आपलं शहर

कोरोनाच्या तोंडावर मुंबईवर 2 हॉस्पिटल सील करण्याची वेळ का आली?

गेले काही दिवस मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे त्यावर उपाय म्हणून मुंबई प्रशासनाने होईल तितक्या हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार केले जातील, असे घोषित केले. मात्र असं करत असताना एक समस्या समोर येऊ लागली, ती म्हणजे इथल्या हॉस्पिटलची तयारी. कोरोनावर उपचार करण्यासाठी जी खबरदारी, तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाय योजणांची पुर्तता गरजेची आहे, तितका पुरवठा इथल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये केला जात नाहीये, परिणामी ही हॉस्पिटले सील करण्याची वेळ आली.
कोणती हॉस्पिटले सील करण्यात आली?
सध्या मुंबईमध्ये प्रामुख्याने दोन खाजगी हॉस्पिटले बंद करण्यात आली आहेत. त्यातील एक म्हणजे मुंबई सेंट्रल येथे असलेले वोकहार्ट हॉस्पिटल, जिथे काही दिवसांपुर्वीच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात केली होती. या सोबतच मुंबईतील बड्या वस्तीतील हॉस्पिटल म्हणून ओळखीस असलेल्या जसलोक हॉस्पिटललादेखील सील करण्यात आलं आहे.
हॉस्पिटल्स का सील केली?
गेल्या काही दिवसांपासून यो दोन्ही हॉस्पिटलमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना त्याची लागण होऊ नये म्हणून तशांना इथे एंट्री नाकारली होती. हे सगळं ठिक असलं तरी कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करता करता संरक्षणाच्या दृष्टीने खबरदारी न घेतल्याने इथल्या दोन्ही हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन वोकहार्ट हॉस्पिटलमधल्या तब्बल 26 नर्स आणि 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीये, तर त्याच रितीने जसलोकमधल्या 10 नर्स आणि एका वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
आता काय आहे तिथली परिस्थिती?
हॉस्पिटल सील केल्यामुळे आता त्या हॉस्पिटलमध्ये ना बाहेरचे कोणी आत जाऊ शकते, ना आतले कोणी बाहेर जाऊ शकते. त्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये असलेल्या सगळ्या डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, वार्डबॉय, परिचारिका आणि इतर स्टाफला क्वारंटाईन करून ठेवलय. तिथे क्वारंटाईन करून ठेवलेल्या या सगळ्या मंडळींना तिथल्याच कँटीनमधून जेवन, नाष्टा आणि इतर खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जातो. तर हॉस्पिटल बाह्य पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांवर आता बंदी घालण्यात आली आहे.
कधीपर्यंत ही हॉस्पिटल्स सील असतील?
मुंबईत सध्या 226 परिसर सील करण्यात आले आहेत. तिथे जोपर्यंत शेवटचा रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत तीथली बंदी न उठवण्याचा निर्यण प्रशासनाने घेतला आहे, त्याचप्रकारे या रुग्नालयांमध्ये शेवटचा रुग्ण बरा होत नाही आणि या व्हायरसचे सक्रमण जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत हे दोन्ही हॉस्पिटल बंद राहातील, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हेही वाचा…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Unknown

So said