भुक्कड

लॉकडाऊनमध्ये काय आहे डबेवाल्यांची स्थिती; कसं केलय जगण्याचं मॅनेजमेंट?

मुंबईत राहाणारी 5 हजार वारकरी मंडळी त्याच मुंबईत राहाणाऱ्या 2 लाखांहून अधीक लोकांसाठी काम करतात. ना कोणती समस्या, ना पगारवाढ आणि इतर मागणीसाठी संप, ना कोणती एकमेकांविषयी तक्रार; एकजुटीने मिळून अचूक वेळेत काम करणे, हे एकच ध्येय समोर. यांच्या कामाची ख्याती तर विदेशपार आहे. चक्क लंडनचा राजा प्रिन्स चार्ल्स या वंटास मुंबईकरांना भेटण्यासाठी मुंबईत आला. आता या सगळ्यावरून प्रश्न पडलाच असावा की आम्ही कुणाबाबद्दल बोलत आहोत? तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे “मुंबईचा डबेवाला”!

कोरोना विषाणूने सर्व कामकाजावर मोठे संकट उभे केले आहे. अनेक छोट्या मोठया उद्योगांना तर टाळे लागेल. अनेकांची उपासमारीची वेळ आलीय. हातावर पोट असणाऱ्यांचा तर कोरोनाने तोंडासमोरचा घास हिरावून घेतलाय. आतापर्यंत वंटास मुंबईनेही असे अनेकांचे प्रश्न वाचकांसमोर मांडलेत आणि मांडत राहिल. मग वंटास मुंबई आपल्या मॅनेजमेंट आणि कामासाठी प्रसिद्ध असनाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना कशी विसरेल? मुंबईत नाही तर सातासमुद्रापार ह्यांच्या कामाचा गजर वाजतो. अनेक मोठे जगजेत्ते ज्यांना भेटण्यासाठी आतुर असतात, ते आपले मुंबईचे डबेवाले. हे डबेवाले अतिशय कमी खर्चात जेवणाचे डबे मुंबकरांपर्यंत एकही चूक न करता वेळेत पोहचवतात. पण या हातावर पोट असणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची कोरोनाच्या ताळेबंदीमध्ये काय परिस्थिती आहे? हे वंटास मुंबईने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
कोरोना महामारीने मुंबईकरांसमोर अनेक संकटे उभे केलीत. जीवितहानीसोबतच आर्थिक समस्या असल्याने लोकांचे खायचे हाल झालेत. तशाच अनेक समस्या मुंबईच्या डबेवाल्यांसमोर निर्माण झाल्यात. या सगळ्या संदर्भात आम्ही ज्यावेळी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्याशी बातचीत केली, त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डबेवाल्यांना मॅनेजमेंटचे गुरू का म्हणतात याची शहानिशा झाली. 22 तारखेला अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, मात्र कोरोनाचं भारतात पसरणारं सावट डबेवाल्यांनी त्याआधीच ओळखलं होतं. अनेक डबेवाले दिवसाला 2 लाखांहून अधीक लोकांच्या संपर्कात जात असतात, त्यामुळे या संसर्गाची शिकार डबेवाले होऊ नयेत, यासाठी डबेवाल्यांनी आपली सेवा 19 मार्च रोजीच बंद केली होती. हा बंद 19 मार्च ते 31 मार्च या दरम्यान होता, त्यामुळे अनेक लोक मुंबईत बसून काय करणार? या कारणाने आपल्या गावी परतले. यातले काही जण आपल्या मुलांच्या परिक्षा असल्याने आणि इतर महत्वाच्या कारणाने मुंबईतच राहिले आणि ते इथेच अडकून पडले.
डबेवाल्यांच्या पगाराची काय आहे अवस्था?
19 मार्च रोजी काम बंद झाल्याने आणि तिथुनपुढे संपुर्ण मुंबई बंद झाल्याने मार्च आणि तिथून पुढचा संपुर्ण पगार डबेवाल्यांचा अडकून पडला. अनेक ठिकाणांहून येणारा कामाचा मोबदला अचानक बंद झाला, त्यामुळे घरी गेलेल्या डबेवाल्यांच्या पोटाचा प्रश्न जरी नसला तरी मुंबईत असलेल्या अनेक डबेवाल्यांना पोटाचा प्रश्न सतावू लागता. त्यामुळे डबेवाला संघटनेने एक निर्णय घेतला. जितके डबेवाले आहेत, त्या सर्वांना एक ते दीड हजार रुपयांपर्यंतचे रेशन देऊ करण्यास सुरूवात केली. अनेक डबेवाल्यांना ते राहात असलेल्या जागीच रेशन खरेदी करण्यास सांगितले आणि थेट रेशन दुकानदाराच्या खात्यात ऑनलाईनरित्या पैशे पाठवले.
काय गरजेचं?
लंडनच्या राजाने मुंबईच्या डबेवाल्यांना त्यांच्या मुंबईतल्या सगळ्या व्यवहारामुळे मॅनेजमेंट गुरू अशी पदवी दिली आहे, अनेक शैक्षणिक संस्था याच डबेवाल्यांच्या मॅनेजमेंटवरती पीएचडी करत आहेत, त्यांचा अभ्यास करत आहेत. फक्त 5 हजार डबेवाले मुंबईतल्या 2 लाखांहून अधीक चाकरमान्यांना डबे पुरवतात, त्यामुळे त्यांच्या मॅनेटमेंटला वंटास टीमकडून सलाम. मात्र आज आलेल्या संकटाच्या काळात काम बंद असल्याने राज्य शासन किंवा केंद्राकडून कधी मदत येईल, याच प्रतिक्षेत हे सगळे डबेवाले बसले आहेत, कारण केंद्र किंवा राज्यशासनाकडून काही मदत आली, तरच अनेक डबेवाल्यांना संसार सावरायला मदत होणार आहे, नाहीतर संपुर्ण मुंबईकरांना वेळेत जेवू घालणारा डबेवालाच एकदिवस उपाशी राहिलं, इतकच!
हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments