कारण
नेमकं का आले होते उध्दव ठाकरे live; उत्तरात लपले होते फडणवीसांचे ‘हे’ प्रश्न

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या परिस्थितीवरून राजकारण सुरू आहे, भाजपाकडून वेळोवेळी शिवसेनेच्या कामावर प्रश्न उठवले जात आहेत, त्यातच सत्ताधारी पक्षाकडून उत्तर येणे गरजेचे होते, तेच उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लाईव्ह आले होते. लाईव्ह आल्यानंतर त्यांनी अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या हिताच्या अनेक सुचना केल्याच, मात्र त्यांनी आतापर्यंत विरोधी पक्षांनी विचारलेल्या सवांलांना उत्तरदेखील खड्या आवजात दिलं.
मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत आणि घरी राहाण्याचा सल्ला देत मुख्यमंत्र्यांनी विषयाला हात घातला. कोरोनासोबत जगायचं म्हणजे काय करायचं हे आपल्याला शिकावं लागेल. आजकाल मला हुकूमशाह झाल्यासारखं वाटतं, मात्र मला नाविलाज आहे, तुम्हाला माझं ऐकावच लागेल, असेही उध्दव ठाकरे म्हणाले, हे सगळं मांडत असताना कोरोनाची परिस्थिती, राज्यातील आर्थिक आढावा, अशा सगळ्या गोष्टींवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकाश टाकला आहे.
जसं केंद्राने पॅकेज जाहीर केलं तसं राज्यानेही राज्यातल्या अनेक क्षेत्रांसाठी पॅकेज जाहीर करावं, शेतीचा माल विकत घ्यावा, खरीपाचं हंगाम असून त्याचीही तयारी राज्य सरकारने केली नाही, सध्या शेतकऱ्यांना बियाणे, खतं, शेतीसाठी कर्ज मिळत नाही. बलुतेदारांवर मोठं संकट आलं आहे, केंद्राने पॅकेज जाहीर केल्यानंतर वेगवेगळ्या राज्यानेही पॅकेट जाहीर केलं, मात्र महाराष्ट्र राजसरकारकडून असं कोणतच पॅकेज जाहीर केलं जात नाही, असंही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, या सगळ्यांना उध्दव ठाकरे यांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिलं आहे.
● इतर राज्यांकडे बघण्यापेक्षा आपण काय करतोय, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
● मीही पॅकेज तुम्हाला देतो, पण आधी परिस्थिती सांभाळू द्या, पॅकेज जाहीर करून मोकळा डब्बा मला द्यायचा नाहीये.
● गोरगरिबांना आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशांनादेखील आम्ही धान्य देत आहोत.
● 10 लाखांच्यावर आपण 5 रुपयात शिवभोजन थाळी देत आहोत.
●महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत अनेक रुग्णालयांमध्ये (जिथे ही सुविधा सुरू आहे तिथे) कोरोनावर 100 टक्के मोफत उपचार देत आहोत.
● राज्याने आतापर्यंत 481 ट्रेन श्रमिकांसाठी आणि इतर नागरिकांसाठी सोडल्या आहेत. त्यात सुरूवातीचा काही भाग सोडला तर आम्ही इतर सगळ्या कामगारांना मोफत त्यांच्या राजयात पाठवलं आहे.
● राज्य सरकारने आतापर्यंत 85 कोटी रुपये ट्रेन प्रवाशांच्या तिकिटासाठी दिले आहेत.
● आपण रोज केंद्राकडे 80 ट्रेन मागत आहोत, मात्र आम्हाला केंद्राकडून फक्त 30 ते 40 ट्रेन मिळत आहेत.
●आमच्या सगळ्या कामाचं कौतूक परप्रांतिय जातानादेखील करत आहेत.
● या सगळ्यात एसटी विभागदेखील महत्वाचं काम करत आहे.
●रस्त्यावरून चालत गावी जाणाऱ्यांना एसटी कामगारांना जिथे जायचं होतं, तिकडे घेऊन जात आहेत, तसेच राज्यातल्या अनेक भागातून अनेक लोकांनी अनेक राज्यांच्या सिमेपर्यंत त्या त्या लोकांना घेऊन जात आहेत.
● एसटीने आतापर्यंत 3 लाख 80 हजार मजूरांना मोफत त्यांच्या सिमेच्या ठिकाणी पाठवलं आहे आणि यासाठी राज्याने एसटी प्रवासासाठी 85 लाख रुपयांचा खर्च केला आहे.
●महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरू करण्यासाठी अनेक व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत, लाखांच्या वर तिथे लोक काम करत आहेत.
●ग्रीन जिल्ह्यांमध्ये बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
● आपण कधीच शेतीची कामे बंद केलेली नाहीत.
● शेतकऱ्याला बांधावर बिबियाणे कसं उपलब्ध करून देता येईल, याचा विचार करत आहोत.
● कापूस खरेदीचा विचार आपण करत आहोत. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी आमचा विचार सुरू आहे.
● हा संकटाचा काळ आहे, कोणीही राजकारण करू नये आणि जरी तुम्ही केलात म्हणून आम्ही राजकारण करणार नाही.
● मी प्रामाणिकपणाने काम करतोय, महाराष्ट्र सरकार प्रामाणिकपणाने काम करतय.
● काही उणिवा केंद्राकडून भासत आहेत, केंद्राकडून अजून राज्याचे काही पैसे येणे बाकी आहेत, ते येत नाही म्हणून मी काय बोंब मारत बसू का?
● अडचणीच्या वेळेत राजकारण करणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही.
या निवडक आणि अशा अनेक मुद्यांच्या माध्यमातून उध्दव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थित मांडलीच पण ज्यांनी ज्यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारला प्रश्न विचारले होते, त्याचं उत्तरदेखील उध्दव ठाकरे यांनी त्यांना दिलं, आहे.
हेही वाचाच…