कारण

मुंबईकर लॉकडाऊन दरम्यान कसे जाऊ शकतात गावी; पाहा ही खास खबर

पूर्वीसारखी परिस्थिती असती तर आज चाललेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक मुंबईकर आपापल्या गावी एक बदल म्हणून, वर्षभराचा थकवा दूर करण्यासाठी गेले असते. अनेक लग्नसोहळे, भटकंती प्लँनिंग हे ह्याच वेळीस होत असतात; पण आजची परिस्थिती कोरोनाने पूर्णपणे काळ बदलून टाकला.

रुग्ण नसलेल्या ठिकाणी लॉकडाऊन थोडेफार शिथिल होत आहे. मुंबईसारख्या रेड झोन मधून अनेकांना गावी, दुसऱ्या राज्यात जायचे आहे, परंतु वाढता कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता, ते शक्य आहे की नाही हेच आपण आजच्या खास रिपोर्ट मधून सांगणार आहोत.
मुंबईकर कसे जाऊ शकतात त्यांच्या गावी…
गावी जाण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांसाठी आता तेवढीशी शक्य गोष्ट राहिली नाही. मुख्य म्हणजे, मुंबई हे रेड झोन म्हणजेच कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील माणसे वगळता इतर कोणीही ठोस करणास्तव मुंबईतील मुंबईत फिरू शकत नाहीत, त्यामुळे गावी जाणेतर शक्यच नाही. आता इमर्जन्सी केस असेल तर एखादा मुंबईकर इ-पास द्वारे एक विशिष्ट प्रोसेस करून त्याच्या गावी जाऊ शकतो. आता इमर्जन्सी केसेसमध्ये मृत्यू, गरोदर वा अत्यावश्यक वैदकीय कारण दिल्यास आपण मुंबई बाहेर जाण्यास अधिकृत परवानगी मिळवू शकतो. त्यासाठी देखील एक विशिष्ट प्रोसेस करावी लागते, आपल्याला आपल्या कारणाला धरून पुरावा सादर करावा लागतो आणि नंतर पोलिसांकडून त्यावर पडताळणी होताच आपल्याला जाण्यासाठी पास दिला जातो.
कंटेंटमेंट झोन आपली मुंबई…
कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येत आपण आहोत. त्याच ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळून राहाणे गरजेचे आहे. मुंबईला रेड झोनपासून ग्रीन झोन बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यंत आवश्यक कारणास्तव कुठेही जायचा विचार सद्यस्थितीत मुंबईकरांनी करू नये.
ई-पास बाबत मुंबईकरांना आवश्यक सूचना
◆ कायद्याने अत्यावश्यक कारण असल्याशिवाय मुंबई बाहेर जाण्यास सगळ्यांना बंदी आहे
◆ नागरिकाला त्याच्या आवश्यक कामासाठी 3 तासांहून जास्त वेळ लागणार असल्यास अधिकृत परवानगी म्हणून त्याला ई-पास काढणे गरजेचे आहे
◆ मुंबई मेट्रो रिजनमध्ये फक्त नवी मुंबई ते नवी मुंबई हेच पास दिले जातात
◆ मुंबई व ठाणे मधून नवी मुंबईत जाण्यास ई-पासद्वारे परवानगी मिळत नाही. त्यासाठी ट्रान्सफर हा पर्याय उपलब्ध आहे.
◆ अत्यावश्यक कारण दाखवून आंतरजिल्हा प्रवेशासाठी पास दिला जाऊ शकतो. (अत्यावश्यक कारणांमध्ये – मृत्यू, गरोदर स्त्री वा वैदकीय)

 

आपल्या अनेक समस्या व मुंबई संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला कंमेंट सेक्शनमध्ये आपल्या शंका जरूर कळवा आणि अशाच मुंबई संबंधित खास खबरींसाठी आमच्याशी वंटास मुंबईद्वारे जोडते राहा…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments