आपलं शहर

LivePoint CM Uddhav Thackeray : हे संकट पावसाळ्यापूर्वीच संपवायच आहे

Uddhav Thackeray 2

आजपासून लॉकडाऊन 4.0 ची सुरूवात होत आहे, त्याच प्रार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुकलाईव्ह येऊन अधिकृत घोषणा केली. यात महाराष्ट्रातील नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती आणि कोरोनाची परिस्थिती यावर भाष्य केलं, आपण त्यांच्या या भाषणातले काही महत्वाचे मुद्दे पाहाणार आहोत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या लाईव्हमधील काही मुद्दे…
 • महाविकास आघाडीचे विशेष आभार, की त्यांनी राजकीयदृष्ट्या मला मदत केली, आता आपल्याला कोरोनाशी लढा देण्यासं सोप्प होईल
 • लॉकडाऊन 4.0 मध्ये काही नियमांना शिथिल करू, पण रेड झोनमध्ये शिथिलता येणार नाहीच
 • लॉकडाऊन असला तरी नव्या उद्योगाचं धोरण आखणार
 • आतापर्यंत राज्यातल्या 50 हजार बंद असलेल्या उद्योगांना सुरू करण्याची परवणागी दिली
 • साधारणत: 5 लाख लोक कामासाठी सज्ज झाले आहे, ते कामाला येत आहेत
 • मुंबई, पुणे असा पट्टा किंवा मालेगाव, औरंगाबाद अशा शहरात उद्योग सुरू करण्यास वेळ लागेल
 • आपल्या सरकारला सहा महिने होत आहेत, नव्या सरकारच्या नव्या संकल्पना आहेत, त्या सगळ्या संकल्पना आंमलात आणणारच
 • महाराष्ट्रात 40 हजार एक्कर जमीन ही नव्या उद्योगांसाठी राखुन ठेवत आहोत
 • नव्या उद्योगांचं राज्यात स्वागत किंवा आपल्या राज्यातल्या नव्या उद्योजकांचं स्वागत
 • भाडेतत्वावर जमिनी देऊ, पण उद्योग सुरू करू
 • प्रदुषण करणार नसाल तर तुमचं महाराष्ट्रत स्वागत आहे
 • जिथे कमी असेल तिथे तुम्ही पुढे आहे, अनेक संधी आहेत, त्या दवडू नका
 • राज्यात कामगारांची उणीव आहे, त्यामुळे जिथे ग्रीन झोन आहे, तिथे महाराष्ट्रातल्या तरुणांनी बाहेर पडलं पाहिले
 • ज्या गोष्टी सुरू करणार आहोत, त्याची पुर्वकल्पना जनतेला देऊच
 • अनेक गोष्टी अशाप्रकारे सुरू करू, जेणेकरून त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही
 • काहींना कोरोनाचा प्रादुर्भाव झालाय; पण त्यांना माहितीही नाही, त्यामुळे तुम्ही आहे त्या ठिकाणी राहा, घाई करू नका
 • आजपर्यंत तुम्ही जे सहकार्य केले, ते यापुढेही कराल, अशी आशा बाळगतो
 • काही जिल्हे आहेत, ते ग्रीन म्हणूनच ठेवावे लागतील
 • आपले अनेक परदेशातील, पर राज्यातील लोक आपल्याकडे येत आहेत
 • अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल प्रश्न आहेत, त्याबद्दल काय खबरदारी घेता येईल यावर विचार सुरू आहे
 • जी शिस्त आतापर्यंत पाळली, त्यापेक्षा अजून कडक शिस्त पाळण गरजेची आहे
 • शक्यता म्हणून येणारे आकडे हे थरकाप उडवणारे, पण ती वेळ मी येऊ देणार नाही
 • रेड झोनला लवकरात लवकर ग्रीन झोन करायचं आहे
 • पूर्वी मुंबई/भारत बंद करत होतोच, पण या परिस्थितीत मुंबई/भारत बंद करून कोणालाच परवडणार नाही
 • उद्योग धंदे उघडले आणि साथ पसरली तर काहीजण जीवानिशी जातील आणि अघोषित लॉकडाऊन लागेल
 • मुंबईत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोक आपले आहेत
 • आतापर्यंत काही नाही, तिथे कोरोना पसरत आहे
 • कुठेही खळखळ होऊ न देता आम्ही अनेकांना गावी पठवलं, अजूनही अनेकांना पाठवू
 • मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेकांना राज्याच्या बाहेर असलेल्यांना घरी पठवलं आहे
 • राज्याअंतर्गतही अडकलेल्या अनेकांनी गावी पाठवू, पण सध्या गडबड करू नका
 • हळू-हळू, टप्प्या टप्प्याने सगळं सुरू करू
 • हे जनजीवन पूर्ण सुरू व्हायला वेळ लागेलच 
 • धार्मिक सण अजूनही न साजरे केलेले बरे
 • राज्याअंतर्गत गावी जाणाऱ्यांनी जर घरी जाणं थांबवलं, तर महाराष्ट्राला मदत होईल / तुम्ही तरी रस्त्यावरून घरी चालत जाऊ नका / मध्ये-मध्ये मी तुम्हालाही सूचना देत राहीन, तुम्हाला गावी सोडेन
 • आपल्या सगळ्यांना आता घरात सावध नव्हे तर त्याबरोबर आपल्याला घराबाहेर राहताना सावध राहिलं पाहिजे
 • हे आलेलं राज्यावरचं संकट पावसाळ्यापूर्वीच संपवायच आहे
 • लॉकडाऊन उठवला आणि साथ पसरवली तर हाहाकार माजेल
 • काही ग्रीन आणि ऑरेंज ठिकाणी दुकानेही सुरू करू
 • फक्त सरकारच्या सूचनांचं पालन करा
 • दिवसातून 5 ते 6 लाख लोकांना आम्ही जेवण, नाष्टा देतोय देतोय
 • ग्रीनझोनमध्ये कोरोना पसरू द्यायचं नाही, हे सगळ्यांच्या लक्षात असू द्या
 • महाराष्ट्रंसाठी वाईटपणा घेण्यास मी तयार आहे
 • आम्हाला कोविड योद्धे हवे आहेत, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सरकारशी संपर्क साधा

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments