कारण

काय आहे तबलिगी भानगड? कसा केला कोरोनाचा प्रसार? वाचा सविस्तर

देशभरात कोरोनाचे संकट डोक्यावर असतानादेखील हिंदू मुस्लिमांचा मुद्दा एका गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक लोकांकडून एका जमातीचा उल्लेख वारंवार केला जात आहे. त्यामुळे तबलिगी जमातीचे अनेक लोक आजकाल का चर्चेत येत आहेत, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. त्यामुळे हा मुद्दा व्यवस्थितीशीर समजून सांगणे आम्हाला गरजेचं वाटते. त्यामुळे बघूया नक्की काय आहे ही भानगड…

कोण आहेत तबलिगी?
मुस्लिम समाजातील एक जात म्हणजे सुन्नी इस्लामशी संबंध असलेला हा तबलिगी समाज. आता आपल्यासमोर तीन शब्द येतात; तबलिगी, जमात आणि मरकज. हे तिन्ही शब्द एकमेकांशी जोडलेले पण अर्थ वेगवेगळे असलेले आहेत. तबलिगी या शब्दाचा अर्थ होतो, आल्लाहच्या संदेशाचा प्रसार आणि प्रचार करणे. तर जमात म्हणजे लोंकाचा समूह आणि ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात, त्या जागेला मरकज असे म्हटले जाते. म्हणजेच अनेक नागरिक आपल्या इस्लामी धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी एकत्र जमत असतील, तर त्याला तबलिगी जमात मरकज म्हणतात.
कधी झाली या तबलिगी जमात आणि मरकजची सुरूवात?
तबलगी जमातची सुरुवात 1927 साली हरीयाणातील नूंह या गावात मुहम्मद इलियास अल-कांधवली यांनी केली. त्यामागचा मुख्य उद्देश इस्लामचा प्रचार करणे हा होता.  1941 मध्ये पहिल्या तबलीगी जमातसाठी 25 हजार लोक एकत्र आले, त्यानंतर पूर्ण जगभरात याचा प्रसार झाला. या तबलिगी जमातचे मुख्यालय हे दिल्लीत निजामुद्दीन येथे आहे, त्यांच्याकडून इस्लामच्या प्रसारासाठी काम केले जाते. विश्वातील 150 देशांमध्ये तबलिगी जमात सक्रिय आहे.
लॉकडाऊनच्या काळात ते कसे आले एकत्र?
कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका असल्यामुळे केंद्राने दिलेले आदेश धुडकावून दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात मरकज मस्जिदमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. खबर अशी आहे की फेब्रुवारीमध्ये तबलिगी जमातमुळे कोरोना विषाणू संपूर्ण मलेशियामध्ये पसरला होता. भारतात उपस्थित अनेक तब्लीगी जमातचे लोक मलेशियाहून परत आले आहेत, ज्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका वाढला आहे. जवळपास 1500 लोक एकत्र आले होते. त्यात 281 विदेशी नागरिक असून हे नागरिक 16  वेगवेगळ्या देशांमधून आल्याची माहिती आहे.
कोणत्या देशातून किती आले?
इंडोनेशिया – 7
अफगाणिस्तान – 1
श्रिलंका – 3
जिबूती – 1
म्यानमार – 33
सिंगापूर – 1
फ्रान्स – 1
कुवैत – 1
किर्गिस्तान – 28
थायलंड – 7
मलेशिया – 20 
बांग्लादेश – 9 
नेपाळ – 9 
फिजी – 4 
इंग्लंड – 3
अल्जेरिया – 1
 
भारतातील कोणत्या राज्यातून किती होते सहभागी?
तमीळनाडू – 501
उत्तर प्रदेशा – 156
महाराष्ट्र – 109
बिहार – 86
बंगाल – 73
तेलंगणा – 55
कर्नाटक – 45
अंदमान निकोबार – 21
त्यातल्या किती जणांना झाली कोरोनाची लागण?
कोरोनामुळे देशावर महासंकट आले असताना तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे  दुष्काळात तेरावा महिन्याल्याची वेळ आली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेला हा कार्यक्रम कोरोनाचा विषाणू फैलावण्याचा स्त्रोत बनला. महाराष्ट्रातील अनेक राज्यात पसरलेल्या या तबलिगी समाजातील जवळपास निम्म्याहून अधिक  लोकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात असणाऱ्या अनेक जणांना अलगिकरण क्षेत्रात ठेवण्यात आले आहे.
तबलिगी समाजामुळे दिल्लीतही मोठ्याप्रमाणात कोरोना व्हायरस पसरल्याचे मानलं जात आहे. मरकज मस्जिदमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तबलिगी जमातच्या निमित्ताने देश-विदेशातील नागरिकांनी वास्तव्य केले होते. त्यामुळे २ हजारच्या आसपास लोकांना तेथे क्वारंन्टाईन करण्यात आले आहे.
किती जणांचा झाला मृत्यू?
तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या इंडोनेशियातील ६ जणांचा हैदराबादमध्ये, १ मृत्यू जम्मू काश्मीरमध्ये झाला आहे, तर त्या समाजातील कोरोना संक्रमित आणि मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस समोर येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments