फेमस

उध्दव ठाकरेंवर 4 कोटींचं कर्ज; स्वत:ची एकही गाडी नाही, पाहा किती कोटींचे आहेत मालक?

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 11 मे रोजी आपल्या विधानपरिषद सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला, त्यामागची संपुर्ण राजकिय गणितं आपल्या सगळ्यांना माहित असतीलच. सध्या आपण अर्ज दाखल करताना अर्जदाराला जी माहिती सादर करावी लागते, त्यात उध्दव ठाकरे यांनी कोणत्या माहितीचा उल्लेख केलाय, ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल करताना आपली आतापर्यंतची एकुण संपत्ती किती आहे, कर्ज किती आहे, स्वत:वर किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, आपल्या पत्नीच्या नावे किती संपत्ती आहे, अशा सगळ्याचा अहवाल सादर केला आहे. त्या सगळ्यांमध्ये राज्याला आतापर्यंत माहिती नसलेल्या उध्दव ठाकरेंच्या संपत्तीबद्दल माहिती समोर आली आहे, ती पुढील प्रमाणे…
उध्दव ठाकरे यांच्याकडे असलेली जंगम संपत्ती
 • उध्दव ठाकरे यांच्याकडे अर्ज भरत असताना कॅश इन हॅंड रक्कम 76 हजार रुपये होती.
 • त्यांच्या अनेक बँक खात्यांमध्ये 1 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम आहे.
 • शेअर बाजारमध्ये गुंतवणुक, बाँड, फंड अशांमध्ये मिळून 21 कोटी 68 लाख रुपयांची गुंतवणुक आहे.
 • उध्दव ठाकरे यांची इन्शुरन्स पॉलिसी 3 लाख रुपये इतकी आहे.
 • उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या नावावर असलेली कोणतीही गाडी नाही.
 • उध्दव ठाकरे यांच्याकडे 23 लाख रुपयांचे दागिणे आहेत.
 • ते हाताळत असलेल्या इतर गोष्टींची किंमत 58 लाख रुपये इतकी आहे.
 • एकुण 24 कोटी 14 लाख रुपयांची जंगम संपत्ती उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे.
उध्दव ठाकरे यांच्याकडे असलेली स्थावर मालमत्ता
 • रायगड जिल्ह्यामध्ये उध्दव ठाकरे यांच्या मालकीचे 5 प्लॉट आहेत, ते त्यांनी 1986 ते 1988 च्या दरम्यान विकत घेतले होते, त्याची किंमत 95 हजार रुपये इतकी होते, त्यातील एका जागेवर त्यांचे फार्म हाऊस बांधले आहे, ज्याची रक्कम 5 कोटी रुपये इतकी आहे.
 • अहमदनगर आणि माहिममध्ये त्यांच्या नावावर प्ल़ॉट आहेत, त्याची किंमत 4 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. त्या जागेवर बांधकाम केले असल्याने त्याची किंमत 13 कोटी 67 लाख इतकी होते.
 • वांद्रे पुर्व आणि पश्चिम इथे उध्दव ठाकरे यांचं रहिवाशी ठिकाण आहे, त्याची किंमत 33 कोटी 73 लाख रुपये इतकी होते.
 • एकुण 52 कोटी 44 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे.
उध्दव ठाकरे यांच्या नावावर एचडीएफसी बँकेचं 4 कोटी रुपयांचं कर्ज असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये नमुद केली आहे.
रश्मी ठाकरे यांची संपत्ती…
रश्मी ठाकरे यांच्या संपत्तीची नोंद या अर्जात होती, रश्मी ठाकरे यांच्या नावावर 64 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर येत आहे. रश्मी आणि उध्दव ठाकरे यांना हिंदु अनडिव्हाईड फॅमिलीमधून 1 कोटी 58 लाख रुपये इनकम होत असल्याची माहितीदेखील या अर्जामध्ये नमुद केली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे यांचे एकुण उत्पन्न 143 कोटी रुपये इतके आहे.
उध्दव ठाकरे यांनी इतर भरलेली माहिती…
 • उद्धव ठाकरे नोकरी करतात. ते राज्याचे मुख्यंमंत्री पद सांभाळतात.
 • त्यातून मिळणारा पगार हा उध्दव ठाकरे यांच्या इनकमचा मुख्य स्रोत आहे. त्यानंतर व्याज, डेव्हिडंट आणि कॅपिटल अशा रुपातून त्यांना इनकम मिळत असतं.
 • रश्मी ठाकरे व्यवसाय करतात. त्यांनाही व्याज, भाडे, नफ्याचा हिस्सा, डेव्हिडंट आणि कॅपिटल अशापध्दतीने इनकम मिळत असतं.
 • उध्दव ठाकरे यांनी 2018 -19 या काळात 38 लाख रुपये इतका इनकम टॅक्स भरला होता. तर रश्मी ठाकरे यांनी याच कालावधीत 79 लाख इतके इनकम टॅक्स भरले होते.
उध्दव ठाकरे यांच्यावर अनेक केसेस दाखल आहेत, मात्र अजून एकही गुन्हा सिध्द झाला नाही.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि उध्दव ठाकरे यांच्या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं, ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. सोबतच इतर कोणत्या विषयाची माहिती तुम्हाला हवी असले तर तेही कळवा, आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू.

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Unknown

ठाकरे कुठुबिय तर जमीन जमल्याने वडिलोपार्जित धनवान आहेत पण जे काही राजकारणी आणि पत्रकार 1992 मध्ये भाड्याच्या 10 x 15 च्या खोलीत राहात होते त्यांच्याजवळ अत्ता 4 चार फ्लॅट आलिशान गाड्या अमाप संपत्ती कुठून आली याची चौकशी करा !