आपलं शहर

CoronaEffect : फक्त लक्षणं असणाऱ्यांच्याच चाचण्या होणार; बीएमसी चुक करतेय का?

मार्च आणि एप्रिलच्या बर्‍याच दिवसांमध्ये आक्रमकपणे रुग्णांची आकडेवारी वाढत गेली. अनेकजण अनेकांच्या संपर्कात आल्याने ही आकडेवारी वाढली. त्यामुळे संपुर्ण मुंबई सील केली, हॉटस्पॉट घोषित केले, कंटेंनमेंट झोन तयार केले आणि बरच काही केलं, पण तरीही सगळं मुसळ केरात असल्यासारखं संख्या वाढत चालली आहे, एवढच काय तर लॉकडाऊनमुळे ही वाढणारी संख्या एकदम मर्यादित वाढू लागली. आता हे सगळं सुरू असताना दुष्काळात तेरावा महिना म्हणून मुंबई महानगरपालिकेने एक अजब निर्यण घेतलाय.

काय आहे वेगळा निर्णय?
मुंबईमध्ये दोन प्रकारचे रुग्ण समोर येत आहेत, एक म्हणजे सिम्प्टोमॅटिक (symptomatic) आणि दुसरं म्हणजे नॉनसिम्प्टोमॅटिक (nonsymptomatic). सामान्यरित्या सर्दी, खोकला, ताप, घशात दुखणे अशी लक्षणे असणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते, त्यांना सिम्प्टोमॅटिक रुग्ण म्हणतात. मात्र ज्यांच्यात कोरोनाचे कोणतेही गुनधर्म नाहीत, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशांना नॉनसिम्प्टोमॅटिक पेशंट म्हणतात.
ठाण्यातील एका पत्रकाराची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीएमसीने गेल्या आठवड्यात 167 पत्रकारांची चाचणी करण्याचे ठरवले. पत्रकार, व्हिडीओ-जर्नलिस्ट आणि कॅमेरामन अशांच्या चाचण्या केल्या. त्यापैकी 53 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉजिटिव्ह आले. आता हे ते पत्रकार होते, ज्यांच्यात कोरोनाला घेऊन कोणतेच गुणधर्म दिसत नव्हते. एकंदरितच मुंबईमध्ये अशा लोकांची संख्या वाढत आहे, ज्याच्यात कोणतेच गुणधर्म नाहीत, ते फक्त एक सायलंट कॅरिअर म्हणून काम करत होते, म्हणजेच कोरोनाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करत होते. त्यामुळे हे पत्रकार ज्यांच्यात प्रतिकाराक क्षमता कमी आहे, अशांना भेटले तर त्यांना कोरोनाची लागण नक्की होऊ शकते, तरीही बीएमसीने एक निर्णय घेतलाच.
आता या सगळ्यात बीएमसीने काय निर्णय घेतलाय?
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतेय, त्यामुळे साहाजिकच बीएमसीवरती त्याचा ताण पडतोय. रुग्णांची व्यवस्था करणे, त्यांना अनेक ठिकाणी दाखल करणे, त्यांच्यावर निगराणी ठेवणे असे अनेक मुद्दे आहेत, त्यामुळे बीएमसीने घोषित केले की आम्ही फक्त ज्यांना गरज आहे, म्हणजे जे सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत, त्यांच्याकडेच विशेष लक्ष देणार आणि इतर जे नॉनसिम्प्टोमॅटिक रुग्ण आहेत, त्यांना घरीच कॉरंटाईन केलं जाईल शासकिय विलगीकरण कक्षात ठेवलं जाईल. याच्यात अजून एक विशेष म्हणजे डोअर टू डोअर जाऊन आतापर्यंत अनेक तपासण्या केल्या गेल्यात, बीएमसीच्या मते त्या चाचण्या 20 ते 30 हजारांच्या संख्येत आहेत.
आता भानगड काय?
केरळसारखं मुंबईत जितके लोक आहेत, तितक्या सगळ्यांची चाचणी होणे गरजेची आहे. जेवढे लोक पॉजिटीव्ह येतील, त्या सगळ्यांना एकदम क्वारंटाईन करणे किंवा त्यांच्यावर उपचार करणे गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, सुरूवात आहे किंवा होण्याची शक्यता आहे असे सगळे निगरानीखाली येतील आणि कोरोनाची भिती कमी होईल, कदाचित यामुळे लॉकडाऊन आणि कोरोनामधून आपण सगळेच मोकळे होऊ शकतो, मात्र बीएमसी हे का करत नाही, हाच मोठा प्रश्न आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments