आपलं शहर

#CoronaGo मुंबईकर 100 च्या पार, ‘या’ खाजगी रुग्णालयात मिळणार मोफत उपचार

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत Covid-19 रूग्णांवर 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार मुंबईतील कोणत्याही खासगी रुग्णालयात सध्या ही सेवा सुरू नाही, मात्र आजपासून ही सुविधा मुंबईच्या तब्बल 42 रुग्णालयात सुरू करण्यात येणार असल्याचे मत राजेश टोपे यांनी त्यांच्या 26 मार्च रोजीच्या एका सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये म्हटलं होते.
या योजनेअंतर्गत संबंधीत रुग्णाचा 1,50,000 लाखांपर्यंतचा खर्च शासनाकडून दिला जाणार आहे. यात काही डायलिसिस केंद्रांसह 27 खाजगी रुग्णालये समाविष्ट आहेत. या यादीत एचसीजी, अपेक्स, सुश्रुता, के जे सोमैया, एच जे दोशी, लाइफलाईन रुग्णालयांसारख्या रुग्णालयांचा समावेश आहे. अशा रुग्णालयांना जबरदस्तीने याची अंमलबजवणी करण्याचे आदेशदेखील महाराष्ट्र शासनाने दिले आहेत.
सध्याच महाराष्ट्र शासनाने जसलोक, एच.एन, रिलायन्स, हिंदुजा, कोकिलाबेन, रहेजा, बॉम्बे, लीलावती अशा काही रुग्णालयांमध्ये 100 खाटांचे आयसोलेशन वार्ड उभारण्यात आले आहेत. ज्याच्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना उपचारासाठी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रुग्णालये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत येत असल्याने अनेक रुग्णांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments