कारण

वंटास सर्व्हे ! लॉकडाऊनमध्ये मुंबईचे लोक किती वेळ झोपतात?

झोप म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे पुणेकर, तरी आम्ही चक्क मुंबईकरांच्या झोपेचा सर्व्हे करण्याच ठरवलं आणि काही वेगळीच माहिती आमच्या हाती लागली.

“खाली दिमाग शैतान का घर आणि मोकळे मुंबईकर झोपेची भर.” माणसाला पुरेसा आहार तितकीच पुरेसी झोप मिळाली की फ्रेश आणि ठणठणीत राहातो. दोघांचं बॅलन्स हे संतुलित असावं, नाहीतर विपरीत परिणाम हे लगेच दिसून येतात. मुंबईत कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि ‘हम नही रुकने वालोंमेसे’ असे म्हणणारे मुंबईकर लॉकडाऊनमुळे घरी बसले.
आज सोशल मीडियावरती आपण पाहात असाल, सिनेतारका असो वा आपले राजकारणी मंडळी, प्रत्येकजण मिळालेल्या वेळेत अनेक अवतार दाखवत आहेत, जे आपण याआधी पाहिले नसावे. या सगळ्यात आपले मुंबईकर काय करतात? हेही जाणून घेणं तस गरजेचं आहेच.
वंटास टीम आज तुमच्यासाठी एक मजेशीर खबर घेऊन आली आहे. अनेक दिवसाच्या सर्वेवरून आज आम्ही वाचकांना आपले मुंबईकर लॉकडाऊनमध्ये काय करतात, हे नाही तर मुंबईकर किती वेळ झोपतात चक्क हे सांगणार आहोत. आम्ही केलेल्या सर्वेनुसार मुंबईकरांची वयोगटानुसार विभागणी करून झोपण्याच्या वेळेचा आराखडा तयार केलाय. पाहुयात हा मजेशीर रिपोर्ट
वयोगट 1 ते 5 मधील लहान मुले
तसं पाहायला गेलं तर या वयोगटातील लहान मुले, जास्त झोपतात. 24 तासांपैकी 14 तास तर ते असेही झोपेतच असतात. कोरोनाचा लॉकडाऊन ही त्यांच्यासाठी विशेष गोष्ट नाही. त्यांचे आपले रोजचे रुटीन तेच असते; पण एक मात्र बदल या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या आयुष्यात झाला, तो म्हणजे त्यांची फॅमिली त्यांना जास्त वेळ देऊ लागली. इतर दिवस-दिवसभर कामावर असणारी मंडळी आता घरी असल्यामुळे या छोट्यांना जरा घरच्यांचा जास्तच सहवास मिळू लागला.
वयोगट 6 ते 15 मधील मुल 
या वयोगटातील मुले थोडीशी खट्याळ असतात. सुट्टी मिळाल्यामुळे उडया मारणे, मस्ती करणे, टीव्ही पाहाणे आणि झोपणे. सकाळी 11 वाजेपर्यंत उशीरा झोपणे, दुपारी जबरदस्त 3 तास झोप काढणे असे त्यांचे रोजचे वेळापत्रक.
आता हे वेळापत्रक सगळ्यांसाठीच लागू नाही होत, काही अशीदेखील उदाहरणं आम्ही पाहिली जे दिवसा झोपतच नाहीत आणि आपल्या परिवारातील इतरांना झोपुदेखील देत नाहीत. मग त्यात मोबाईल गेमचा जास्त प्रमानात वापर होताना दिसतो. खाली खेळायला जाणे हे पूर्णतः बंद असल्यामुळे त्यांना घरात कोंडल्यासारखे होते.
वयोगट 16 ते 23 मधील तरणीबांड
लॉकडाऊनच्या काळात आपली युवापिढी जास्त आळशी पहायला मिळाली. माणसाला 6 तास पुरेशी झोप लागते. या दिवसात युवापिढीचा दिवस दुपारी 2 ते 3 नंतरच चालू होतो आणि मध्यरात्री 4 वाजता संपतो. यामध्येही उठल्याबरोबर जेवून ते झोपतात. म्हणजे जवळपास 12 ते 13 तास ते झोपण्यासाठी देतात. नेटफ्लिक्स, ऍमेझॉन यांसारखे ऍप्स आजकाल युवापिढी जास्त वापरते. वेब सिरिस हे लॉकडाऊन मधील सगळ्यात जास्त डिमांड असलेले मनोरंजनाच साधन बनलय.

 

वयोगट 24 ते 35 मधील माणसे

 

घरातील कर्ताधरता म्हणून या वयोगटाकडे पाहिलं जातं. सरकारने शक्य असेल त्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगतले. तर ही मंडळी घरातून काम करतात. पण 8 तासांच्या कामानंतर हे मात्र झोपेला जास्त प्राधान्य देतात. ही मंडळी जास्तीत जास्त 10 ते 11 तास झोपतात. ज्यांना वर्क फ्रॉम होम नाहीये, ती मंडळी तर दिवसभर लोळत असतात. ना बाहेर जाऊ शकतात; ना कुठे फिरू शकतात. रोजच्या जीवनाला कंटाळलेला मुंबईकर या दिवसात एवढा झोपला की कुंभकर्णाला टक्कर देईल.
मात्र ज्यांच्या हाताला काम नाही त्या मंडळींची झोप मात्र या कोरोना लॉकडाऊन पार उडवून दिली आहे. आपले घर कसे चालेल, आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल अशा विचाराने काहींची झोप उडालेली पहायला मिळाली.

 

वयोगट 36 ते पुढील मंडळी

 

आपले मुंबईकर कोणत्याही गोष्टीत तगडी टक्कर देऊ शकतात. लॉकडाऊनमध्ये जर झोपेची स्पर्धा चालू असती, तर मुंबईकर पुणेकरांवर भारी पडले असते. या वयोगटात दोन प्रकरची माणसे पाहायला मिळाली. एक म्हणजे अनेकांनी झोपेला आपला शत्रू बनवून आपल्या कलागुणांना वाव देण्यात जास्त रस दाखवला. काहींना लॉकडाऊनमध्ये आलेल्या समस्यांमुळे दिवसरात्र काय होईल, या विचाराने झोप उडालेला गट. तर दुसरी म्हणजे कुंभकर्णाचे रेलटिव्ह बनले आणि दिवसरात्र झोप झोप आणि झोप. या मंडळींनी लॉकडाऊन मधील 80% वेळ हा झोपण्यात घालवला.
तसं वंटास मुंबईचा हा मजेशीर रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला? हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी बनवला आहे. आपल्यासारखी अनेक लोकं आहेत, जे एवढा वेळ झोपतात; हे बघून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. तुम्ही कोणत्या वयोगटातील आहात आणि तुम्ही किती वेळ झोपता, हे नक्कीच आम्हाला कळवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Unknown

9 hrs

Unknown

५-६ तास

Unknown

10 तास

Unknown

7 तास

Unknown

मे तो भाई ८‌ घंटे सोता ????

Unknown

10 तास