खूप काही

लॉकडाऊन 4.0 मध्ये आत्मनिर्भर मुंबई कशी असेल, नक्की पाहा…

लॉकडाऊन पहिला : 24 मार्च ते 14 एप्रिल
लॉकडाऊन दुसरा : 15 एप्रिल ते 03 मे
लॉकडाऊन तिसरा : 4 मे ते 17 मे
लॉकडाऊन चौथा : 18 मे 31 मे
लॉकडाऊन तिसरा संपण्याआधीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन 4 ची घोषणा केली होती, मात्र हा चौथा लॉकडाऊन जास्तकरून रेड झोन, कंटेनमेंट झोन यांच्यासाठी लागू असेल, जिथे ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन आहेत, तिथे व्यवहार सुरू करण्यास काहीच हरकत नाही, असंदेखील ते म्हणाले होते, सोबतच आपल्याला कोरोनासोबतच राहून काम करावं लागेल, हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई जितके दिवस बंद असेल, तितके दिवस देशावर आर्थिक संकट येऊ शकतं, हे सध्याचं वास्तव आहे. त्यातच मुंबईत देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. मुंबईतील अनेक कामगार आपल्या गावी म्हणजे परराज्यात जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक कामगार, तरुणवर्गदेखील आपल्या गावी जात आहेत. सध्या मुंबईतील स्थानिक आणि दुसरीकडे कुठे राहाण्याची सोय नसलेले मुंबईत राहातील, कोरोनाचं संक्रमण इथे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या मुंबईसमोर आर्थिक संकट आणि कोरोनाचं महासंकट उभे आहेत.
मुंबईतल्या टेस्टिंगचं प्रमाण वाढवावं, समोर येतील त्या रुग्णांना क्वारंटाईन करावं आणि हळू हळू सगळे व्यवहार सुरू करावेत, असा दोन्ही संकटावर उपाय असू शकतो, असे अभ्यासक सांगतात. बाकी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रशासनावर अवलंबुन असणार आहे.
या लॉकडाऊनमध्ये मुंबईत काय बंद असणार आहे, यावर चर्चा करण्यापेक्षा काय सुरू आहे हे पाहाणेच आता गरजेचे असेल…
 • मुंबईतील अनेक शासकीय कामे सुरू करण्यात आली आहेत, यांच्या वाहतूकीसाठी परवाना देण्यात आला आहे, ते बेस्ट, टॅक्सी, खाजगी वाहान किंवा दुचाकीने प्रवास करू शकतात (सोबत ओळखपत्र गरजेचे)
 • मुंबईतील बीएमसीचे कामगार, अत्यावश्यक सुविधेतील लोक घालून दिलेल्या अटींनुसार कामावर येतील
 • मुंबईतल्या काही टक्के बेस्ट सुविधा सुरू असतील
 • मुंबईतील स्वच्छता कामगारांना मुभा आहे
 • काही ठिकाणी सुरू केलेल्या बाजारपेठा त्या-त्या वेळेनुसार सुरूच असतील
 • मुंबईत काही ठिकाणी रुग्णांची संख्या कमी आहे, तिथे अनेक व्यवहार सुरू करण्याची शक्यता आहे
 • मुंबईतील अनेक कामगारांना रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यासाठी, अत्यावश्यक सुविधेतील कामारांना त्यांच्या कामावर सोडण्यासाठी काही टॅक्सींना परवाणगी दिली आहे
 • देशात दोन राज्यांमध्ये वैद्यकीय सेवा, हवाई रुग्णवाहिका आणि सुरक्षेसंदर्भातील हवाई वाहतून सुरू असेल
 • शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक/प्रशिक्षण/कोचिंग संस्था बंद असल्या तरी ऑनलाईन लर्निंग सेवा सुरू केल्या जातील, काही ठिकाणी हे सुरूदेखील आहे
 • आरोग्य, पोलीस आणि अत्यावश्यक सुविधेत मोडणाऱ्या अनेकांना राहाण्यासाठी हॉटेल्स सुरू राहातील
 • क्वारंटाईनसाठी, आधीपासूनच अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि होम डिलिव्हरीसाठी हॉटेल्स सुरू राहातील
 • राज्याअंतर्गत (जिल्ह्याजिल्ह्यामध्ये) तुम्ही काही नियमांचे/अटींचे पालन करून प्रवास करू शकता
 • वैद्यकीय, रुग्णवाहिका, अत्यावश्यक क्षेत्रातील सगळे कर्मचारी कुठल्याही अटीविना राज्याअंतर्गत प्रवास करु शकतात (सोबत ओळखपत्र असणे गरजेचे)
 • राज्यात चालणारी सगळी माल वाहतूक, रिकामे ट्रक वाहतूक, शासकीय कामातील वाहतूक सुरू राहाणार
 • ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही व्यवहार सुरू होण्याची शक्यता…
‘हा लेख कसा वाटला’ हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, अशाच अनेक स्पेशल पोस्टसाठी वंटास मुंबईच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, हॅलो, यूट्यूब या सोशल मिडीयाशी कनेक्ट राहा, याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयाची माहिती हवी असेल, तर त्याबद्दलही कमेंटमधून जरूर कळवा. वंटास मुंबईवर जाहिरातीसाठी [email protected] वरून नक्की संपर्क करा.
 

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments