आपलं शहर

लॉकडाऊन, अक्षय तृतीया आणि मुंबईतील सोन्याचा दर; पाहा काय आहे भानगड

कोरोनाच्या लॉकडाऊनने गेल्या दोन महिन्यातील सण-उत्सव मुंबईकरांना एका वेगळ्या पद्धतीने साजरा करायला शिकविले. माणूस घरी बसून शांततेत एखादा सण साजरा करू शकतो, हे त्याला पहिल्यांदाच समजले असावे. आज अक्षय तृतीया! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाऊन या दिवशी अनेक नवीन कामाला सुरुवात केली जातेय. अनेक लोक दाग-दागिने खरेदी करतात, नवीन कामांचे उद्घाटन करतात; पण या कोरोनाने जणू सगळ्या आनंद-उत्सवाला ग्रहण लावलेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदी करण्यात आली आणि एक प्रकारे सगळयांच्या आनंदाला टाळा लागला. 

आज खरेदारीच्या सर्व बाजरपेठा बंद आहेत. मुंबईत गुढीपाडवा असो; वा अक्षय तृतीया, या दोन दिवसांमध्ये सोने खरेदीवर मुंबईकरांचं मोठा भर असतोच. परंतु आज सराफ बाजार बंद असल्यामुळे सोने खरेदीला मोठा फटका बसत आहे. बाजारपेठा बंद आहेत; पण सोन्याचे भाव मात्र कमी होताना दिसत नाहीत. आजचा सोन्याचा भाव पाहिला तर तो वाढलेलाच दिसेल. खास अक्षय तृतीयाच्या निमित्ताने पाहुयात लॉकडाऊन, अक्षय तृतीया आणि मुंबईतील सोन्याचा दर ह्यावरचा वंटास टीमचा खास रिपोर्ट…

 

आज बाजारातले सोन्याचे दर

 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार सोन्याच्या भावात नेहमीच चढ उतार होत असतात. कोरोनाचा फटका अनेक बाजारपेठांना बसला आहे, तसाच तो सोन्याच्या बाजारावरही बसलाय. आज मुंबईत 22 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर हा 4 हजार 462 एवढा आहे, तर 24 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर 4 हजार 562 इतका आहे.
कालचा सोन्याचा भाव पाहिला तर तो 22 कॅरेट 1 ग्रामसाठी 4 हजार 561 होता आणि 24 कॅरेट 1 ग्रामसाठी 4 हजार 561 इतका होता. जर फक्त कालच्या सोन्याच्या दराची तुलना केली, तर आज त्यात 1 रुपयांनी वाढ झाली आहे.
आज 100 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 4 लाख 46 हजार 200 आहे, तर 24 कॅरेट 100 ग्राम सोन्याचा भाव 4 लाख 56 हजार 200 रुपये इतका आहे.
आपण 22 एप्रिलरोजी सोन्याचा भाव पाहिला तर तो 43 हजार इतका होता आणि दिवसेंदिवस तो आकडा वाढत चालला आहे. मुंबईतील सोन्याच्या दरांवर आज अनेक घटकांचा प्रभाव आहे. खरं तर, सर्वात मोठा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय घटक. मुंबईतील सोन्याचे दर हर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनद्वारे तसेच शहरातील काही बड्या विक्रेत्यांच्या मतानुसार ठरविले जातात.

 

जेवढा वाढता दर तेवढी कमी विक्री

 

अक्षय तृतीयामध्ये सोन्याला मागणी असल्यामुळे एका दिवसात छोट-मोठ्या सोनार दुकानांचा व्यवसाय हा लाखोंच्या घरात होतो; पण आज लॉकडाऊनमुळे सोने खरेदी व्यवसाय हा 10 ते 20 टक्क्यांवर आलाय, तेही ग्राहकांनी ऑनलाइन सोने खरेदीला पसंती दिली म्हणून. अनेक विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आल्यामुळे सोने खरेदी होणार नसल्याचे सोने व्यापारी सांगत आहेत. लॉकडाउनमुळे सराफ बाजाराचे एका दिवसाचे जवळपास २०० कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान होत असल्याचेही ते सांगतात. त्यामुळे आज अक्षय तृतीया जरी असली तरी तुम्ही घरी राहा सुरक्षित राहा, कारण आपल्या शरीराला जपण्याची आज नितांत गरज आहे.
हेही वाचाच…
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments