फेमस

लॉकडाऊनला संपुष्टात आणण्याचे प्लॅनिंग सुरू? कशी असेल सुरूवात?

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी मोदी सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते, जे आता येत्या ६ दिवसात संपेल.

लॉकडाऊनचा निर्णय घेणे हे सरकारसाठी जेवढे कठीण होते, तितकीच कठिण परिस्थिती सरकारसमोर उभी झाली आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहाता लॉकडाऊन नंतर काय आणि कशा उपाययोजना कराव्यात हा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित राहिला आहे.
पंतप्रधानांचे प्लॅनिंग स्ट्रक्चर काय आहे?
नुकत्याच झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदींनी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन संपल्यानंतर करता येणाऱ्या सगळ्या कामांची पडताळणी उरलेल्या दिवसात करण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व घरीच पेपरवर्क करत कामाचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे लोकांची एकदम होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेकजण एकच काम वेगवेगळ्या वेळेत कसे करू शकतात, याची यादी तयार करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. तसेच कामासाठी जास्तीत जास्त ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही मार्ग सूचवला आहे.
 
लॉकडाऊन मधुन बाहेर पडणे किती महत्त्वाचे?
लॉक डाऊनचा सर्वांत जास्त फटका पडला असेल तर तो अर्थव्यवस्थेला. रोजगरनिर्मितीचे साधन नसल्याने आज अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे परस्थिती पूर्वावत मार्गावर आणणे गरजेचे आहे. देशाची आर्थिक परिस्थिती मार्गावर आणण्यासाठी कामकाज सुरू करणे आवश्यक आहे. परंतु, कोरोना विषाणू आपला व्याप वाढवत असल्याची परस्थिती देशभरात निर्माण झाली आहे, त्यामुळे सरकार टप्प्या टप्प्याने परस्थितीचा आढावा घेत कामकाज सुरू करेल, अशी शक्यता दिसत आहे.
सरकार कसे आणेल संपुष्टात लॉकडाऊन?
सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेला सुरळीत सुरू करणं, हेच सध्या सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे संपूर्ण कोरोना रुग्णांची पडताळणी करून सरकार फैलाव नसलेल्या ठिकाणी कामकाज सुरू करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे गोर गरिबांच्या हाताला काम लागेल आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. तसेच, ज्या भागांत आदिवासी लोकसंख्या अधिक आहे, अशा भागांत आदिवासी मंत्रालयाकडून जिल्हा शाळा उभारण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली जाऊ शकते, मात्र ज्याप्रकारे टप्प्याने जसा महाराष्ट्र बंद घोषित केला, तसच सुरूवातीच्या वेळेस परिस्थिती असू शकते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments