फेमस

मुंबईच्या क्वारंटाईनमधून 6 इमारती झाल्या मोकळ्या…

गेले काही दिवस तुम्ही विशेषत: मुंबईचे लोक नुसता हा परिसर सिल केला, ही इमारत सिल केली, त्या परिसराला लॉकडाऊन म्हणून घोषित केलं, या परिसरामध्ये पेशंट आढळला, हे सगळंच गेल्या काही दिवसांपासून चालूच आहे, मात्र या सगळ्या अडगळीमध्ये दोन चांगल्या बातम्या आहेत, त्यातली एक म्हणजे दिवसेंदिवस अनेक रुग्ण बरे होत आहेत आणि दुसरी म्हणजे मुंबईतला असा एक परिसर जिथल्या अनेक इमारतींना सिल केलं होतं, त्या सगळ्यांना मोकळं केलं आहे.
मुंबईच्या मलबार हिलमधील काही इमारती गेल्या काही दिवसांपासून बंधिस्त होत्या. ना बाहेरच कोणी आत जाऊ शकत होतं, ना आतमधून बाहेर. सगळ्यात मोठा कंटेंनमेंट झोन म्हणून या परिसराला घोषित करण्यात आलं होतं. अजूनपर्यंत तब्बल इथल्या 41 इमारतींना सिल करण्यात आल आहे, त्यामुळे इथे प्रशासनाच्या नजरेतून किती मोठं भितीच वातावरण आहे, हे आपण समजू शकतो.
मलबार हिल हे ठिकाण मुंबईच्या D झोनमध्ये येते, इथल्या अनेक ठिकांणाना आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे 41 इमारतींना सिल करण्यात आलं होतं, हे सिल करण्याच प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं, त्यामुळे इथे पहिल्यापासूनच अनेक इमारतींना सिल करण्यात आलं आहे. मात्र इथल्या आधी सिल करण्यात आलेल्या मलबार हिल येथील हिल व्ह्यू या इमारतीमधल्या सापडलेल्या रुग्णाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यानंतर आणि तिथल्या इमारतीने आपला क्वारंटाईनचा कालावधी पुर्णकेल्यानंतर तिथे लावलेली पुर्ण बंदी हटवण्यात आली. या इमारतीसोबतच पेद्देर रोड, नेपिन सी रोड या परिसरातील इमारतींवर लागलेली बंदी हटवण्यात आली आहे.
इमारतींना सिल का केल होतं?
अनेक ठिकाणी कोरोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे ते रुग्ण ज्या इमारतीत आढळून येत आहेत, त्या इमारतीतील म्हणजेच संबंधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी दुसऱ्याच्या संपर्कात येऊ नये, म्हणून सगळ्यांना घरीच राहाण्याचा सल्ला दिला जातो. जे लोक पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात येतात, त्यांची प्रशासनाची खात्री होईपर्यंत तपासणी केली जाते, कोरोनासाठी लागू केलेल्या 14 दिवसांच्या कालावधीची वाट बघितली जाते, रुग्णाला सोडून इतर कोणाला जर कोरोनाची लक्षणे आढळून येत असतील तर त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करतात आणि 14 दिवसांमध्ये जर कोणीच तिथे कोरोना संक्रमित किंवा संशयित आढळलं नाही तर ती इमारत बंदीमुक्त केली जाते. हाच प्रकार जर कोणत्या झोपडपट्टी परिसरात घडला असेल तर तिथला आजूबाजूचा संपुर्ण परिसर सिल करण्याची वेळ प्रशासनावर येते.
बंदी हटवणे म्हणजे काय?
या इमारतींवरून बंदी हटवली म्हणजे इथल्या नागरिकांना आता मुक्त संचार करता येणार असं नाही. तर बंदीतून मुक्त करणे म्हणजे तिथल्या रहिवाशांना जे नियम लागू केलेले असतात, ते प्रशासनाकडून शिथिल केले जातात, तिथल्या नागरिकांना जिवनावश्यक गोष्टींसाठी इमारतीबाहेर जाण्याची परवाणगी दिली जाते, अत्यावश्यक सुविधांसाठी ते लोक घरातून बाहेर येऊ शकतात, मात्र लॉकडाऊनला घेऊन जे सामान्य नियम प्रशासनाकडून लावले आहेत, त्याचे पालन सगळ्यांनाच करणे गरजेचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments