कारण

महिला करताहेत कोरोनावर मात; पुरुषांची हार – कारण फक्त एकच…

IMG 20200423 WA0059

कोरोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. बलाढ्य अमेरिका सारख्या देशालादेखील कोरोनाने नाकीनऊ आणले आहे. कोरोनसमोर सर्व देश हतबल झालेले पाहायला मिळत आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान असो वा मुंबईतील सफाई कामगार, शहरातील लोक असो अथवा गावातील लोक, उच्चशिक्षित असो व अडाणी, श्रीमंत असो की गरीब, डॉक्टर असो अथवा पोलीस की पत्रकार यामध्ये कोरोनाने कोणालाही सोडलेले नाही. कोरोनाने जात बघतली ना धर्म की पंत. या कोणत्याही आधारावर कोरोनाने भेदभाव केला नाही. 

मग लिंगामध्ये कोरोनाचा का फरक आहे? कोरोनाच्या रुग्णांपैकी मुंबईसह जगभरात स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, असा आतापर्यंतचा अहवाल सांगतो, पाहुयात याच संदर्भातील हा खास रिपोर्ट.
राज्यातील कोरोना रुग्णांची (14 मे पर्यंतची) आकडेवारी

पुरुष रुग्ण – 15 हजार 49 (62 टक्के)
महिला रुग्ण 9 हजार 952 (38 टक्के)

पुरुष मृत्यू – 605 (62 टक्के)
महिला मृत्यू – 370 (38 टक्के)
मुंबई, महाराष्ट्रात नाही तर अमेरिकेमध्येदेखील हेच प्रमाण दिसून येत आहे. कोरोना संसर्ग झालेल्या महिला रुग्णांच्या तुलनेत पुरुषांची आकडेवारी दुप्पट आहे. पश्चिम युरोपमध्ये हा आकडा 69 टक्के आहे. तर भारताच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना लागण झालेल्या रुग्णांपैकी 62 टक्के रुग्ण हे पुरुष आहेत. तर भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारे 62 टक्के रुग्ण हेदेखील पुरुषच आहेत. यामुळे एक गोष्ट लक्षात येते की स्त्रियांच्या तुलनेत पुरुष रुग्णांची व पुरुष मृतांची संख्या अधिक आहे. 
मग महिलांना कोरोनाचा धोका कमी का? 
आपण सर्वजण इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या विज्ञान विषयामध्ये एक्स क्रोमोझोम आणि एक्स/वाय क्रोमोझोम या गुणसुत्रांबद्दल शिकलो आहोत. हेच सूत्र येथे लागू पडतं. एका थेरीनुसार महिलांमध्ये असणाऱ्या एक्स क्रोमोझोम्समुळे कोरोनाचा धोका कमी असावा. 
माणसाच्या शरीराची रचना कशी असते? महिलांमध्ये एक्स-एक्स क्रोमोझोम्स आणि पुरुषांमध्ये एक्स-वाय क्रोमोझोम्स असतात. महिलांमध्ये असणाऱ्या अधिकच्या एक्स क्रोमोझोम्समुळे त्यांचा रोगप्रतिकारक शक्तीला प्रतिसाद चांगला असतो. त्यांना दिलेल्या लसी अधिक प्रमाणात काम करतात, तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता अधिक आक्रमरित्या काम करते, अस शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 
कोरोना व्हायरस शरीरात शिरल्याची जाणीव झाल्यावर मेंदूपर्यंत त्याची सूचना देण्याच काम ज्या प्रोटिन्स आहे, ते एक्स क्रोमोझोम्समध्ये जास्त असतात. महिलांमध्ये या क्रोमोझोम्सची संख्या दुप्पट असल्याने या रोगांना अटकाव करण्यासाठी महिलांची रोगप्रतिकारकशक्ती लवकर कार्यान्वित होते. – फिलिप गोल्डर, प्राध्यापक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी
पुरुषांच्या तुलनेत महिलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचं आणखी एक कारण म्हणजे व्यसन. व्यसनामुळे जे रोग पुरुषांना होतात ते रोग म्हणजे हृदयरोग, श्वसनाचे विकार किंवा कॅन्सर असे रोग महिलांना होण्याची शक्यता कमी असते. एका आकडेवारी नुसार भारतात एकूण स्मोकिंग कारणाऱ्यांपैकी 70 टक्के लोक हे पुरुष आहेत. कदाचित याचाही परिणाम या आजाराला कारणीभूत ठरू शकतो. 
कोरोनाचा बळी जरी पुरुषांचा असला तरी काही काळानंतर जेव्हा कोरोना संपेल तेव्हा यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा इतर ठिकाणी बळी जाणार आहे. कारण अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक तोटा हा महिलांना बसणार आहे, असेही काही अर्थतज्ञ म्हणतात.
कोरोना व्हायरच्या जागतिक संकटाने आपल्याला घेरलेलं आहे. यातून रस्ता केव्हा सापडेल याच उत्तर कोणालाही माहीत नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांना या व्हायरसचा अधिक धोका आहे. दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया कदाचित या आजारातून वाचतील, परंतु इतर गोष्टींपासून पीडित ठरतील. त्यामुळे देश, सरकार, प्रशासन यांनी समाज म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या दोन्ही घटकांच्या सुरक्षतेतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा, अशा अनेक विषयांची माहिती जर तुम्हाला हवी असेल, तर ताशाप्रकारची माहितीही आम्हाला कळवा.

 
हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments