आपलं शहर

मुंबईकरांनो लोकलमध्येही झाले बदल; पाहा लॉकडाऊनंतर कशी असेल मुंबई लोकल..

मुंबई तेव्हाच थांबते जेव्हा मुंबईची लोकल थांबते, अस म्हटलं जातं आणि मुंबईकरांनी ते कित्येकदा अनुभवलेदेखील आहे. एका दिवसाला सात अंकी आकडा एव्हढे लोक  एकट्या लोकलने प्रवास करतात. 
स्वस्त दर्जा, नो ट्राफिक टेन्शन, प्रवास कालावधी आणि प्रत्येक मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे लोकलचे तिकीट, ही सगळी कारणे आहेत ज्यामुळे मुंबईची लोकल लाईफलाईन बनली, पण हीच लाईफलाईन बंद पडली तर अख्खी मुंबई बंद पडते. सहाजिकच, लोकांना कामावर जाण्याची सोय उरत नाही.
खाजगी वाहने उभी राहिली तर ट्राफिकची समस्या, मग तेच आपले रोजचे प्रदूषण, होणारे रोड अपघात. तसेच अनेक व्यवसाय हे लोकलवर अवलंबून असतात. तेदेखील ठप्प पडतात. मग मुंबई जाते नुकसानीच्या नाल्यात. पावसाळ्यात आपण लोकल बंद पडण्याच्या अनेक समस्या पाहतो, तेव्हा मुंबईकरांना प्रवास म्हणजे एक तारेवरची कसरत होय, पण आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आज कोरोना व्हायसरच्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल बंद आहे. जवळपास दोन महिने होत आले, आपली मुंबई लोकल बंद आहे. हे किती दिवस चालणार व कधी ना कधी तर लोकल सुरू करावी लागणार मग तेव्हाचे चित्र काय असेल; याचेच विश्लेषण आज वंटास मुंबई आपल्या वाचकांसाठी घेऊन आली आहे.
मुंबईच्या लोकलचा प्रवास भविष्यात कसा असेल?
पोस्ट लोकल योजना कशी असेल हाच प्रश्न सर्व मुंबईकरांना पडला आहे. यामध्ये विशेष लक्ष हे स्वछता, सोशल डिस्टनसिंग याकडे असणार आहे. आता काही काळानंतर लोकल सेवा सुरू होईल, हे निश्चित आहे. पहिली सुरुवात होते ते म्हणजे तिकीट काउंटर इथून. जागोजागी आपल्याला कोरोना विषयक जनजागृती करणारे पोस्टर पहावयास मिळतील. तिकीट काढताना सोशल डिस्टनसिंगचे पुरेपूर पालन केले जाईल. तसेच ऑनलाइन तिकीट काढण्यास जास्त प्राधान्य दिले जाईल. प्रवास सुरक्षेसोबत कॉरोनापासून बचावासाठी रेल्वेद्वारे वारंवार घोषणा केल्या जातील. त्याच्यातच एक नियम लागू होण्याची शक्यता आहे, ती म्हणजे गेटवरच तिकीट चेक केलं जाईल आणि ज्यांच्याकडे ऑनलाईन किंवा पेपर तिकीट असेल तरच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल.
प्लॅटफॉर्मवर हाथ धुणे आणि सॅनिटीझरचा वापर करणे प्रवासी नागरिकांसाठी बंधनकारक राहील. लोकल मधून प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लोकलमध्ये बाक तितकेच प्रवासी असाही नियम करण्यात येऊ शकतो. आजारी व्यक्तींना प्रवास करण्यास मनाई असेल. तसेच, प्रवासाच्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप हा बंधनकारक करण्यची शक्यता आहे.
अनेक तज्ञांच्या मते, नागरिक आता लोकलचा प्रवास कमी करतील; पण मुंबईसारख्या शहरात सर्वसामान्य माणसाला परवडणारी एकमेव वाहतूक म्हणजे लोकल आहे. आता प्रवासी बोजा कमी करण्यासाठी भविष्यात लोकलचे डबे वाढविले जाऊ शकतात. जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता येईल.
प्रवासी संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना
मुंबईची लोकल म्हटलं की, भरगच्च गर्दी आणि चेंगराचेंगरी हे चित्र स्पष्ट आपल्या डोळयासमोर उभे राहाते. कोरोना म्हणजे सोशल डिस्टनसिंग! पण लोकलमध्ये हे शक्य नाही. त्यामुळे लोकल बंद करण्यात आली, पण आता लोकल सुरू करण्यात येईल, तेव्हा ही गर्दी टाळण्यासाठी काही उपाय आहेत. कोरोना संकटाच्या काळात, आता वर्क फ्रॉम होम ही संकल्पना जास्त पाहायला मिळत आहे. शक्य असेल तितक्या  कंपन्यांनी “वर्क फ्रॉम होम” ही प्रणाली लागू करावी. जेणेकरून नागरिक घर बसल्या काम करू शकतो. प्रवासाची गरज भासणार नाही. याचा मोठा परिणाम लोकलवर होऊन गर्दी टाळली जाऊ शकते.
मुंबईकरांच्या कामाच्या वेळा बदलल्या तर याचा खूप मोठा परिणाम लोकलमध्ये होत असलेली गर्दी टाळण्यासाठी होऊ शकतो. आतापर्यंत 9 टू 5 हीच कामाची वेळ असल्यामुळे या वेळेत सर्वाधिक गर्दी होत असते. त्यामुळे जर कामाच्या वेळेत बदल केला गेला तर नक्कीच वाढती गर्दी आटोक्यात आणली जाऊ शकते. तसेच कामाचे तास मर्यादित स्वरूपात केल्यावर एका निश्चित वेळेचे नियोजन करून त्या प्रकारे लोकलचे नियोजन करता येईल.

 

कशी वाटली माहिती, हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही नोंदवा. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच आपल्या पर्यंत योग्य माहितीसह पाठवू.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments