भुक्कड

चक्क नारळाच्या कवटीतून मिळतो ज्यूस; वाचा मुंबईतील सर्वात फेमस डिश

मुंबईतल्या फेमस डिश म्हणजे अक्षरशः मुंबईकरांच्या जिभेची चंगळ. वेगवेगळ्या माहिती सोबत मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरविणे हेसुद्धा वंटास मुंबई आपले कर्तव्य समजते.

वंटास मुंबई आपल्या वाचकांसाठी नेहमीच काहीतरी अनोखं घेऊन येत असते. मुंबईतील अनेक फेमस डिश आणि त्यांची खासीयत आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत असतोच, आज आपण एक आगळावेगळा ज्यूस पाहणार आहोत, जो प्रत्येक मुंबईकरांना एकदातरी त्याचा आस्वाद घ्यावा वाटेल.
images?q=tbn%3AANd9GcRDzo1jWQTW497SzacjfhWvYXqbY5rli4uOtl
मुंबईतील भेंडीबाजार, तेथील मोहम्मद अली रोड येथे असलेला द व्हेरी फेमस पप्पू ज्यूसवाला. 
येथील गली-गलीतील बच्चा पण सांगू शकतो, या पप्पू ज्यूसवाल्याचा पत्ता. या ज्यूसची आधी आपण खासीयत पाहू, जी प्रत्येक मुंबईकराला भावते. कोणत्याही डिशमध्ये चवीसोबत त्याची मांडणी म्हणजेच सरविंग खूप महत्वाची असते. या पप्पू ज्यूसवाल्याची सरविंग हीच त्याची वेगळीकता बोलू शकतो आपण. साधारणत: सर्व ज्यूसवाले हे आपल्या ग्राहकाला ग्लासमध्ये ज्यूस देतात पण, पप्पू ज्यूसवाला हा नारळ तसेच टरबूजाच्या बाहेरील आवरणात त्याचा स्पेशल ज्यूस सर्व्ह करतो.
पप्पू ज्यूसवाला हा मुंबईतील त्याच्या अनोख्या शैलीतील ज्यूस बनवण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. नारळ, स्ट्रॉबेरी, टरबूज, दूध, क्रिम, काजू किशमिश अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून हा ज्यूस बनविला जातो. फक्त 150 रुपयांपासून या ज्यूसची किंमत आहे. अनेक फुडी मुंबईकर भेंडीबाजारमध्ये गेल्यावर एकदातरी या पप्पू ज्यूसचा आस्वाद घेतात. अनेक फुडी यु-ट्यूबर विशेषत: या ज्यूसचे रहस्य आणि चव चाखण्यासाठी एकदातरी पप्पू ज्यूसवाला सेंटरला भेट देतात.
कशी वाटली माहिती आम्हाला जरूर सांगा आणि मुंबईतील आणखी तुमच्या आवडीचे पदार्थ आणि ते मिळण्याचे फेमस ठिकाण जाणून घेण्यासाठी आम्हाला कंमेंट सेक्शनमध्ये तुमची चव नक्कीच कळवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments