आपलं शहर

CoronaEffect हिंदमाता ब्रिज म्हणजे केईएम, टाटा, जेजे येथील रुग्णांचं माहेर घर

गेले काही दिवस मुंबईमध्ये भितीचं वातारवरण आहे. कोरोनामुळे मुंबईतील सगळी हॉस्पिटलं तुडूंब भरलेत. काही ठिकाणी अनेकांना क्वारंटाईन करून ठेवलय तर काहींवर उपचार सुरू आहे. अशा परिस्थिती तिथे आधीपासून इतर आजारावर उपचार घेणाऱ्या पेशंटचे हाल होत आहेत. हॉस्पिटलमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण येत असल्याने त्याची लागण इतर पेशंटला होऊ नये म्हणून त्यांना थेट आहे त्या परिस्थितीत डिस्चार्ज देऊन टाकण्याच कामदेखील सुरू आहे.
आता या पेशंटनी करायचं काय?
हॉस्पिटलमधून अचानक मिळाले डिस्चार्ज, पेशंटची होत असलेली घालमेल आणि त्यात मुंबईतल्या गाड्याबंद अशी आजूबाजूची परिस्थिती असताना पेशंटला घेऊन हॉस्पिटलच्या समोर असलेल्या फूटपाथवर राहाण्याची आणि मिळेल ते खाण्याची वेळ अनेक जणांवर आली. आता खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला तरी संटास-बाथरूमचं काय?
अशेच प्रश्न समोर असताना मुंबईच्या महानगरपालिकेने अशा लोकांना त्या फूटपाथवरून हटवायचं ठरवलं. आता हा निर्यण जरी घेतला तरी मग त्यांनी जायाचं कुठं? मग बीएमसीनेच त्यांची हिंदमाता येथील ब्रिजखाली राहाण्याची व्यवस्था केली. या ब्रिजखाली हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या वार्डमध्ये वेगवेगळ्या आजारावर उपचार घेणारे सगळेच पेशंट एकत्र येऊन राहू लागले.
कोणाला टीबीचा आजार आहे, कोणाला कॅन्सर झालाय, कोणाला पोटाचे आजार आहेत, कोणाची डिलेव्हरी झालेय, तर कोणाची काही दिवसातच डिलेव्हरी होईल. अशे सगळे पेशंट आज तिथे गुण्यागोविंदाने कोणतीही तक्रार न करता राहात आहेत. कारण त्यांनाही लॉकडाऊनबद्दल चांगलीच माहिती आहे.
या ठिकाणी रोज जेवन वाटप करणारे येतात आणि त्यांची दोनवेळेच्या खाण्याची सोय होते. त्यामुळे फुटपाथवर त्यांची रोजची सोय होत असे, तशीच सोय इथेही होऊ लागली, कदाचित त्याहून अधीक चांगली. मात्र इथेही तोच संडास-बाथरुमचा प्रश्न समोर आहेच. शेजारीच एक शौचालय आहे, पण तिथल्या महाशयांचं म्हणणं असं आहे की आम्ही पाणी विकत घेतो, त्यामुळे तुम्हालाही शौचालयाचा वापर करताना पैसे मोजावे लागतील.
संसाराला कडकी लागलेले लोक पैसे नसल्याने जिथे मिळेल तिथे राहाण्यासाठी आणि मिळेल ते खाण्यासाठी तयार होतात, त्यातच अशा गोष्टींना पैशे खर्च करणे म्हणजे त्यांच्यासाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल, त्यामुळे तिथे राहाणाऱ्यांचं एकच म्हणनं आहे की आम्हाला संडास-बाथरूम सोडलं की आता कोणताच त्रास नाही. त्यामुळे माहेरात एक स्त्री जशी सगळ्या गोष्टी समजून घेते, तसच हिंदमाता ब्रिज म्हणजे केईएम, टाटा, जेजे येथील रुग्णांचं माहेर घर झालय.

 

मुंबई अनेकांना कमी पैशात कसं राहायचं शिकवते. मुंबई कोणावरही कितीही वाईट प्रसंग आला, तरी त्याला उपाशी ठेवत नाही. मुंबईने अनेकांना जगवलय आणि ती जगवत राहीलच. मग भलेही कोरोना येऊ दे किंवा कोरोनाचा बाप येऊ दे, अशे शब्द तिथे राहात असलेल्या एका आज्जीबाईने वंटास टीमसोबत बोलताना उद्गारले होते आणि ते खरंही आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments