खूप काही

भर लॉकडाऊनमध्ये शपथ घेण्यासाठी ते 2200 किमी लांबून मुंबईत आले…

WhatsApp%2BImage%2B2020 04 28%2Bat%2B18.02.46%2B%25281%2529
Add caption
देशात कामाशी तत्पर असलेले अनेक अधिकारी आपण पाहात असतो, आपल्या राज्यातही असे अनेक अधिकारी आहेत, जे आपली सेवा बजावताना जिवाची पर्वादेखील करत नाहीत. असच एक उदाहरण सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत आपल्या मुंबईत पाहायला मिळत आहे. आज मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्ती पदाची शपथ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी घेतली. भर लॉकडाऊनमध्येदेखील कोलकाताहून तब्बल 2000 हून अधिक किलोमीटरचा प्रवास चक्क गाडीने करत ते मुंबईत दाखल झाले, त्यामुळे कामासाठी तत्पर असलेल्या अशा न्यायाधिशांना सर्वप्रथम वंटास मुंबईचा सलाम.

आज (मंगळवारी 28 एप्रिल रोजी) निवडक लोकांच्या उपस्थितीत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मुंख्यंमत्री उध्दव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, न्या. दत्ता यांचे कुटुंबीय, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग इतके पाहुणे उपस्थित होते.

कोण आहेत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता
09 फेब्रुवारी 1965 – जन्म
16 नोव्हेंबर 1989 – वकिलीला सुरूवात
न्यायमुर्ती दत्ता यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी वकिली सुरू केली. गाढा अभ्यास, अनुभव याच्या जोरावर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात, गुवाहाटी उच्च न्यायालयात, झारखंड उच्च न्यायालयात आणि काही वेळा सर्वोच्च न्यायालयात असं एकूण १६ वर्षे झाली ते सेवा बजावत आहेत. ही सेवा बजावत असताना त्यांनी घटनात्मक, कामगार, सेवा, शिक्षण आणि वाहतूक असे विषयक योग्यरित्या हाताळले आहेत. असं म्हटलं जातय की घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये न्यायमुर्ती दत्ता यांचा विशेष अभ्यास असल्याचे म्हटले जातेय.
कसा झाला कोलकत्ता ते मुंबई प्रवास?
लॉकडाऊनमुळे राज्या-राज्याच्या सिमा बंद आहेत, देशाअंतर्गत चालणारी विमानसेवादेखील बंद आहे, त्यामुळे हवाई वाहतुकीचा पर्याय न निवडता रस्त्यावरून तब्बल 2217 किलोमीटर गाडी चालवत येणेच त्यांना भाग होतं. काही वेळ स्वत: तर काहीवेळ आपल्या त्याच्यात अनेक ठिकाणी होणारी तपासणी, रस्त्यावर भूक लागली तरी काही खाण्यास न मिळणारी परिस्थिती हेदेखील त्यांच्या नशिबात होतच. 41 तासांचा प्रवास, दोन दिवस, दोन रात्रींचा कालावधी पार करत दत्ता कुटुंबिय मुंबईत पोहोचले.

सध्या संपुर्ण देशातील राज्या-राज्यांच्या सिमा बंद आहेत, त्यातल्या त्यात जिल्हा आणि तालुक्यांच्यादेखील सिमा बंद असल्याने देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणाऱ्या व्यक्तीला जर विचारलं तुमचा प्रवास कसा होता, तर नक्कीच एका देशाची बॉर्डर पार करून दुसऱ्या देशात सुखरूप येण्यासारख्याचा अनुभव असल्याचं ती व्यक्ती सांगेल, कदाचित तसाच काहीसा त्रास न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना झाला असावा, मात्र कामासंदर्भात असलेली तत्परता हाच नव्या तरुणांसाठी एक आदर्श असेल, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments