आपलं शहर

मुंबईच्या लोकलला इंजिन लावून परप्रांतियांना घरी पाठवण्याचं नियोजन सुरू आहे…

IMG 20200328 115857

आर्थिकदृष्टया संपन्न असलेल्या मुंबईत बेरोजगारी आणि वाढत्या लोकसंख्येची समस्या चर्चेत आली तर बहुदा आवाज उठवला जातो तो म्हणजे परप्रांतीयांवर. आज मुंबई कोरोनाच्या जाळ्यात अडकली असून लवकर या संकटातुन बाहेर पडणे गरजेचे आहे. भरगच्च दाट लोकसंख्या असलेल्या मुंबईत आता मोकळीकतेची गरज आहे. जो तो आपापल्या राज्यात, गावाकडे गेला तर मोकळीकता होऊ शकते, असं मत काही लोकं व्यक्त करत आहेत.
सगळ्या सोई बंद असताना परप्रांतीयदेखील त्यांच्या गावी परत जाण्याच्या मागण्या करत आहेत. त्यातच काही लोक असे मत व्यक्त करत आहेत की मुंबईच्या लोकलला इंजिन लावून परप्रांतीयांना घरी पाठवलं तर काय होऊ शकतं.  पाहुयात या खास रिपोर्टमध्ये…
 मुंबईच्या लोकलला इंजिन लावून परप्रांतियांना त्यांच्या घरी पाठवलं तर… 
अनेक राज्यातून मजूर कामानिमित्त मुंबईत येत असतात. कोरोना या अनाकलनीय संकटामुळे कोणतेही प्लॅनिंग न करता अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, त्यामुळे परप्रांतीयांची गौरसोय होऊ लागली. ‘ना घर का ना घाट का’ अशी त्यांची अवस्था झाली. अनेक शहरातुन “आम्हाला आमच्या गावी पाठवा” अशी मागणी परप्रांतीयांकडून करण्यात येत आहे. त्यांचा एक भला मोठा लोंढा हा मुंबईत अडकून पडला आहे. सोशल डिस्टनसिंग पाळणे हे परप्रांतीयांसाठी मुश्कील होऊन बसले आहेत. शहर सुटसुटीत करायचे असेल तर यावर एक उपाय म्हणून आपण मुंबईच्या लोकलला इंजिन लावून  परप्रांतियांना पाठवलं तर लोकसंख्या कमी होईलच तसेच लोकांना सुरक्षित सोशल डिस्टनसिंगचे पालन करता येईल, असं मत मुंबईतील काही तज्ञांनी मांडल आहे.
 लोकलच का? 
 लोकलच का तर, लोकलमध्ये प्रवासी क्षमता जास्त असते त्यामुळे कमी वेळेत जास्त परप्रांतीय प्रवास करून त्यांच्या गावी जाऊ शकतात, असा त्यामागचा उद्देश आहे. 
 काय होऊ शकते लोकलला इंजिन लावल्यानंतर…
लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी लोकलला इंजिन जोडले जावे जेणेकरुण लोकांची गैरसोय टाळून कमी वेळेत प्रवास केला जाईल, असं काहींच म्हणणं आहे. ज्याप्रमाणे नवीन लोकल मुंबईत आणण्यासाठी एक्सप्रेसचे इंजिन वापरले जाते, त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोकल वापरल्यास आणि एक्सप्रेसचे इंजिन लावल्यास प्रवास सुरक्षित होईल आणि मोठ्या संख्येने प्रवाशांची सोय देखील होईल. यासाठी रेल्वेने आपल्याकडे उपलब्ध असणारी अतिरिक्त रेल्वे इंजिन वापरली तर ते अधिक उत्तम ठरू शकते.
लोकलने लांब पल्ल्याचा प्रवास केल्यास?
लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एक अर्जपत्र व ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगची सोय उपलब्ध करून द्यावी. अर्जाद्वारे लोकांना कुठे, कधी आणि किती लोकांना जायचे याची माहिती मागवून तात्काळ आरक्षित तिकीट विकले जावे. तसेच सोबत मुंबई, ठाणे, पुणे  येथील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर पूर्वीप्रमाणे  विशिष्ट संख्या कोटा उपलब्ध  दिला जात असे, त्याप्रमाणे आसन व्यवस्था निश्चित करून द्यावी. त्याने गर्दी-गोंधळ टाळता येईल तसेच, गाड्यांमध्ये मोबाईल टॉयलेट, औषधोपचार सुविधा द्यावी जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. 
परप्रांतीय गेले तर परत येणाची शक्यता आहे का ?
परप्रांतीयांकडे चिप लेबर म्हणून जास्त प्रमाणात पाहिले जाते. कमी पैश्यामध्ये ते लोक जास्त काम करतात, याच गोष्टीमुळे ते काम लवकर मिळवतात. आता लॉकडाऊन दरम्यान त्यांची यशस्वीरित्या जाण्याची सोय झाली तर ते लॉकडाऊन पूर्णतः उठेपर्यंत वा प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू होत नही तोपर्यंत येण्याची शक्यता नाही. एकदा सगळे कोरोनाचे संकट मुंबईवरून हटले की ते पुन्हा कामावर रुजू होण्यास सज्ज असतील. 

कोरोनाच्या संकटात वंटास मुंबईचा हा खास रिपोर्ट नक्कीच एक चांगला मार्ग दर्शवतो. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा…

हेही नक्की वाचा…
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments