कारण

अबब! कोरोनामुळे तुमच्या आयुष्यात ‘हे’ झालेत परमनंट बदल

कधी थांबणार हे कोरोनाचे संकट, कधी होणार सगळंकाही नॉर्मल? प्रत्येक मुंबकरांच्या मनातील पश्न. कुठेतरी आशेचा किरण दिसत असताना आकडा वाढत गेला आणि लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात वाढले.

आता आपण चौथ्या टप्प्यात जाणार नाही, याची कुणी शाश्वती देत नाही. तसेच कोरोना संकटाच्या आधी आपण आपले आयुष्य जसे मोकळेपणाने जगत होतो, तसे पुन्हा जगता येईल का? हेदेखील आपण ठामपणे सांगू शकत नाही. निश्चितच आता पुढील आयुष्यात कोरोना काही परमनंट बदल करून जाईल. आज वंटास मुंबई आपल्या वाचकांसाठी  कोरोनामुळे भविष्यात काय काय बदल याचा एक आढावा आपल्या समोर घेऊन येत आहे, तर पाहूया सविस्तर माहिती.
परिस्थिती नॉर्मल कधी होऊ शकते?
आज क्लोज कॉन्टॅक्टमुळे असो वा संसर्गामुळे, कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोणत्याही प्रकारची लस अजून या आजारावर मिळाली नसल्यामुळे आजारावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. अनेक संशोधकांच्या मते कोरोनावर लस शोधण्यासाठी भरपूर कालावधी जाऊ शकतो, त्यामुळे परिस्थिती नॉर्मल होण्यास अजून भरपूर कालावधी लागू शकतो. आज लॉकडाऊन असूनदेखील रुग्णसंख्या वाढत आहे, तर लॉकडाऊन संपल्यावर काय होईल, याचा विचार न करणेच योग्य ठरेल. योग्य खबरदारी घेणे, स्वछता बाळगणे व आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, हे लक्षात ठेवून काम केले तर परिस्थिती नॉर्मल व्हायला वेळ लागणार नाही.
मुंबकरांच्या आयुष्यात होणार कोरोनामुळे परमनंट बदल…
● पर्यटन व्यवसायामध्ये अनेक बदल घडून येऊ शकतात. सोशल डिस्टनसिंग पाळून आता प्रवसांना पर्यटनाचा आनंद घ्यावा लागेल. तसेच, पर्यटनासाठी सुरक्षेच्या दृष्टीने प्रवासी मर्यादासुद्धा लागू केली जाऊ शकते.
● स्मार्ट स्टडीला जास्त प्राधान्य दिले जाऊ शकते. विद्यापीठात जाऊन गर्दी न करता विद्यार्थी घरबसल्या डिजिटलच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात. तसेच अनेक ऑनलाइन डिग्री कोर्सेस जास्त विचारात घेतले जाऊ शकतात.
● परदेशात अभ्यासासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. विद्यार्थी स्वदेशात राहून ऑनलाइनच्या माध्यमातून परदेशी अभ्यासाची विचारणा केली जाऊ शकते किंवा तसे धडे ते इथूनच घेण्याची शक्यता आहे.
● लॉकडाऊनच्या काळात नाविलाज म्हणून करण्यात आलेल्या वर्क फ्रॉम होमच्या सुविधेला जास्त पसंती मिळत जाईल. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना नॉर्मल होऊन जाईल.
● सगळे काही घरातून काम करू शकत नाहीत. कारखान्यात तसेच अनेक ठिकाणी घरून काम करू शकत नाही, तिथे फिझिकल डिस्टनसिंग ठेवून काम केलं जाईल.
● निकट भविष्यात रोबॉटिक्स आणि इतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढू शकतो. कारण रोबोला अथवा तंत्रज्ञानाच्या वस्तूंना साथीच्या रोगांचा धोका नसतो.
● घरातून बाहेर पडताना मास्क ही गरजेची वस्तू बनेल. लोक मिठी मारायचं टाळतील. हँडशेकऐवजी नमस्कार करतील. तरुण-तरुणी प्रत्यक्षात भेटणं टाळून जास्तीत जास्त ऑनलाईन डेटिंग करतील.
● अनेक व्यावसायिक तसेच वैयक्तिक कामांसाठी भेटीगाठी टाळून विडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल.
● अनेक मोठे समारंभ, सोहळे, सण हे साजरे करण्याची पद्धत आता बदलेल. गर्दी टाळता येण्याची पद्धत जास्त अवलंबली जाईल.
● स्वछतेवर मोठ्या प्रमाणात लक्ष दिले जाईल जेणेकरून आजार टाळता येतील.
● लोकल सेवेत गर्दी टाळण्यासाठी काही नियम अटी लागू केल्या जाऊ शकतात.
कोरोनामुळे आयुष्य नव्याने सुरू करायची वेळ आली आहे. बदललेलं जग कसं असेल, याचं नेमकं चित्र ठाऊक नसलं तरी एक सर्वसाधारण कल्पना येऊ शकते. आपलं आधीच आयुष्य आपल्याला परत होतं तस मिळेल याची शक्यता कमीच आहे. असो, जीवपेक्षा बदल हा मोठा नसावा. हेच ध्येय पुढे ठेवून आपल्याला पुढे येईल त्याचे स्वागत करणे  हेच चांगले लक्षण ठरेल.

 

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा, मुंबईतील प्रत्येक घडामोडीसाठी नक्की वंटास मुंबईला भेट द्या आणि  जाणून घ्या मुंबईतल्या वंटास खबरी…

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments