आपलं शहर

लॉकडाऊन 3.0 : पाहा मुंबईत काय असेल सुरू आणि काय असेल बंद; खास रिपोर्ट

assaovered

3 मे रोजी लॉकडाऊन संपेल या आशेने सर्वजण आपले स्वप्न रंगवत असताना नकळतच केंद्र सरकारने सगळ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. अंशतः जवळपास सर्वच लोकांना कोरोना रुग्णांची वाढती नको असलेली संख्या पाहून लॉकडाऊन वाढेल असा अंदाज होताच, पण ज्यांचे भयानक हाल होत आहेत असा गरीब वर्ग हा खूप आशा लावून बसलेला. आज तो आशेचा किरण पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवून डूबला. 
कोरोना रुग्णांची संख्या पाहता तीन कंटेंटमेंट झोन तयार करण्यात आले होते. त्यानुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनला लॉकडाऊन पासून बहुतांश मुभा देण्यात आली आहे, कारण ते झोन कोरोना मुक्त झालेले आहेत. आता कोरोनामुक्त म्हणजे काय? तर गेल्या 21 दिवसांत तेथे एकही कोरोना रुग्ण आढळला नाही यामुळे तेथे धोक्याचे प्रमाण नाही.
देशात, दोन आठवडे म्हणजेच 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा आदेश देण्यात आला. कोरोना संकटाबरोबर डबघाईला आलेली आपली आर्थिक व्यवस्था रुळावर आणणे तितकेच गरजेचे आहे, त्यामुळे सरकारने आर्थिक परिस्थितीचा विचार करून काही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता या कोणत्या सेवा सुरू असतील आणि काय असेल बंद, हे सगळे जाणून घेणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. 
चला तर पाहुयात, वंटास मुंबईचा हा खास रिपोर्ट…
कोणत्या सेवा राहणार बंद…
◆ वाहतुकीची सेवा पूर्णतः बंद राहणार; म्हणजेच संपूर्ण देशात रस्त्यांवरून, रेल्वेने, मेट्रोने आणि विमानांनी वाहतूक बंद राहणार.
◆ शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, थिएटर, मॉल, जिम, क्रीडा संकुल.
◆  सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक समारंभ
◆ मंदिर, मशिदी, चर्चे, इत्याही प्रार्थनास्थळं लोकांसाठी बंद असतील
◆ सर्व झोन्समध्ये गरोदर स्त्रिया, आजरी व्यक्ती, 65 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्ती आणि 10 वर्षांखालची मुलं घराबाहेर पडणार नाहीत. केवळ वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडू शकतात.
कोणत्या सेवा राहणार सुरू
◆ विमान, रेल्वे आणि रस्त्याने प्रवासाची परवानगी फक्त काही विशिष्ट कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालय देईल
◆  सर्व झोन्समधल्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग (OPD) सुरू ठेवता येईल. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील
◆ माल वाहतुकीला सरसटक परवानगी आहे
◆ शेतीशी संबंधित सर्व गोष्टींना परवानगी. शेतीमालाच्या विक्रीलाही परवानगी. मासेमारीला आणि पशुसंवर्धनाशी संबंधिक सर्व गोष्टींना परवानगी
◆ SEZ आणि औद्योगिक वसाहतींमध्ये काम करण्यास परवानगी. अत्यावश्यक गोष्टींचं उत्पादन करणारे उद्योग, औषधांचे उद्योग, त्यांना कच्चा माल पुरवणारे उद्योग, IT हार्डवेअर उद्योग, तागाचा उद्योग यांना काम करण्याची परवानगी, पण ते करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार
◆ शहरांतल्या बांधकामांना आणि अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी आहे, पण कामगारांना साईटवरच राहावं लागेल
◆ ग्रीन झोनमध्ये बसेस चालू शकतात, पण बसमध्ये 50 टक्के क्षमतेनेच लोक बसू शकतील
◆ सर्व छोटी आणि रहिवाशी भागातली एकल दुकानं उघडता येणार
◆ आर्थिक क्षेत्र खुलं राहणार – बँका, NBFC कंपन्या, विमा आणि भांडवली बाजार, सहकारी संस्था सुरू राहणार
◆ लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, गरिबांसाठी, महिलांसाठी आणि विधवांसाठी काम करणाऱ्या संस्था सुरू राहणार. अंगणवाड्या सुरू राहणार
◆ टपाल आणि कुरिअर सेवा सुरू राहणार. वीज, पाणी, सफाई, टेलेफोन आणि इंटरनेट सेवा सुरू राहणार
◆ ऑरेंज झोनमध्ये टॅक्सीला परवानगी; पण गाडीत एक ड्रायव्हर आणि एक प्रवासीच बसू शकणार
◆ एका जिल्हातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी विशिष्ट कामांसाठीच मिळणार
रेड झोनमध्ये चालू असणाऱ्या सेवा
◆ रेड झोनमधल्या ग्रामीण भागात सर्व बांधकामांना परवानगी. मनरेगा, वीटभट्ट्यांना परवानगी. ग्रामीण भागात सर्व दुकानं उघडता येणार, केवळ शॉपिंग काँप्लेक्समध्ये निर्बंध असतील
◆ रेड झोनमधले मीडिया, IT कॉल सेंटर, कोल्ड स्टोरेज, खासगी सुरक्षा सेवा सुरू राहणार
रेड झोनमध्ये कोणत्या सेवा बंद
◆ रेड झोनमध्ये रिक्षा, सायकल रिक्षा, टॅक्सी, कॅब, बसेस, सलून, स्पा. बंद असणार 
◆ अनेक ठिकाणी प्रवास करण्यास मनाई असणार. पंरतु रेड झोनमध्ये मोजक्या कारणांसाठी वाहनांतून प्रवास करता येईल. एका चारचाकी गाडी ड्रायव्हर वगळता केवळ दोनच व्यक्ती प्रवास करू शकतील. दुचाकीवर केवळ एकच व्यक्ती प्रवास करू शकेल
◆ कंटेनमेंट झोनमध्ये मात्र OPD सुरू ठेवता येणार नाहीत
हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments