आपलं शहर

जाणून घ्या; फक्त मुंबईतच का वाढते कोरोना रुग्णांची संख्या, खास कारण

आता जशी शांत मुंबई आहे, तशी शांत मुंबई आपण उभ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. अनेक दंगली झाल्या, मारामाऱ्या झाल्या, बॉम्बस्फोट झाले, मात्र असं चित्र कधीच निर्माण झालं नव्हतं. मुंबईची ओळख हीच एक गर्दीच शहर म्हणून झाली आहे. त्यात इथल्या गच्च भरलेल्या लोकल गाड्या, हर तर्हेची माणसं, फुल्ल झालेले रस्ते, अनेक छोटेमोठे उद्योगधंदे, छोट्या छोट्या टपऱ्या, गाळे, धारावी सारख्या अनेक छोट्यामोठ्या झोपडपट्ट्या, अरुंद गल्ल्या आणि 24 तास गजबजलेली लोकल स्टेशन्स, असं बरच काही चित्र आपण काही दिवसांपुर्वी अनुभवलय आणि पाहिलयदेखील.
मात्र असं काहीच आता गेले काही दिवस तुम्हाला पाहायला मिळत नाहीये, याचं कारणही तुम्हाला माहित आहे की कोरोना पसरू नये म्हणुन प्रशासनाने लावलेला लॉकडाऊन. हा लॉकडाऊन खऱ्या अर्थाने सुरू झाला 22 मार्चला; मात्र संपणार कधी? या प्रश्नाचं उत्तर खुद्द लॉक डाऊन जाहीर करणाऱ्या प्रशासनालाच माहित नाही. बर असो, आता अजून एक मोठा प्रश्न, “मुंबईत तर सगळीकडे लॉकडाऊन आहे, मग तरीही दिवसेंदिवस इथल्या रुग्णांची संख्या वाढतेय कशी?”
जगात कोरोना रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या पार गेलाय, आपल्या देशाचा आकडा हळू हळू वाढतोय, त्यात महाराष्ट्र नंबर एकला आहे, तर मुंबईने देशातल्या शहरांमध्ये उच्चांकी गाठलीये. केंद्राने मुंबई शहराला कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट म्हणून घोषित केलंय. तरीही इथलं प्रशासन जितकं होईल तितकं सोशल डिस्टंसिंग ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही सरकारला अपयश येत आहे. दिवसेंदिवस शंभरच्या घरात आकडेवारी वाढत चालली आहे.
पहिल्या पॅसेजमध्ये जी माहिती दिलीये, मित्रांनो तेच मुंबईत कोरोना पसरण्याचं मुख्य कारण आहे. “इथली गर्दी”. मुंबईत मोठी दाटी-वाटीची ठिकाणं असल्याने सोशल डिस्टंसिंग ठेवण्यास खूप अवघड जात आहे. त्यातच भर म्हणजे मुंबईत काही दिवसांपुर्वी आलेले परदेशी पाहूणे. मुंबईतल्या पॉश एरियापासून झोपडपट्टीपर्यंत हा आजार फैलावला आहे. मुंबईच्या नकाशावर जिकडे पाहू तिकडे कोरोना पसरला आहे. सध्या 331 ठिकाणांना कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित केलय (या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे). यातील निम्म्याहून अधिक परिसरदेखील संपुर्ण दाटी-वाटीचे आहेत. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येऊन त्यांची साखळी तयार होते आणि कोरोनाला पसरण्यास मदत होते. मुंबईतलं कोरोना पसरण्याचं एकमेव कारण म्हणजे इथली गर्दी होय.
मुंबईकरांनी काय केलं पाहिजे?
मुंबईकरांनी एकच गोष्ट करावी, ती म्हणजे कोरोनाची लागण स्वत:ला होऊ नये म्हणून कोणाच्याही संपर्कात येऊ नये. बाकी मुंबईकरांचा स्वभाव आम्हाला चांगलाच माहित आहे, त्यामुळे इतकाच जिवाभावाचा सल्ला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
vantas team

हो लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे यासाठी

Unknown

सर्वात लोकसंख्या असलेल्या शहरात लॉक डाउन स्वतः हुन करून घेतलं पाहिजे