खूप काही

मी 24 तास काम करतो, तिथेच राहिन; पण मला ऑफीसला जाऊ द्या : मुंबईकर

लॉक डाऊन 3.0 सुरू झाल्यानंतर देशातल्या Mindmap Advance नावाच्या कंपनीने दिल्ली, मुंबई, बेंगलुरू अशा महत्वाच्या पाच शहरातील 560 छोट्या मोठ्या कंपनीतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सर्वे केला. हा सर्वे आरोग्य, पैसा, मानसिकता, भौगोलिक वातावरण आणि कार्यालयिन कामाला केंद्रबिंदु समजून करण्यात आला होता. या सर्वेमध्ये 85 टक्के पुरुष आणि 15 टक्के महिलांनी सहभाग दर्शवला होता.

17 तारखेला लॉकडाऊन संपणार का, संपला तरी नंतर ऑफिसला जाणे सुरक्षेचं असेल का, ऑफिस सानिटाईज केलेलं असेल का, काही दिवस आजच्या सारखच घरून काम केलं तर चालेल का, तिथेच राहायाची सोय होईल का, ऑफिसला नाही गेलं तर कामावरून काढून टाकतील का, घरचा खर्च कसा भागवायचा आणि अनेक प्रश्न या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना पडले होते, ज्यांची उत्तरे खुद्द त्या सर्वे करणाऱ्यांकडेदेखील नव्हती.
सर्वेमध्ये सहभागी झालेल्या 99 टक्के लोकांचं म्हणनं असं आहे की Corporate Health Responsibility (CHR) नावाचा एक कायदा समंत करावा, जेणेकरून आम्हाला त्या कायद्या अंतर्गत आरोग्यविमा लागू होईल आणि आम्ही बिनधास्तपणे  कामावर रुजू होऊ. या सोबतच कंपनी आरोग्याला घेऊन जे नियम व अटी लागू करेल, ते सगळे मान्य करून काम करण्याची तयारी या कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे.
संपुर्ण मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भावना ज्यावेळेस जाणुन घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. मुंबईतील अनेक कर्माचाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑफिसमध्ये राहाण्यास तयार आहोत, ऑफिस म्हणेल तितका वेळ काम करण्यासाठी तयार आहोत, मात्र आम्हाला कामाची गरज आहे, पगाराची गरज आहे. खूप दिवस झाले आम्ही घरी बसून आहोत, आमच्याकडे वर्क फ्रॉम होम करण्याची संधीदेखील नाही, त्यामुळे ऑफिस बंद होण्याची आणि काम जाण्याची भिती आहे. लॉकडाऊन किती दिवस वाढेल, हेदेखील सांगता येत नाही.
100 टक्क्यांपैकी 96 टक्के लोकांचं म्हणनं आहे की आताच्या परिस्थितीत ऑफिसमध्ये काम सुरू केल्यास अनेक अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत, 81 टक्के लोकांचं म्हणनं आहे की एक एक बॅचनुसार कामावर आम्हाला रुजू करून घ्यावं, त्याच्यात काहींचं म्हणनं आहे की आमची ऑफिसमध्येच राहायची सोय करावी, तर काही जण वर्क फ्रॉम होमलाच लाईक करत असल्याचं म्हणत आहेत.
सध्या जरी अनेकांच्या मनात ऑफिसला जाण्याची इच्छा होत असली तरी मात्र तशाप्रकारची कोणतीच परवणागी सरकारकडून दिलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही सध्यातरी घरीच राहा, जितकं जमेल तितकं वर्क फ्रॉम होम करा, ते जमत नसेल तर काही ऑनलाईन व्यवसाय करण्याची संधी मिळते का बघा आणि त्या माध्यातून काही आर्थिक उत्पन्नाचा पर्याय सुरू करता येतो का, यावर विचार करा.

 

हा लेख कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणच्या विषय़ाची माहिती हवी, असल्यास आमच्या वंटास मुंबईला नक्की भेट द्या.

हेही वाचाच…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments