कारण

हुश्श्श!!! लॉकडाऊन संपला; या गोष्टी होणार उद्यापासून सुरू…

देशात आतापर्यंत 4 लॉकडाऊन होत आले, या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी अनेक क्रांतीक्रारी बदल पाहिले, ते बदल आपल्या स्वत:मध्येही होते तर काही दुसऱ्याबद्दल होते. जगाच्या इतिहासात या लॉकडाऊनची नवी नोंद झाली आहे. इतके दिवस लॉकडाऊन वाढला, तरी कोरोनाची साखळी काही तुटता-तुटत नाही. त्यातच भर म्हणजे उद्यापासून नव्या लॉकडाऊनची सुरूवात.
1 जूनपासून 30 जुनपर्यंत संपुर्ण देशभरात नव्या लॉकडाऊनची सुरूवात होते. मात्र पहिल्या लॉकडाऊन आणि आताच्या लॉकडाऊनमध्ये खूप अंतर असणार आहे. जरी कोरोना संक्रमनाचं प्रमाण वाढत असलं, तरी देशाला इतके दिवस बंद करून जगातल्या कोणत्याच प्रशासनाला जमणार नाही. एकिकडे कोरोनाचं संक्रमण तर दुसरीकडे देशातला कमी झालेला पैसा, यामुळे लॉकडाऊन वाढवला खरा, पण अनेक शिथलपणा यात देण्यात आल्यात.

हा लॉकडाऊन जरी वाढला असला तरी दिलेल्या शिथिलतेमुळे याला ‘अनलॉक-१’ म्हणण्यासदेखील सुरूवात केली आहे, याचाच अर्थ हळू हळू अनेक गोष्टी सुरू होण्यास सुरूवात झाली आहे

पाहा, कोणत्या गोष्टी 1 जूनपासन अनलॉक होणार…
 • देशातली अनेक प्रार्थनास्थळे (सगळेच नाही) 8 जूनपासून सुरू होणार तर मान्यताप्राप्त (प्रशासनाकडून परवाणगी मिळालेले) हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल सुरू होणार आहेत, त्यासाठी आरोग्य खात्याकडून नियमावली लवकरच जाहीर होईल.
 • सध्यातरी शाळा, कॉलेज, सगळ्या शैक्षणिक संस्था जुलै 2020 पर्यंत बंदच असतील, त्यानंतर निर्णय जाहीर होतील, यासाठी आधी राज्य सरकार शैक्षणिक संस्था आणि पालकांशी चर्चा करेल.
 • सार्वजनिक ठिकाणी, तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मास्क गरजेचाच
 • सार्वजनिक ठिकाणी एकमेकांत 6 फूट अंतर गरजेचं. दुकानांसमोर सोशल डिस्टंसिंग राखण्याचं काम दुकानदारांचं. शॉपिंग मॉल आणि मोठ्या किराणा दुकांनांमध्ये एकावेळेस फक्त 5 लोक राहातील, बाकीचे सगळे बाहेर रांगेत असतील
 • रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमध्ये जसे आहेत, तसेच नियम लागू असतील, तिथे फक्त अत्यावश्यक सुविधांना परवाणगी असेल
 • कंटेनमेंट झोनच्या बाहेर एक बफर झोन असेल, तिथे काही नियम अटी शिथिल असतील, त्याची नियमावलीही लवकर घोषित केली जाईल
 • लग्नासमारंभाच्या वेळी 50 तर अंतिमसंस्काराच्या वेळी 20 लोकच हजर राहू शकतील
 • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तात्काळ कारवाई होईल, तर दारू, पान, गुटखा, तंबाखुचं सेवन करण्यावर बंदी
 • याही लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा
 • कामाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची तासानुसार शिफ्ट असेल
 • आता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 नाही, तर रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत जमावबंदी लागू असेल
 • कोणतेही राजकिय किंवा सांस्कृतीक कार्यक्रम केल्यास कारवाई होणार
 • जेष्ठ नागरिक आणि 10 वर्षांपेक्षा लहान मुलांनी घरीच राहावं
 • दुसऱ्या टप्प्यात शाळा-महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, ऑनलाईन क्लास या सगळ्यावर राज्यसरकार निर्णय घेणार

 

हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा, जर तुम्हाला मुंबईच्या संबंधीचे तुमचे ब्लॉग आमच्या वंटास मुंबईवर पोस्ट करायचे असतील तर [email protected] मेल आयडीवर नक्की पाठवा आणि अशाच वंटास पोस्टसाठी आमच्याशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून कनेक्ट राहा.

हेही वाचाच…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments