आपलं शहर

खुशखबर ! मुंबईतील ‘या’ प्रवाशांसाठी लवकरच सुरू होणार लोकल

अत्यावश्यक सेवा पुरवणारे अनेक महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी हे दुर्गम उपनगरामध्ये राहात आहेत आणि शहरात कामाला रुजू होण्यासाठी दररोज ये-जा करणे त्यांच्यासाठी अवघड होत आहे. प्रवासाच्या हेतूने आवश्यक कामगारांसाठी राज्य सरकारला रेल्वे सेवा पुन्हा सुरू करायची गरज वाटत आहे.

या वातावरणात रेल्वेसेवा चालू करणे आवश्यक आहे?
सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली होती. पण आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व कामगारांसमोर प्रवासाचा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर महापालिका रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मार्गावर आहे.
लोकल गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाला विनंती करण्यात आली आहे; जेणेकरून कर्मचारी, डॉक्टर, पॅरामेडिक्स, पोलीस, केमिस्ट शॉप कामगार, किराणा दुकानदार व अन्य आवश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते सहज प्रवास करू शकतील.
वंटास टीमने रेल्वे चालू करण्याबाबत काही अधिकाऱ्यांशी बातचीत केली, त्यावर त्यांनी मांडलेलं मत काय, ते जाणून घेऊ… 
काय म्हणतात महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी
“बरेच महानगरपालिका कर्मचारी मुंबई महानगर प्रदेशातील विस्तारित उपनगरामध्ये राहतात. काही प्रकरणांमध्ये, डॉक्टर, परिचारिका व इतर पॅरामेडिकल कर्मचारी प्रवासासाठी चार तास घालवत आहेत. त्यांना आपल्या कुटूंबाबद्दलही चिंता आहे. मी रेल्वे आणि मुख्य सचिवांना रेल्वेशी बोलण्याची विनंती केली आहे; जेणेकरून आपत्कालीन सेवांसाठी लोकल सेवा सुरू करता येतील. तेथे मर्यादित सेवा मिळू शकतात आणि स्थानकांवर फक्त ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाऊ शकतो. प्रवासाच्या दीर्घकाळ कामांखाली काम करणाऱ्या आमच्या कर्मचार्‍यांच्या दुर्दशाची मी कल्पना करू शकतो. ” असे मत मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मांडले.
सध्या हे कर्मचारी बेस्टच्या बसेसवर किंवा त्यांच्या स्वतःच्या वाहनांवर अवलंबून आहेत. अगदी बेस्ट चालकही संसर्ग होण्याच्या भीतीने हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांना फेरी लावण्यापासून सावध असतात. पनवेल, बदलापूर, कल्याण-डोंबिवली किंवा वसई-विरार यांसारख्या दुर्गम भागांमध्येही बेस्ट सेवा पुरविल्या जात नाहीत. बीएमसीमध्ये बहुतांश कर्मचारी मुंबईच्या उपनगरातील भागात राहतात.
वॉटर वर्क्स विभागात, शहराला पाणीपुरवठा करणारे झडप चालवणारे काही कर्मचारी उपनगर टाउनशिपमध्ये राहतात आणि दर तीन किंवा चार दिवसांतून एकदा घरी जातात. अग्निशमन दलाच्या बर्‍याच कर्मचार्‍यांची हीच पद्धत सुरुय.
मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी पी. रहांगडाले सांगतात
आवश्यक कामगारांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याच्या बाजूने माझे मत आहे. पुढे ते सांगतात “माझे काही लोक पालघर, बदलापूर, पनवेल आणि कर्जत येथून येत आहेत. ते बाईकवरून येतात किंवा कार पूलिंग करतात. आठ तासांच्या शिफ्टऐवजी त्यांनी २४ तासांच्या शिफ्टमध्ये काम केले तर त्यांना दोन दिवसांची सुट्टी मिळते, असे नियोजन केले आहे. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला अराम मिळेल आणि सोशल डिस्टनसिंग टिकून राहाण्यास मदत होते, त्याच्यातच लोकल सुरू झाली की या सगळ्या आपत्कालीन सेवांवर पडणारा ताण कमी होईल.
 
सह पोलीस आयुक्त नवल बजाज म्हणतात, 
पोलिसांच्या वाहतुकीसाठी त्यांच्याकडे प्रत्येक भागामध्ये पाच ते सहा व्हॅन आहेत, परंतु उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाल्यावर पोलिसांच्या हालचाली सुधारतील, असे त्यांना वाटते.
सध्याच्या लॉकडाऊन मध्ये रेल्वे सेवा चालू झाल्यास…
कोरोनाच्या पाश्वभूमीवर रेल्वे सेवा घातक ठरू नये म्हणून राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे संरक्षण दल, शासकीय रेल्वे पोलीस, होमगार्ड्स आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलातील जवानांकडून सर्व स्थानकांवर ओळखपत्रांची तपासणी केली जाईल.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या विशेष अधिकाऱ्यांनी देखील मध्य आणि पश्चिम मार्गांसाठी विचार करू, असे संकेत दिलेत.
 
ही वरील माहिती जरी पटण्यासारखी असली तरी, वंटास मुंबईच मत काही वेगळं आहे…

आज जरी लोकल सुरू झाली, तरी अनेक लोकांची गर्दी होण्यास सुरुवात होईल. अनेक लोक एकाच लोकल डब्यातून प्रवास करायला लागतील, कारण तस पाहिलं तर अनेकजण अत्यावश्यक सुविधांमध्ये काम करतात, ही सगळी गर्दी बेस्ट, बसेस, खाजगी वाहनांमुळे मर्यादित राहत आहे, मात्र लोकल सुरू झाल्या की ओळखपत्र तपासणी करण्याच्या जागेस गर्दी जमा होणार, प्रत्येक स्टेशनवर मोठा फौजफाटा तैनात करावा लागणार आणि मग सोशल डिस्टन्सिंगची ऐशी की तैशी होणार, त्यामुळे प्रशासनाने पुन्हा नक्की विचार करावा, कारण स्टे होम,स्टे वंटास...

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments