एकदम जुनं

शंभू राजांनी लढाई न लढता औरंगजेबाच्या 40 हजार सैन्याला केलं होतं ठार…

 “The empire of Sambhaji maharaj, is limitless as though the sky and it will be a rule assuring safety for all…” शौर्याचा महामेरु असलेले अजिंक्य योद्धे म्हणजे आपले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. पहिले शिवपुत्र जे बालवयातच स्वराज्यासाठी मैदानात उतरले, अशा थोर राजाला वंटास मुंबईचा त्रिवार मानाचा मुजरा…!
आज छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण त्यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
तो दिवस होता, 14 मे 1657 या दिवशी पुरंदर किल्ल्यावर मराठ्यांचा छावा शिवपुत्र जन्माला आला आणि त्यांचे नामकरण करून संभाजीराजे ठेवण्यात आले. आपले आजोबा, वडील यांची स्वराज्याप्रती असणारी भावना बालवयापासून संभाजी राजांच्या अंगात नेहमी भिनभिनत असे. संभाजी राजे दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईसाहेब देवाला प्रिय झाल्या. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईविना पोरके झाले ते आपले शंभूराजे. वयाच्या अवघ्या पाच वर्षांपासून ते तलवार बाजी करत होते. वयाच्या 9 व्या वर्षापासून 4 हजारांची मनसबदारी स्वीकारणारे आपले संभाजीराजे होते.
आग्र्याहुन पिटाऱ्यातून पळून आल्याची हकीकत तर आपण सगळे लहानपणीच इतिहासात शिकलो. तेव्हा संभाजीराजे फक्त दहा वर्षांचे होते. शिक्षणाची आवड आणि संभाजीराजांची बौद्धिक क्षमता अगणित होती. “महान बुध भूषण” नावाचा संस्कृत ग्रंथ लिहणारे संस्कृतपंडित म्हणजे संभाजीराजे. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. जवळपास सोळा विविध भाषांचे ज्ञान हे संभाजीराजांना होते. तसेच वेगवेगळ्या भाषेतील 3 महान ग्रंथ शंभूराजांनी वयाच्या 15व्या वर्षी लिहिले. अभ्यासू वृत्तीसह त्यांच्याकडे एक नेतृत्व करणारे विशेष कौशल्य होते. स्वराज्यासाठी 10 हजार सैनिकांचे नेतृत्व ते वयाच्या 16 व्या वर्षी करत होते. तसेच ते एक कुशल सेनानीदेखील होते, हे विसरुन चालणार नाही.
अनेक गडकिल्ले मिळवण्यासाठी महाराज शिवरायांच्या खांद्याला खांदा देत संभाजीराजांनी काम केले. कोंढाणा किल्ला घेण्यासाठी वयाच्या 17व्या वर्षी राजांना सहकार्य करणारे आपले शंभूराजे होते. अखंड स्वराज्य जपण्यासाठी वयाच्या 18 व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला वारसदार युवक हे शंभूराजे ठरले आणि सगळ्या स्वराज्याचा कारभार त्यांनी हाती घेतला. जवळपास 10 वर्षे स्वराज्यासाठी संभाजीराजे इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच आणि मुघल या पाच सत्ताधाऱ्यांशी लढत होते.

संभाजीराजांची अशी एक विशेष गाथा होऊन गेली, जी इतिहास कधीच विसरु शकणार नाही.

जगातील पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग; संभाजी राजांच्या नावी…
१६८३ च्या काळात एक खूप मोठी स्वारी औरंगजेबाने आपला पुत्र शहा आलम याच्यासोबत जवळपास दीड लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर केली होती.  आता स्वराज्यावर खूप मोठे संकट उभे राहिले होते. त्यातच डच, पोर्तुगीज व इंग्रज यांनासुद्धा औरंगजेबाने स्वतःकडे वळवले होते, संभाजी महाराजांना स्वराज्य वाचवण्यासाठी कोणच मदत करणार नाही, याची दक्षता घेतली होती. आता एवढ्या मोठ्या फौजेचा सामना करत स्वराज्याला कसे सुरक्षित ठेवायचे, हा मोठा प्रश्न संभाजी राजांसमोर उभा राहिला होताच. त्या वेळी संभाजी महाराजांनी युक्तीचा वापर करत त्याची एक कमी बाजू शोधून काढली आणि त्यावर वार केला. 
ती कमी बाजू होती पिण्याचे पाणी. त्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास ५-१० मैलांवर एखादी पाण्याचा पुरवठा करणारी विहीर असायची. बाकी खाडीचा प्रदेश असल्याने गढूळ अन् खारट पाणी होते. अशातच संभाजी महाराजांनी जगातील पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग केला होता. जे पाणी पिण्यासाठी उपलब्ध व दर्जेदार होते, त्या पाण्यात संभाजी राजांनी विष कालवले, अन् सर्व धान्यसाठा लुटला. मुघल फौजेला या गोष्टीचा थांगपत्ता नसल्याने जवळपास ४० हजार सैन्य विषबाधा होऊन मृत्युमुखी पडले. त्या मृत्युमुखी पडलेल्या प्रेतांच्या भयंकर वासाने रोगराई निर्माण झाली, जनावरे मेली. त्या दुर्गंधीच्या वासाने आजारी पडून कैक मेले तसेच धान्यसाठा लुटल्यामुळे उपासमारीनेदेखील कैक मेले.
जगाच्या इतिहासात शत्रूची गाठच न पडता सैन्य पराभूत झालेली ही पहिलीच लढाई होती. साधं शस्त्रही न उचलता एवढी मोठी लढाई जिंकणारा पहिला राजा म्हणून इतिहासाला आपल्या संभाजी राजांची नोंद घ्यावी लागते.
अशाप्रकारे निव्वळ बुद्धीच्या बळावर स्वराज्यावर आलेले भलेमोठे संकट संभाजी राजांनी युद्ध न करता, लढाई न लढता, आपला एकही माणूस न गमावता, आपल्या फौजेचे अन् रयतेचे काही नुकसान न होऊ देता, संभाजी राजांनी मुघलांना पाण्यातून पाणी दावलं.
अखरे 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे वयाच्या 32 व्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या देहाचे बलिदान करून संभाजी राजांनी आपल्या स्वराज्याला राजाविना पोरके केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या आधी आणि नंतरही अनेक राजे, महाराणी होऊन गेले, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची आणि धर्मवीर संभाजी महाराजांची रयतेशी जोडलेली नाळ, त्यांच्या कर्तत्व, नेतृत्व, वक्तृत्व, अभ्यास, चपळता अशा अनेक कौशल्यांमुळे अजून जोडली गेलेय, हे नक्की.

 

हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशेच अनेक विषय वाचण्यासाठी वंटास मुंबईला भेट द्या.

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments