाणार. जर आज एकत्र येऊन आवाज उठवला तर आपल्याला गावी जाण्याची सोय केली जाईल, अशाप्रकारचा तो मॅसेज होता, याच मॅसेजचा आणि एकमेकांशी झालेल्या फोनच्या संभाषणामुळे इथे गर्दी वाढू लागली, त्यात विनय दुबे या तरुणाने आपल्या सोशल मिडीयावरून एक व्हिडीओ क्लिप व्हारल केली आणि आगीत तेल पडलं.

 

याच एका व्हायरल मॅसेजमुळे 3 हजारांहून अधिक गर्दी मुंबईच्या एकट्या बांद्रा परिसरातून जमा झाली होती, त्यामुळे अशा व्हायरल मॅसेजमुळे मुंबईत पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी मुंबई प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे. सोबतच सोशल मीडियावर  व्हायरल मॅसेज पसरवणे आणि लोकांना लॉकडाउनच्या काळात भडकवणं हे चांगलंच महागात पडू शकतं, याची खबरदारी लोकांनी घेतली पाहिजे, त्याच उदाहरण देखील आपल्या समोर आहे, ते म्हणजे या सगळ्याच मूळ कारण बनलेला विनय दुबे.

 

आज फक्त ट्रेलर पाहायला मिळाला, अशाच अफवा पसरुन एक दिवस संपुर्ण चित्रपट पाहाण्याची वेळ सगळ्या मुंबईकरांवर येऊ नये, इतकीच आपेक्षा.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments