आपलं शहर

मुंबईत कोरोनाचं औषध सापडलं; पेशंटही बरे होत आहेत…

mumbai bmc starts use of new medicine in the treatment of corona patients are rapidly improving
रोजच्या कोरोना बाबतच्या बातम्या आणि वाढणारी रुग्णांची आकडेवारी, मुंबईकरांच्या जीवनात नैराश्य निर्माण करत असते. सर्वजण हे सगळं कधी ठीक होईल, कोरोनावर कधी ठोस उपाय मिळेल याचीच वाट पाहत आहेत. आज वंटास मुंबई स्पेशल मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी घेऊन आली आहे. होय! मुंबईतील रुग्ण बरे होत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी शोधलेले औषध सकारात्मक काम करत आहे. चला तर पाहूयात, ही दिलासा देणारी बातमी सविस्तरमध्ये.
बऱ्या झालेल्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा अहवाल
मुंबईची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण, दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्यादेखील मुंबईकरांच्या दिलासाला वजन देत आहे. आपण जर 12 मे पर्यंतचा मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा अभ्यास केला, तर आतापर्यंत मुंबईत 14 हजार 781 रुग्ण आहेत. त्यातील 3 हजार 313 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 556 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अनेक शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील कोरोना रुग्ण समजावेत, म्हणून कोरोना संदर्भातल्या टेस्टिंग वाढविण्यात आल्या. कोरोनावर अभ्यासादरम्यान क्लोज कॉन्टॅक्टमुळे रुग्ण वाढतात, असे समजताच त्यावर उपाययोजना सुरू केल्या. नागरिकांना विलीगिकरण करण्याचे  प्रमाण वाढवण्यात आले. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याचे संकेत कमी होऊ लागले.
मुंबईला मिळाला कोरोनावर उपाय
गेले काही दिवस अनेक वेगवेगळे प्रयोग करून कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. प्लाझ्मा थेरपी असो की BCJ लस यांद्वारे रुग्णांवर उपचार करून त्यांच्या हालचाली टिपल्या जात आहेत. सद्यस्थितीला कोरोनारुग्ण संख्याची तीव्र बाधा झालेल्या रुग्णांच्या सुधारणेसाठी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये “इंजेक्शन टोसीलुझुमॅब” या नवीन औषधाचा उपयोग सुरू करण्यात आला आहे.
आनंदाची बाब म्हणजे आतपर्यंत 40 रुग्णांवर या औषधांचा वापर करण्यात आला असून त्यापैकी यशस्वी 30 रुग्णांवर या औषधाचा चांगला परिणाम दिसत आहेत. तसेच 14 रुग्णांनी या औषधाला चांगला प्रतिसाद देऊन ते रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा तर झालीच; पण यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचीदेखील गरज भासली नाही, अशी माहिती बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या 12  तारखेरोजी प्रकारशीत झालेल्या तक्त्यात दिली आहे.
20200514 140053
अनेक प्रयोग करून आता कुठे हे औषध कोरोनावर मात करण्यासाठी साथ देत आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळवुन देणारी ही बातमी आहे. जगभरातील विविध तज्ज्ञ आणि डॉक्टर्स यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या अनुभवाच्या आधारे या औषधाचा वापर केला जात आहे. मुंबईतील धारावी मधील 3 पैकी एका 38 वर्षीय पुरुषावर या औषधाचा वापर करून उपचार केल्यावर यशस्वी रित्या तो रुग्ण बरा होऊन त्याच्या घरी परतला असल्याचेदेखील महानगरपालिकेने म्हटले आहे.

आता आपण बोलू शकतो, होय!  कोरोना रुग्णांना बरे करणारे औषध मुंबईने शोधून काढले असून ते सकारात्मक काम करत आहे. कशी वाटली आमची ही दिलासादायक बातमी; आम्हाला जरूर कळवा आणि अजून आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती हवी असल्यास आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा, आम्ही ती आपल्यापर्यंत जरूर पोहोचवू.

 
हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Mangesh

Thanks for very intresting info.
can you post more marathi news about bollywood industry in marathi language.
for more information and for contact us visit on fastnewsfree.blogspot.com
click here for Contact us
Thanking You..!
FAST NEWS

Unknown

Congratulations

Unknown

अभिनंदन