कारण

विद्यापीठ परिक्षांबाबत सगळ्यात मोठी बातमी; पाहा तुमची परिक्षा कधी…

जसा राज्यात कोरोना पसरत चालला आहे, तशाच अनेक गोष्टींशी संबंधीत असलेल्या अफवादेखील पसरत चालल्या आहेत. अशाच काहीशा अफवा विद्यापीठ संबंधीत असलेल्या परिक्षांना घेऊन व्हायरल होत आहेत, त्या किती खऱ्या आणि किती खोट्या या सगळ्यांचं विश्लेषण या लेखात करण्याचा वंटास टीमने प्रयत्न केला आहे.

लॉकडाऊनमुळे राज्यातील सगळी विद्यापीठे बंद आहे, सोबतच अनेक क्लासेसदेखील बंद आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा असा प्रश्न पडला आहे की नेमक्या विद्यापीठाच्या परिक्षा, MPSC-UPSC च्या परिक्षा, सीईटी, नेट अशा शैक्षणिक क्षेत्रातल्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अनेक परिक्षा रद्द झाल्यात का? की त्या होणार आहेत? जर होणार असतील तर त्या कधी होणार आहेत? असेही प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत, त्यातच भर म्हणजे काही दिवसांपुर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने विद्यापीठ परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करत विद्यापीठांना काही शिफारशीदेखील केल्या आहेत, यासगळ्यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना उत्तरे दिली आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली माहिती…
आम्ही राज्याच्या विद्यापीठ स्तरावर अभ्यास करण्यासाठी चार कुलगुरूंची समिती नेमली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर आणि परिक्षांवर एक अहवाल तयार केला आहे. त्या अहवालाचा आढावा घेतला जात आहे? सोबतच केंद्रिय स्तरावर असलेल्या परिक्षांबाबत किंवा त्यांच्या तारखा पुढे ढकलण्याबाबत मुंख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
उदय सामंत म्हणतात की आम्ही लॉकडाऊनच्या काळात घाई-घाईने कोणताही निर्णय घेणे हे अनेक विद्यार्थ्यांचं लाखोंचं नुकसान करण्यासारखं आहे, अनेक विद्यार्थी शेवटच्या वर्षात आहेत, अनेक विद्यार्थी स्पर्धापरिक्षेंच्या माध्यमात शेवटचा प्रयत्न करत आहेत, बारावी सोबतच सीईटी परिक्षाही विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक गोष्टींसाठी महत्वाची आहे. कारण अनेक विद्यार्थी बारावीपेक्षा सीईटीचा अभ्यास करत असतात, त्यामुळे त्यांचंही नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत.
उदय सामंत म्हणतात की राज्यातील अनेक परिक्षांचा पॅटर्न बदलेल मात्र आम्ही कोणत्याही प्रकारची परिक्षा रद्द करणार नाही आहोत. ती परिक्षा किती गुणांची असेल, कधी असेल, कुठे असेल, ऑनलाईन असेल की परिक्षा केंद्रातच, याची संपुर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच, मात्र या काळात विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावरून व्हायरल होत असलेल्या आणि ज्यांचा कोणताही दुवा नसलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
  काय आहे UGC चं वेळापत्रक  
1 ते 31 जुलैच्या आत राज्यात न झालेल्या सर्व विद्यापीठ परिक्षा व्हाव्यात 
15 ऑगस्टपर्यंत सर्व परिक्षांचे निकाल लावावेत
त्याआधी म्हणजेच 1 ऑगस्टपासून पुढच्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू कराव्यात
1 सप्टेंबरपासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होईल…

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments