भुक्कड

आपले वंटास मुंबईकर आणि त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारी एकदम खास डिश

अन्न, वस्त्र, निवारा ह्यांसोबत मुंबईचे स्ट्रीट फूड; त्यात सगळ्यांबरोबर चांगलं रिलेशन असणारा मुंबईचा वडापाव. मुंबईकऱ्यांच्या जिभेचे चोचले पुरवनारे ढाबे आणि हॉटेल्स हे मुंबईकरांच्या गरजू गोष्टींमध्ये येतं. आता लॉकडाऊन जरी असला तरी पोटा-पाण्याचा प्रश्न असतोच ना मंडळी. म्हणून आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी खास डिश.

आता दोन गोष्टी येतात, एकतर आपली शाकाहारी मंडळी आणि दुसरे आपले मांसाहारी मुंबईकर. आजचा भुक्कड ब्लॉग हा मांसाहारी मुंबईकरांसाठी विशेष आहे, तरीही शाकाहारी मंडळींनी आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी, घरच्यांचसाठी हे वाचवच.
केपसा
आठवला का मुंबईकर? हो तोच तो; जो तुम्ही 2 /4 मित्र एकत्र बसून पोट भरून त्याचा आनंद लुटता. खाली आपल्या चिकनची ग्रेव्ही, त्यात तंदुरीचे पीस आणि टेस्टी टेस्टी सगळं मिश्रण असलेला राईस. बर्थडे पार्टी असो वा आपला स्पेशल मिट, केपसाची साथ भेटली तर आठवणीत नक्कीच राहणार.
हा दावा वंटास मुंबईची टीम नाही तर मुंबई चे केपसा लव्हर करतात. न खाल्लेलयांसाठी एक प्रकारे चिकन बिर्याणी झाली पण चिकन बिर्याणी आणि केपसा मधला फरक सांगू शकेल तो म्हणजे ज्याने अफझाल भाई च्या हॉटेल मध्ये केपसा खाल्ला असेल.
केपसाची टेस्टी खान म्हणजेच मुंबईच्या अफझल भाईकी दुकान
मुंबईच्या भायखळा येथील साई निकेतन इमारतीच्या समोर, तुळशीवाडी, शिवदास चिप्सी मार्ग येथे असलेला अफझल हॉटेलमधला केपसा हा सगळ्यात फेमस आणि चविष्ट पदार्थ आहे. मुंबईकरांनी केपसा खायचा तर अफझल भाईंच्या हॉटेल मधला. 350 पासून स्टारटिंग असणारा हा केपसा 2 ते 3 मुंबईकरांच्या जिभेचे चोचले आरामात पुरवू शकतो.
केपसा शिवाय नॉन-व्हेजसाठी खूपच भारी आणि मुंबईकरांना खुश करणारे हे हॉटेल आहे. तर नक्कीच मुंबईकर केपसा तुम्ही खाल्ला नसेल तर लॉकडाऊन संपल्यानंतर नक्कीच ट्राय करा…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments