फेमस

Proud be Indian कोरोनाच्या महामारीत भारताने 13 देशांना जगवलं; बलाढ्य अमेरिकेलाही झुकवलं…

कोरोनाच्या महामारीने अख्या विश्वाला गुंडाळले आहे. त्यात अमेरिकेसारखा बलाढ्य देश असो, इराण, इटली वा भरगच्च लोकसंख्येने भरलेला चीन असो साऱ्या देशांच्या सुविधा कमी पडू लागल्या आहेत. तूर्तास तरी कोरोनावर ठोस औषध मिळाले नसल्याने सर्व देश घाबरून आहेत. पण ह्यात एक नाव सध्यातरी उंचावले जात आहे आणि सगळीकडे वायरल होत आहे; ते म्हणजे भारताने अमेरिकेसोबत इतर तेरा देशांना केलेली औषधपूर्तीची मदत.

आता तुम्ही म्हणाल, आर्थिकदृष्टया अमेरिकेपेक्षा दुर्बल असूनदेखील अमेरिकासारख्या देशाला भारताकडे मदत मागायची वेळ का आली आणि खरंच आपल्या भारताकडे अस काय आहे का, की अमेरिकासारखा देश आपल्यासमोर झुकला? पाहुयात नक्की काय आहे हे गॅटमॅट…
अमेरिका कश्यासाठी हात पसरवत आहे?
आपण रोज पाहात आहोत, चीनपासून अमेरिकेपर्यंत मृत्यूंची संख्या चढत्या आलेखाप्रमाणे वाढत चालली आहे. आता सध्याचा तात्पुरता कोरोनावर इलाज करायचं म्हटलं तर त्याच्या लक्षणांवर केला जातोय. त्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन नावाच्या औषधाने चांगलाच फरक पडतो आहे. तर मग ह्याच औषधाची मागणी अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प; जे मध्यंतरीच भारताला भेट देऊन मैत्री करून गेले होते, ते धमकीच्या स्वरूपात का होईना करत आहेत. आता त्यांनी मित्रराष्ट्र म्हणून औषधाची मागणी केली आणि आपण ती त्यांना पुरविली देखील. त्यावर ते आपले आभारी असल्याचं देखील माध्यमांद्वारे कळवत आहेत.
भारतात औषधाची खाण आली कशी ?
आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत  हे औषध उपलब्ध नाही; पण भारतात उपलब्ध आहे, हे कसं काय? तर चला मग मेन मुद्दाकडे वळूया…

‘भारतात औषधांची खाण आणि औषधांचे गॉड फादर म्हणजे ख्वाजा अब्दुल हमीद म्हणजेच के. ए. हमीद‘. 

वडिलांच्या इच्छेनुसार ह्यांना बॅरिस्टर बनवायचे होते; पण ह्यांना रसायनशास्त्रात रस होता. ही गाथा सुरू झाली 1924 पासून, त्यावेळी जर्मनी केमिकल इंडस्ट्रीमध्ये सर्वात आघाडीवर होती. रसायनशास्त्रातील जगभरातील सर्वोत्तम शिक्षण, संशोधन तिथे चालत होते. के. ए. हमीद यांनी बर्लिनच्या हंबोल्ट विद्यापीठात प्रवेश मिळवला. फार्मासिटीकलमध्ये त्यांनी उच्च पदवी मिळवली आणि भारतात येऊन काम करू लागले.

आता तुम्ही म्हणाल, वंटास मुंबईशी याचा काय धागा?
तर आपण गर्वाने सांगू शकतो की भारतात आल्यावर सर्वात प्रथम त्यांनी आपल्या पत्नीसोबत १९३५ साली औषधांची कंपनी सुरू केली ती मुंबईमध्ये. केमिकल, इंडस्ट्रीयल, फार्मासिटीकल लॅबोरेटरी उर्फ सिप्ला असे या कंपनीचे नाव होते. नफ्यापेक्षा आपली औषधे अगदी गरीबातील गरीब व्यक्तीला वाजवी दरात कशी मिळतील याची काळजी हमीद घ्यायचे. त्यांच्या या कामगिरीमुळे आपला भारतच नव्हे तर जगभरात त्यांना औषध शास्त्राचे गॉड फादर मानले जायचे. अनेक विद्यापीठे त्यांना गेस्ट लेक्चरर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत. थोर विचारांचे असल्यामुळे, त्याकाळी भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांनी जवळून अनुभवला. शांततेच्या मार्गावर चालणाऱ्या महान व्यक्ती महात्मा गांधीजींना ते गुरू मानायचे.
भारत मेडिसिन रित्या स्ट्रॉंग कसा आहे?
ख्वाजा अब्दुल हमीद यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवला त्यांच्या मुलाने म्हणजेच युसुफ हमीद यांनी. “आपल्या औषधांचा वापर गोरगरिब जनतेला लुटण्यासाठी नाही तर त्यांना बरं करण्यासाठी करायचा आहे” हे वडिलांचे वाक्य नेहमी लक्षात ठेवत कमी वयातच त्यांनी सिप्ला कंपनीची जबाबदारी सांभाळली. अनेक मोठ्या संकटांचा सामना करत आज भारतात नव्हे तर संपूर्ण देशात त्यांनी एक ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मेहनातीमुळे भारतात मेडिसिन इंडस्ट्री दमदारपणे उभी राहिली आहे आणि म्हणूनच आजही आपल्याला कधी औषधांसाठी इतर देशावर अवलंबून राहावे लागत नाही.

एक गर्वाने सांगायची गोष्ट म्हणजे मेडिसिनरित्या स्ट्रॉंग असणारी सिप्ला कंपनी आजही जगभरातील गरीब देशामध्ये एड्ससारख्या दुर्धर रोगावर अत्यंत स्वस्त दरात औषधे पुरवते.

भारताने कोणाला काय दिलं?
कोरोनासारख्या भयानक आजारावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा फरक पडत असून ते सिप्ला कंपनीचे प्रोडक्ट आहे. भारत हा हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ची सर्वाधिक निर्मिती करणारा देश आहे, त्यामुळे तब्बल युनायटेड स्टेटे ऑफ अमेरिका, स्पेन, जर्मनी, भुतान, अफगानिस्थान, ब्राझिल, नेपाल, बहरिन, मालदिव, बांगलादेश, सियाचिन, मायरुतियस आणि डोमिनिकन रिपब्लिक अशा 13 देशांना 14 मिलियन हायड्रोक्सीक्लोरोक्वीन टॅब्लेट्स आणि 13.5 MT टन API कीट्स देण्याचं आव्हान भारताने दिले आहे. त्यातील एकट्या अमेरिकेला भारताकडून 35.85 लाख टॅब्लेट्सचा आणि 9 MT API चा पुरवठा करण्यात आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments